स्किझोफेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्याने


येत्या गुरूवारपासून अर्थात 13 मे पासून आपण एका महत्तवाच्या आजाराचा जागृती 
विषयक सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया.  अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे . 
आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )  आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे         
सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकतो .हा आजार ज्या व्यक्तिला होतो त्याचा काम करण्याचा जाणिवा नाहिस्या होतात ती पुर्णत: परावलंबी बनते 
भारतात हा आजार असल्यांचे प्रमाण सूमारे 1% आहे. हा आजार काही प्रमानात अनूवंशिक असतो.  हा आजार बहूतांश वेळेला अधिक बूध्दिमान असलेल्या लोकांत आढळतो.  नोबेल विजेते गणिततज्ञ  ज्यांचा जीवन संघर्षावर चित्रपट आलेला आहे असे जॉन नॅश हे अस्या बुध्दीमतांपैकी एक  . त्यांचा जीवनावरील ऑस्कर 
विजेता चित्रपट ब्लूटिूफुल माइंड आपले अनेक ग्रह दुर करतो (जॉन यांना ऐन तारूण्यात या आजाराने ग्रासले मात्र त्यावर यशस्वी मात केली आ‍णि गणितातील एक अवघड अश्या गेम थेअरीवर संशोधन 
करून गणिताचे नोबेल मिळवले) मूळचा इंगजी भाषेतील या चित्रपटाचा हिंदी अनूवाद युटयूबवर उपल्ब आहे याबाबत अधिक जाणू इच्छिणारे तो व्हिडीओ बघू शकतात
   स्किझोफेनिया झालेल्या  व्यक्तिला विविध  भास होतात अश्या लोकांचे स्वत:चे असे काल्पनिक जग असते हा आजार झालेल्या लोंकाचा खऱ्या जगासी असणारा संपर्क तूटतो ते कायम आपल्या काल्पनिक जगात रममाण असतात.
या आजारासाठी विविध औषधे उपलब्ध आहेत. अत्यंत गंभीर स्वरुपात हा विकार असल्यास इलेक्ट्रीक राँड मेंदूला विद्यूत झटका देण्यात येतो. ज्याला शाँक देणे म्हणतात. भारतीय कायदानुसार एखाद्या रुग्णास किती शाँक देयचे याचे बंधन मानसोपचारतज्ज्ञांवर आहेत. जर याचे उल्लंधन झाल्यास मानसोपचार तज्ज्ञला तूरुंगवास होवू शकतो. ज्या रुग्णाला शाँक देयचा आहे,त्या रुग्णाने प्रत्यक्ष शाँकचा आधी काही तास आधी खायचे नसते. आपल्या भारतातील विविध प्रकारच्या अनास्थेमुळे हा उपाशी राहण्याचा कालावधी प्रचंड प्रमाणात वाढतो. परीणामी रुग्णांचे प्रचंड हाल होतात. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.    
या आजाराचे विविध उपप्रकार देखील आहेत .जसे क्रानिक स्किझोफेनिया काही प्रकारात याची सौम्य लक्षणे आढळतात तर काहीमध्ये याची तीव्र लक्षणे आढळतात. अर्थात स्किझोफेनिया हा आजारच मूळात गंभीर आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या आजारविषयी आपण अधिक माहिती मानसोपचार तज्ञांकडून घेउ शकतात.   माझा आपणास या बाबत प्राथ‍मिक स्वरूपाची माहिती देण्याचा हा प्रयत्न आपणस आवडला असेल अशी मी आशा करतो आ‍‍णि सध्यापूरते थांबतो नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?