मानवतेला काळीमा !

 

शनिवार, 8 मे 2021 अफगाणिस्तानातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी काळरात्र ठरली. अफगाणिस्तानची राजधानी काबूल पासून जवळच असणाऱ्या पश्चिम काबूल जिल्ह्यातील दशत् इबारची  या ठिकाणी  असणाऱ्या syed Al Shahda   या शाळेजवळ तीन बाँम्बस्फोट झाले. या स्फोटात 150 जण जखमी झाले .तर 58 जण मृत्युमुखी पडले.मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 11ते15 वर्षाच्या विद्यार्थींनीचा सर्वाधिक समावेश आहे. या स्फोटात पुरुषांचा तूलनेत महिलांचे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये प्रमाण अधिक आहे.  शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दहा मिनिटाच्या अंतरात  झालेल्या या बाँम्बस्फोटाने मानवतेलाच काळीमा फासली आहे.   स्फोट झाला, त्याचा आसपास अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या शिया हजारा या लोकांची वस्ती आहे.  तीन सत्रात भरत असणाऱ्या  syed Al Shahda   
या शाळेत दुसऱ्या सत्राची फक्त मुलींसाठी असणारी शाळा सुटताना हा स्फोट झाला. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. अफगाणिस्तानातील प्रशासनामार्फत हा स्फोट तालीबानने केल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मात्र तालीबानने या स्फोटाची जवाबदारी नाकारली असून या स्फोटामागे इस्लामिक स्टेटस्  (IS {आय एस उच्चार इज् नाही})आहे. तालीबान या स्फोटाचा निषेध करते , असे स्पष्टिकरण दिले आहे. पुर्व इतिहास बघता या भागात तालीबानने आपल्या समाज विघातक कारवाया केल्या आहेत.
 अफगाणिस्तानमध्ये 90% सुन्नी लोक राहतात.9 % सुन्नी आहेत.तर उरलेल्या 1टक्यात अन्य धार्मिक लोक राहतात. हे आपण लक्षात घेयला हवे.         अफगाणिस्तान धार्मिक कट्टरता एखाद्या देशाच्या विकासात कसी अडचण निर्माण करते? याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणून बघता येण्यासारखा देश आहे . सन 1979 पासून आक्रमणांचा आणि धार्मिक कट्टरतेचा बळी ठरलेला देश. या देशाने धार्मिक कट्टरतेचा अनेकदा मन विष्णण करुन सोडणारा अनुभव यापूर्वी अनेकदा घेतला आहे. त्याच्यात  एक कटू अध्याय शनिवारी रचला गेला. गेल्याच आठवड्यात काबूलच्या विद्यापीठाचा बाहेर स्फोट झाला होता. ज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. 2021सप्टेबर 11 नंतर अमेरीका अफगाणिस्तानातून पुर्णतः बाहेर गेल्यावर अफगाणिस्तानी लोकांचा पुढे काय वाढून ठेवले आहे. याची ही छोटीसी झलक असल्याचे बोलले जात आहे.
आपल्याला बारामाही वापरता येणारा समुद्रकिनारा असावा यासाठी युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानावर आक्रमण केले. दहा वर्षे चाललेल्या या युद्धात रशियाला विजय मिळवता आला नाही. मात्र  त्यावेळेस अमेरीकेने रशियाविरुद्ध लढण्यासाठी तेथील धार्मिक भावना जागृत करुन तालिबान नावाचा राक्षस तयार केला. जो आता समस्त जगापुढील अडचण बनला आहे. तेव्हापासून आता पर्यत 42वर्षे अफगाणिस्तान अंधारात चाचपतो आहे. सर्वसाधरणपणे 25 वर्षाची एक पिढी समजली जाते. या हिशोबाने जवळपास दोन पिढ्या या अक्षरशः वाया गेल्या आहेत. आणि पुढची पिढीपण वाया जाण्याची शक्यता शनिवारच्या स्फोटामुळे निर्माण झाली आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करत आहे. पाकिस्तानने आक्षेप घेतलेले  काबूल नदीवरील धरण हे त्यापैकीच एक. काबूल या शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या  धरणामुळे पाकिस्तानच्या खैबर ए पखतूनवा या राज्यात पाणीसंकट निर्माण होईल .असे कारण देत पाकिस्तानने यास विरोध केला आहे. या सारख्या भारतातर्फे उभारण्यात येणाऱ्या लहान मोठ्या  300 च्या आसपास प्रकल्पाचे भवितव्य या स्फोटामुळे अडचणीत आले आहे.
अफगाणिस्तानात शांतता लाभो, आताचा स्फोट अफगाणिस्तानातील शेवटचा स्फोट ठरो  ज्यामुळे भारताचा अफगाणिस्तानातील विकासाचा मार्ग विना अडथळा ठरेल )असी इश्वराकडे इच्छा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो,नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?