यस्टी@74

     

येत्या मंगळवारी 1जून रोजी आपली महाराष्टाची एसटी 73 वर्षे पुर्ण करुन74 व्या वर्षात पदार्पण करत आहे.त्याबद्दल समस्त एसटी प्रेमीचे मनापासून अभिनंदन .
        देशात सार्वजनिक वाहतूकीची रेल्वे वगळता, अन्य कोणतीही व्यवस्था नसताना, नुकत्याच स्वतंत्र्य झालेल्या भारतात सार्वजनिक बससेवेची मुहुर्तमेढ रोवली गेली .ती आपल्या एसटी मार्फत . आपली एसटी सुरु होवून 8वर्षे पुर्ण झाल्यावर केंद्र सरकारकडून देशासाठी  1956 साली सार्वजनिक मोटार वाहतूक नियमन कायदा अस्तिवात आला. 1948 ला त्यावेळचे बाँम्बे स्टेटचे मुख्यमंत्री बी जी खेर यांचे याबाबत अभिननंदन करावे ते कमीच आहे. भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची संख्या प्रचंड असलेल्या आपल्या देशात खासगी कार प्रत्येकजण घेवू शकणार नाही. त्यासाठी काहीतरी सार्वजनिक सोय असली पाहिजे हे लक्षात घेवून लोकांच्या परीवहनाला महत्व देवून तसी सोय करणारे  बि जी खेर म्हणूनच महत्तवाचे  ठरतात. महाराष्ट्रीयन लोकांनी अनेक नविन बाबी देशाला माहिती करुन दिल्या .एसटी सेवाही त्या पैकीच एक . एसटीच्या माध्यमातून सार्वजनिक बसवाहतुकीचा समर्थ पर्याय  त्यामुळे उभा राहिला .  जोअडचणीवर  अनेक  यशस्वी मात करत  देखील आपली सेवा देत आहे . 
                   आपल्या एसटीने अनेक  गोष्टी भारतात पहिल्यांदा  आणल्या .ज्यामध्ये सोयीसुविधांनी युक्त अस्या निरारामदायी बसेस आपल्या ताफ्यात आणणे . सार्वजनिक उपक्रमात इलेट्रीक बसेस आणणे , आजमितीस परिवर्तन, हिरकरणी , यशवंती,शीतल , आसनी  शिवशाही . स्लीपर शिवशाही, अश्वमेध, शिवशाही  अश्या विविध प्रकारच्या माध्यमातून प्रवाशी वाहतूक तर महाकार्गो ब्रॅंडनेम अंतर्गत मालवाहतूक करत आहे . सध्या आपल्या एसटीला राज्य सरकारकडून येणारे देय, खाजगी प्रवाशी वाहतूकदार यांच्यासह अन्य राज्यातील एसटी सेवांचे मोठे आव्हान आहे . कर्नाटक गुजरात राज्यच्या सेवा महाराष्ट्रात अत्यंत अंतर्गत भागात खेडोपाडी सेवा देतात याउलट अपवाद वगळता महाराष्ट्राची एसटी अन्य राज्यात सीमावर्ती भागातच सेवा देते . आपल्या एसटीने अन्य राज्याच्या एसटीबाबत पाऊले उचलण्याची गरज आहे . 
ज्या मार्गावर कोणीही खाजगी वाहतूकदार सेवा देणार नाही अस्या अनेक मार्गावर एसटी सेवा देते .नाशिकहुन दिंडोरी  कळवण मालेगाव मार्गे धुळ्याला जाणारी गाडी अथवा नाशिकहून जव्हार वाडामार्गे ठाण्याला जाणारी गाडी हे त्यांची प्रातिनिधिक उदाहरणे  शहरातील लोकांना जवळच्या खेड्यात जाण्यासाठी आणि खेड्यातील लोकांना जवळच्या खेडयात आणि शहरात जाण्यासाठी या बसेसचा खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात . मात्र यातून मिळणारा आर्थिक फायदा नगण्य असतो असतो . प्रसंगी तोटा देखील होतो ,तरी देखील सर्वसामान्य जनतेसाठी ते देखील करून एसटी आपली सेवा देते . अ. किंवा निवडणुकीच्यावेळी नेक अडचणीच्या काळात ज्यावेळी अन्य सेवा बंद असते किंवा निवडणुकीच्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक देखील आपल्या एसटीमार्फत केली जाते . कोणत्याही दंगलीच्या वेळी आपण तिला जाळताना याचा विचार करावयास हवा . 
एसटीमार्फत विविध सवलती देण्यात येतात . त्यासाठी एसटीला तोटा देखील सहन करावा लागतो. आपल्या भारतातील अन्य राज्यातील एसटी देत नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना अर्धे तिकीट भाडे , विद्यार्थिनीसाठी शिक्षणासाठी जात असताना अर्धे भाडे, विविध व्यधिग्रस्त आणि दिव्यांग व्यक्तींना तसेच त्याचा बरोबर प्रवास करणाऱ्या सहप्रवाश्यास मिळणारी सूट आदी अनेक सोयीसवलतींच्या समावेश होतो . इतर राज्यांची आरक्षण विषयक धोरणे बघितल्यास अनेक राज्यांच्या सध्या गाड्याचे आरक्षण करता येत नाही याउलट स्थिती महाराष्ट्राच्या एसटी बाबत आहे . 
आपल्या एसटीबाबत खुओ काही बोलता येऊ शकते . मात्र तूर्तास इतकेच ,नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?