37 वर्षानंतर....

         

 काही घडामोडी घडून गेल्यावर कित्येक वर्ष उलटून गेली तरी त्या घडामोडींचा परिणाम शिल्लक राहतो , जून महिन्यात दक्षिण आशियाचा विचार करता  या घडामोडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . 25 जून 1975 रोजी भारतात लादण्यात  लादण्यात आलेली आणीबाणी , जून 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात झालेले एकत्रीकरण,  3 जून 1947 रोजी ब्रिटिश संसदेत  पारित करण्यात आलेला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा किंवा  3 जून 1984 रोजी अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली लक्षरी कारवाई त्यापैकीच एक 
          या घटनेचे वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्रेसने खेळलेल्या पण फसलेल्या चालीचे अपत्य म्हणजे म्हणजे खलीस्तान चळवळ ज्यामुळे भारताच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला.  परिणामी एका शुर लढवय्या समाजाच्या प्रार्थना समाजात लष्कर घुसवावे लागले ज्याची परिणीती महात्मा गांधीच्या हत्येनंतर ज्या प्रकारे एका समाजाला लक्ष्य करण्यात आले त्याची पुनरावत्ती करण्यात झाली.  मी त्या काळी सध्याचा जन्मात तरी अस्तिवात नव्हतो मागच्या जन्माच्या काळात जर या घडामोडींचा साक्षीदार  असेल तर माहीती नाही हे सर्व त्या काळी लिहलेल्या व मी वाचलेल्या आणि  तो काळ अनूभवणाऱ्या कडून याविषयी सांगीतल्या गेलेल्या गोष्टीवर आधारीत आहे तरी काही चुका झाल्याच आहेत असे वाचणाऱ्यांनी समजायला हरकत नाही मला जेव्हढी माहीती आहे त्यानुसार हे लेखन केले आहे . 


         पंजाबचे भौगोलिक स्थान जर विचारात घेतले तर आपणास एक गोष्ट सहज लक्षात येते,  की पंजाब मधून सहजतेने काश्मीर मध्ये जाता येते काश्मीर ला लागून असणाऱ्या  हिमाचल प्रदेशातून काश्मीरमध्ये जाणे फारशे सोपे नाही.  आताआतापर्यत म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वीपर्यत तो प्रदेश वर्षातील 8 महीने बफाच्छादीत असल्याने त्याप्रदेशात जाता सुध्दा येत नव्हते.  आता त्याप्रदेशात थोड्या खालचा प्रदेशात बोगदा झाल्याने आता हा मार्ग वापरता येतो,  हा मार्ग जगातील सर्वात उंच गाडी रस्ता आहे.  तेथील हवेत प्राणवायुचे प्रमाण अत्यल्प आहे.  म्हणजेच तेथून काश्मीरचे नियंञण करणे अवघड आहे.  जर दुर्दैवाने पंजाब स्वतंञ्य झाले असते तर आपणास काश्मीर वर नियंञण ठेवणे अवघड झाले असते,  आणि  आपण काश्मिरमधील दहशतवादी कारवायांचा आढावा घेतला तर आपणास असे लक्षात येते की,  पंजाब शांत होतो ना होतो काश्मीर पेटण्यास सुरवात झाली त्यामुळे आपण कितीही नाराज असलो तरी गांधी नेहरू घराण्यातील इंदिरा गांधी यांनी देश फुटण्यापासून वाचवला हे माञ नाकारून चालणार नाही तो प्रश्न अजून पुर्णपणे मिटलाय असे म्हणता येणार नाही त्या प्रसंगातून उदभवलेल्या दंगलीत होरपळलेल्या समाजाला अजून पुर्णपणे न्याय मिळालेला नाही तसेच मी एके ठिकाणी  ती परिस्थिती परत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वाचले होते.  अर्थात ते परदेशातील आहेत भारतातील नाहीत.  मला माहीती आहे की काही ठिकाणी त्यास वंदनीय मानले जाते माञ हे फारसे चिंतेचे कारण नाही आपल्या महाराष्ट्रात सुध्दा एक विशिष्ट विचारधारा अश्याच एका माणसाला आपला आदर्श मानतेच ना ? तेव्हा सर्व ठिकाणी असे लोक असतात त्याचा बावू करण्याची गरज नाही. 
          धार्मिक राजकारण  किती गंभीर स्वरूप धारण करू शकतो ? याचे 1947 नंतर पुन्हा एकदा दर्शन झाले . ते या घटनेमुळे .  लोकांची मते मिळवण्यासाठी अकाली दल  कांग्रेस यांनी पंजाबमधील धार्मिक भावना  वाढवली ज्यामुळे भारतातील शूर लोकांचा प्रांतच आपल्या भारतापासून वेगळा होण्याचा मार्गावर आला . ती वाचवली इंदिरा गांधी यांनी प्राणांचे मोल देऊन .1984 ला लागलेला वणवा 1989 पर्यंत राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात टप्याटप्याने शांत झाला.  पाकिस्तानने त्या नंतर पंजाबला अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकवून टाकले . जो आता 2020 मध्ये सुद्धा काही प्रमाणात आहे . या अंमली पदार्थाचा विळख्यावर उडता पंजाब हा चित्रपट आलेला आहे . तो तुम्ही नक्की बघा . 


         इशान्य भारताला सुध्दा वेगळे होण्याची  प्रबळ  इछा जर ही कार्यवाही अयशस्वी ठरली असती तर  चालना मिळाली असती माञ आपल्या सुदैवाने ते झाले नाही भारत एकसंधच राहिला तसेच पाकिस्तानला पण 1971 चा अपमानाचा बदला घेतल्याचा आनंद मिळाला असता तो मिळाला नाही.  पण पाकीस्तानला भारताला अस्थिर करण्यासाठी एक उपाय सापडला,  या कालावधीनंतर जगाच्या राजकारणात प्रचंड मोठे बदल झाले माञ त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  यामुळे आपण आपला एक चांगला कणखर पंतप्रधान गमवला त्यांचा विषयी थोडे अपमानास्पद चिड आणणारे वक्तव्य तक्तकालीन अमेरिकेच्या राष्टपतीने केले होते पण ते त्यास करावे लागले यातच सर्व काही आले असे मला वाटते आपणास काय  वाटते या विषयावर खुप काही लिहण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय बाय टेक केअर. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?