वंदन भारताची उभारणी ..करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला !

       


               150 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला ,  गुलामगिरीच्या कालखंडात प्रचंड आर्थिक शोषण झालेले,  हातात  फारशी आर्थिक संसाधने नाहीत, प्रचंड गरिबी असलेल्या या  देशात दंगलीच्या अगंडोबा उसळलेला,  शेजारच्या देशाने केलेले आक्रमण ,देशात असणारे  विविध संस्थाने , प्रत्येक देश स्वतंत्र देश  भासावा अशी स्थिती  त्यांचे देशात एकत्रीकरण करणे , हा देशा समोरचा सगळ्यात मोठ्या प्रश्नपैकी एक ,   जगातील सर्व भाषिक धार्मिक विविधता या एकाच ठिकाणी एकवटली आहे का ? असे वाटावे अशी स्थिती असणारा , प्रचंड लोकसंख्येचा देश . लोकशाहीचा गंध देखील बहुसंख्य लोकांना न झालेल्या देशात लोकशाहीचे बीज रोवण्याचे प्रचंड आव्हान,  पेलत त्यांनी देशाचे सुकाणू घेतलेले . देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी . आपण बोलत आहोत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान  असलेल्या  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी . 27 मे ही त्यांची पुण्यतिथी त्या निमित्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली . मी या आधी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या  समस्या सोडवायला  विविध व्यक्ती असल्या तरी या सर्वांचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू करत होते . त्या अर्थाने या सर्व समस्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच सोडवायच्या होत्या , ज्या त्यांनी योग्य प्रकारेच सोडवल्या असे कितीही विरोधी मते असली तरी मान्य करावेच लागेल यात दुमत नसावे . 

         पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात उभारलेल्या अणुऊर्जा विभाग , इसरो सारख्या संस्थच्या कार्याची गोडफळे आता आपण चाखत आहोत . विद्दवत्तेला मानणारे पंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान विसरता येण्यासारखे नाही . आपल्यापेक्षा वेगळी मते असणाऱ्या मात्र विद्वान असणाऱ्या  अटलबिहारी वाजपेयी  यांच्यासारख्या  व्यक्तीला त्यांनी याच  जाणिवेतून विविध जवाबदाऱ्या दिल्या . गेल्या काही दिवसापूर्वी पाकिस्तानची एक बातमी आली होती. पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर  चीनच्या मदत  घेऊन सुद्धा  सन 2025च्या आधी  अंतराळात जाणे शक्य नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केल्याची ती बातमी होती . भारताने 37 वर्षांपूर्वीच केलेली कामगिरी स्वतंत्रप्राप्तीच्या  वेळी सारखीच स्थिती असणाऱ्या पाकिस्तानने अजून केली नाहीये . भारताने अणुबॉम्ब मिळवला तो स्वतःचा ताकदीवर .या उलट पाकिस्तानने तो  चोरीच्या मार्गाने मिळवला  भारताच्या या प्रगतीचे यश पंडित नेहरू यांना द्यावेच लागेल .

पंडित नेहरू यांच्या कार्यकाळात काही चुका देखील झाल्या . त्यांना मात्र पंतप्रधान असली तरी ती व्यक्ती आहे हे विसरून चालणार नाही . त्यांना जी इनपुट मिळाली त्यावर त्यांनी निर्णय घेतले  जगभरातील अनेक शासनप्रमुखांच्या निर्णयांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की बलाढ्य अमेरीकेनेच्या राष्ट्राध्यक्षांनी पण व्हितनाम अफगाणीस्तानच्या युद्धाच्या वेळी चूका केल्या आहेत.ज्याची फार मोठी किंमत अमेरीकेने मोजली आहे. युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानावर केलेले आक्रमण किंवा याच देशाचे विभाजन करण्याचा त्या वेळच्या सत्ताधिकाऱ्याचा निर्णय त्या पैकीच एक  मी वानगीदाखल ही चार उदाहरणे दिली आहेत. सांगायचा मुद्दा असा की पंडीत नेहरुंच्या चूकांबाबत उगापोह करण्याचे काही कारण नाही.

पंडीत नेहरु यांचे भारताबाबतचे योगदान एका ब्लॉग पोस्टचा विषय नाही. मात्र ज्याची सुरवात झाली त्याचा शेवट करणे आवश्यक असते, म्हणून इथेच थांबतो , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?