2021 मधील पाचव्या मन की बात च्या निमित्याने

         

       दिनांक 30 मे 2021 रोजी 2021 मधील पाचव्या मन की बात मध्ये   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले . मागच्या महिन्याप्रमाणेच याही मन की बात मध्ये पंतप्रधान कोरोनायोद्धांचे अभिनंदन केले.  या मन की बात मध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या यंत्रणेतील एक प्रमुख घटक असणाऱ्या कंटनेर चालकांशी संवाद साधला. ज्यामध्ये एका महिला रेल्वे इंजिन चालकाचा समावेश होता . या मन की बातचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरोना योद्धांच्या घरातील सदस्यांचा देखील समावेश करण्यात आला . या खेरीज लॅबमध्ये तपासणी करणाऱ्या एका व्यक्तींचाही समावेश करण्यात आला होता .  
कोरोनाखेरीज गेल्या वर्षभरात  आपणावर आलेल्या प्राकृतिक संकटाचा त्यांनी प्रास्तविकात उल्लेख केला .  तसेच मन की बात च्या शेवट करताना गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने केलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला . ज्यामध्ये राम मंदिर, काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबरोबर जागतिक व्यासपीठावर भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचा उल्लेख होता .  परकीय आक्रमकांच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले 
आज गोवा राज्याच्या केंद्रशासीत दर्जा संपुष्टात येऊन त्यास पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यास 34 वर्ष पूर्ण झाली आहेत .एका अर्थाने गोवा राज्यासाठी हा राज दिन होता  त्यानिमित्याने गोवेकरांचे अभिनंदन करतील अशी माझी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली . त्याविषयी एक अवाक्षर देखील मोदींनी काढले नाही . गोवा राज्यात नुकतेच मोठे चक्रीवादळ येऊन गेले आहे . त्यामुळे गोवा राज्याविषयी उल्लेख मला अपेक्षित होता असो 
याखेरीज सध्या देशभरात वाढत असणाऱ्या खाद्यान्न तेल तसेच नैसर्गिक इंधनाच्या वाढत्या दाराविषयी त्यांनी मौन बाळगले तसेच देशभरात सध्या अनेकांसाठी महत्त्वाचा विषय असलेल्या दहावी  बारावीच्या परीक्षेबाबत देखील त्यांनी एक शब्दांचेही भाष्य केले नाही . त्या बाबत सरकारच्या अन्य यंत्रणा वेळोवेळी विविध सूचना सांगत असल्या तरी प्रशासन यंत्रणेचे प्रमुख याबाबत भाष्य करणे गरजेचे होते जे त्यांनी केले नाही एकंदरीत हि मन कि बात सुद्धा या आधीच्या मन की बात प्रमाणे खोड पहाड निकाला चुहा अशीच होती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?