पाणी प्रश्नावरुन दोन एकाच कुटुंबातील देश समोरासमोर!

       

आपल्या भारतात वाढत्या कोरोना रुग्णांचा संख्येने ,आणि पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकीने समस्त देश ढवळून निघत असताना , भुतपूर्व युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियातील दोन देश , किरगीस्तान आणि तजाकिस्तान या दोन देशात इस्कारा  नावाच्या नदीच्या पाण्याचा वाटपावरुन छोटेसे युद्ध पेटले आहे. ज्यामध्ये 31 सैनिक मृत्युमुखी पडल्याचे किरगीस्तान या देशाकडून हा लेख लिहण्यापर्यत जाहिर केले आहे. तर विरूद्ध पक्षाकडून याबाबत चूपी साधण्यात आली आहे . इस्कारा या नदीवरील पाणी चोरले जावू नये, म्हणून 28एप्रिलला तजाकिस्तान देशाकडुन सिसिटिव्ही उभारला जात असताना कझाकिस्तान देशाकडून लष्करामार्फत गोळीबार सुरु करण्यात आला. ज्यामुळे हे छोटेखानी युद्ध झाल्याचे  द हिंदूच्या बातमीत सांगितले आहे . तसेच 30 एप्रिल रोजी या दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचेही या बातमीत सांगितले आहे.
  भारतात मुघल सत्तेचा पाया घालणारा बाबर ज्या फरगाणा  खोऱ्यातील सरदार होता. त्याच  फरगाणा  खोऱ्यात हे  युद्ध  लढले गेले आहे.
तसे बघायला गेल्यास   फरगाणा खोऱ्यातील लोकांच्या भटक्या जीवनशैलीमुळे उझबेकिस्तान, किरगीस्तान आणि तजाकिस्तान या तीन देशांचे सीमारेषांवरुन या प्रदेशात वाद आहेच. सन1928मध्ये हे तिन्ही देश युनाटेड सोशलिस्ट सेव्हियत रशियाचे भाग बनल्यावर या वादावर काहीसा पडदा पडला होता. मात्र 1991 साली हे देश पुन्हा एकदा स्वतंत्र्य झाल्यावर या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. ज्याचे प्रत्यंतर सध्या सुरु झालेल्या युद्धामध्ये आपणास येत आहे.
काही तज्ज्ञांच्या मते जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरुन खेळले जाईल. ज्याची सुरवात तर झाली नाही ना ?असा प्रश्न या युद्धामुळे निर्माण होत आहे. मध्य आशियातील हे देश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणारे हे देश काहीसे अविकसीत गरीब आहेत. युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा काळात त्यांचा पुरेस्या प्रमाणात विकास झालेला नाही.  युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियापासून स्वतंत्र्य झाल्यावर खऱ्या अर्थाने हे देश विकासाच्या वाटेवरुन चालू लागले. या न्यायाने या देशांची विकासाच्या वाटेवरची वाटचाल जेमतेस  तिशीत आहे. या देशांना विकासाचा मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. त्यामुळे हे युद्ध थांबायलाच हवे.
चीनच्या बिल्ड अँड रोड इनेसेटिव्ह या महत्त्वकांक्षी प्रकल्पात हे सर्व देश सहभागी आहेत. यातील काही  देश भारत आणि चीन यांचा एकत्रीत सहभाग असणाऱ्या शांघाय काँपरेशन चा भाग आहे. त्यामुळे या देशात शांतता असणे चीन आणि भारतासाठी आवश्यक आहे. सदस्य देशांमध्ये वाद असल्यास संघटना कशी रसतळाला जाते याचे सार्क हे उत्कृष्ट उदाहरण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या तील वादामुळे सार्क ही संघटना अपेक्षीत प्रगती करु शकलेली नाही. असो.
भारताच्या हवाई दलाचा परदेशात असणारा एकमेव हवाई चळ उझबेकिस्तानमध्ये आहे.या देशातील तजाकिस्तान या देशातून पाईपलाइनद्वारा गँस आणण्याचे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असण्यापासूनचे नियोजन आहे. मात्र काही अडचणीमुळे या पाइपलाईनला मुहुर्त मिळत नाही. त्यामुळे ताजाकिस्तान ,अफगाणिस्तान, पाकिस्तान ,इंडीया या देशाचें आद्याक्षर एकत्र करुन बनलेली तापी गँस योजना सध्या आपल्यासाठी ताप बनलेली आहे. तसेच 2011पासून किरीगिस्तान या देशाबरोबर आपल्या भारताचा वार्षिक युद्धाभ्यास चालतो,  खंजीर या नावाने .सन2021 मध्ये त्याचे आठवे संस्करण झाले. याच दृष्टिकोनातून  आपण या घटनेकडे बघायला हवे. 
भारताने हा लेख लिहीत असताना या युद्धाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचा आगोदरच हे युद्ध पुर्णतः थांबो, असी मनोकामना व्यक्त करत सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?