6वर्षे ब्युटीफुल माइंडच्या निधनानंतर ची


काही योगायोग अत्यंत दुर्देवी असतात लाखो रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या नितू मांडके यांच्या मृत्यू हृदयक्रिया बंद पडून व्हावा , मगरींवर प्रचंड संशोधन करणाऱ्या  क्रोकोडाइल मँन असी ख्याती असणाऱ्या स्टिव्ह इरविनचा  मृत्यू मगरींमुळेच व्हावा वगैरे आज पासून 6वर्षापुर्वी असाच एक दुर्देवी योगायोग.अमेरीकेत झाला.
     अत्यंत दुर्धर अशा मानसिक रोग समजला गेलेल्या स्किझोफेनिया ( छिन्नमानसिकता ) रोगावर विजय मिळवून गणितातील अवघड समजल्या गेलेल्या गेम थेअरी मध्ये नोबेल मिळवणारा शास्ञज्ञ जॉन नँश (86 )  यांचा ते पत्नीसह कारने जात असताना अपघात होवून स्किझोफेनिया रोगाच्या जागतिक दिनीच त्यांचे  निधन होण्याचा . या अपघातात त्यांचाबरोबर त्यांना जीवनाच्या कठीण प्रसंगी साथ देणारी त्यांचा बायकोचेही (84) निधन झाले .
त्यांचा जिवनावर आधारीत ब्यूटीफुल मांइड हा चिञपट  मी अनेकदा बघितला आहे. किंबहुना तो माझा आवडता इंग्रजी चिञपट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मन किती खट्याळ असू शकते ? त्यामुळे आयुष्याची महत्वाची वर्षे कशी वाया जावू शकतात आणी तरी देखील मनुष्य काय करू शकतो? हे बघण्यासाठी हा चिञपट बघायलाच हवा आणि जॉन नँश यांचा बाबतीत झालेल्या या योगायोगाला काय म्हणावे ? ज्या स्किझोफेनियाला हरवून त्यांनी नोबेलला गवसणी घातली त्याच स्किझोफेनियाचा जागतिक दिनी त्यांना मृत्यू यावा असे नाहीतर तसे स्किझोफेनियाने त्यांना गाठावे ? त्यांचा निधनाने एक लढवय्या शास्ञज्ञ संशोधकाला जग मुकले आहे हे माञ त्रिवार सत्य आहे 


समर्थ रामदास स्वामी असो किंवा भगवान बुध्द किंवा खानदेश भुषण थोर कवी बहिणाबाई चौधरी असो यांनी मनाला आवर घालण्याचा सल्ला दिला आहे त्या मनाचे एक वेगळे रुप मला त्या चिञपटात दिसते या चिञपटा सारखाच मराठीतील चिञपट म्हणजे देवराई ज्यातही  एका MSC Botany करणाऱ्या हुशार व्यक्तीला हा रोग होतो हा रोग पुर्णपणे बरा होण्याचे प्रमाण फक्त २℅आहे हा रोग मेंदुतील डेपोमलीन नावाचा स्ञवाचा असंतूलनीत स्त्रवामुळे हा रोग होतो. हा अंतस्त्राव कमी स्त्रवल्यास  अलझायमर होतो तर  जास्त स्तवले तर स्किझोफेनिया.
आता गेम थेअरी विषयी थोडे बोलतो ही गणितातील संकल्पना आहे माञ त्याचा वापर मानसशास्ञ राजशास्ञ अर्थशास्ञ यामध्ये त्याचा वापर होतो.
या संकल्पनेचा वापर सध्या खुपच मोठ्या प्रमाणात होतो. गेम थेअरी 1950 च्या दशकात शोधली गेली.सोप्या भाषेत या थेअरी विषयी सांगायचे झाल्यास   दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीने काही गमावले आणि  दूसऱ्या व्यक्तीस काही कमावले असल्यास दोघांचे मुल्य सारखेच असते. फक्त एकाची किमत उणे असते तर एकाची अधिक .  या विषयी नोबेल पातळीवरचे संशोधन केल्याने त्यांना गणिताचे नोबेल मिळाले. गेम थेअरी ही अत्यंत किचकट संज्ञा आहे. त्याचे सरलीकरण करण्याचा माझा हा प्रयत्न होता. या विषयी तूम्ही इंटरनेटवर अधिक माहिती घेवू शकतात किंवा एखाद्या गणित विषयात पदव्युत्तर शिकणाऱ्या अथवा शिकवणाऱ्या व्यक्ती कडुन अधिक माहिती घेवू शकतात.  असो 
जगातील आठवे आश्चर्य म्हणावे असी गोष्ट म्हणजे स्किझोफेनिया या रोगातून बरे होण्याची किमया त्यांनी केली होती.मात्र मी आधीच म्हटले तसे स्किझोफेनियाचा जागतिक दिनी त्यांना मृत्यू आला. आता ते जिथे कुठे असतील तेथून आपल्या या योगायोगाविषयी विचार करत असावेत असो.त्यांचा जाण्याने अनियंत्रीत झालेल्या मनाला नियंत्रीत कस्या प्रकारे नियंत्रीत आणता येते ?याचे जिवंत उदाहरण आपल्यातून गेले ते कायमचेच.!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?