आकाशात रंगणार नाट्य !


मित्रांनो, येत्या बुधवारी आकाशात सुर्यास्तापासून काही काळ एक नाट्य रंगणार आहे. यावेळेस चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि रक्तवर्णी लाल दिसणार आहे. ज्याला सुपर ब्लड मुन असी इंग्रजी संज्ञा आहे. आणि ही संज्ञा मराठी संज्ञेपेक्षा जास्त परीचित आहे . त्यामुळे मी पुढच्या लेखात तीच वापरेल.
तर मित्रांनो सतराव्या शतकात एक खगोलशास्त्रज्ञ होवून गेला केप्लर नावाचा. त्याचे ग्रह सुर्याभोवती कसे फिरतात? याबाबतचे 3 नियम विख्यात आहे. त्यातील दुसऱ्या नियमानूसार ते लंबवर्तूळकार मार्गाने सुर्याभोवती प्रदक्षीणा करतात .लंबवर्तुळकार कक्षेच्या दोन केंद्रांपैकी एका केंद्रापाशी सुर्य असतो.ग्रह आणि उपग्रह याचा विचार करता सुर्याचा जागी सबंधित ग्रह आणि ग्रहाच्या जागी उपग्रह ठेवूश या नियमाची पडताळणी घेता येते. आपला चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरताना हे नियम पाळतो. सर्वसाधरणपणे दरवर्षी  जून महिन्यात तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.  त्यामुळे या  वेळेस चंद्रबिंब नेहमीपेक्षा मोठे दिसते.पौर्णिमेला तर हा नजरा बघणे  उत्तमच यावेळी ढग नसले तर आकाशात मोठा प्रकाशमान गोळा असल्यासारखा भास होतो.

आताही जून महिना जवळ आलाच आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या भारताच्या अतिपुर्वेकडून दिसणारे खग्रास चंद्रग्रहण आहे. खग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीत चंद्र पुर्णपणे शिरत असल्याने  पृथ्वीवरून चंद्राकडे बघताना चंद्राचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात शिरताना खुप मोठ्या प्रमाणात विखुरला जात  असल्याचे दिसते. याचे ठळक दृश्य स्वरूप म्हणजे  चंद्रबिंब रक्तवर्णी लाल दिसणे.  
या दोन्हीं गोष्टींमुळे यावेळी चंद्र  रक्तवर्णी लालरंगातील मोठा दिसणार आहे. आपल्या भारतात अधिक स्पष्टपणे बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात  ग्रहणाचा अस्त होताना चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे आपणास ही मज्जा फारसी लुटता येणार नाही. पुर्वोत्तर मणीपूर मिझोराम अरुणाचल आदी राज्यात याचा अधिक आनंद लूटता येईल. चंद्रग्रहण साध्या डोळ्याने बघता येते. सुर्यग्रहणासारखे याबाबत सुरक्षेचे नियम नसतात.  चंद्रग्रहणामुळे डोळ्यांना काहीही इजा होत नाही. ग्रहणे किंवा कोणताही खगोलीय चमत्कार बघणे यामध्ये अशुभ असे काही नाही .पुर्वी विज्ञानाची फारशी प्रगती नसल्याने गैरसमजूतीतून , अज्ञानातून हे समज उदयास आले इतकेच .मग बघताय ना खगोलीय चमत्कार !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?