बातमीतील नेपाळ (भाग 1)

   

    आपल्या भारतात ट्टीटर या समाजमाध्याच्या काही कृतीमुळे हे समाजमाध्यम चर्चेत आले असताना आपल्या शेजारील नेपाळ या देशात भारताच्या संदर्भात तीन घडामोडी घडल्या. त्यातील दोन पुर्णतः आपल्याशी संबधीत आहे, तर एक घडामोड आपले शत्रूराष्ट्र असणाऱ्या चीनविषयक आहे. नेपाळ आपले मित्र राष्ट्र असल्याने या घडामोडीस विशेष महत्व आहे. चला तर मग बघूया या घडामोड 
     तर मित्रांनो, चीनमार्फत करण्यात येणाऱ्या, सिंधूपालचौक या जिल्ह्यातील  एका विकासकामामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे, नेपाळमध्ये चीन विरोधी वातावरण तयार होणे, पंतजंलीच्या कोरोनाविषयक औषधाला नेपाळने बंदी घालणे, आणि  नेपाळच्या पंतप्रधानाने योगाविषयी वादगस्त विधान करणे, यामुळे नेपाळ चर्चेत आला होता.आता बघूया. हे  मुद्दे  सविस्तरपणे.  पहिल्यांदा बोलूया  नेपाळमध्ये तयार झालेल्या चीनविरोधी मुद्याविषयी. 
      तर  नेपाळच्या उत्तरेला असणाऱ्या तिबेटशी नेपाळचा संपर्क भौगोलिक दुर्गमतेमुळे आता आता पर्यंत फारशा नव्हता . मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनमार्फत तिबेट आणि नेपाळदरम्यान संपर्क प्रस्थापित केला जात आहे . त्याच प्रकियेत तिबेट आणि काठमांडू  जिल्हा नेपाळच्या राजधानीचे शहर म्हणजे काठमांडू शहर त्याचा भोवतालचा जिल्हा म्हणजे काठमांडू  या दोन्ही भूभागाला स्पर्श  करणाऱ्या सिंधुपालकचौक या जिल्ह्यात चीन
सरकारची मालकी असणाऱ्या चायना रेल्वे कन्स्ट्रेशन को ऑपरेशन अर्थात CRCC  मार्फत रस्ता निर्मितेचे काम सुरु आहे. त्या अंतर्गत काम सुरु असताना पर्वतात भूस्खलन झाले . या भूस्खलनामुळे सिंधुपालकचौक  जिल्ह्याचा नैऋत्य भागात एका मोठ्या भूभागावर चिखलाचा पूर आला . सन  2015 मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात या भागाची मोठी हानी झाली होती . या भूस्खलनामुळे नेपाळमध्ये चीनविरोधी वातावरण तंग झाले . चीनविरोधात नेपाळमध्ये विविध निर्दशने झाली . चीन भारताचा शत्रू आहे. नेपाळ भारताचा मित्र आहे . त्यामुळे चीन नेपाळ सहकार्य आणि त्यात येणारे चढ उतार आपल्यासाठी महत्वाचा आहे . 
आता बघूया पंतजलीला नेपाळने केलेली बंदी 
          तर पतंजलीने कोरोनासाठी तयार केलेल्या कोरोनील या औषधावर नेपाळने बंदी घातली आहे . कोरोनील हे औषध ऍलोपॅथीच्या औषधांसारखे कोरोनवर प्रत्यक्ष उपचार करणारे नाही.  तर फक्त रोगप्रतिकारकता वाढवणारे औषध आहे . ऍलोपॅथीच्या औषधांसारख्या याचा चाचण्या झालेल्या  नाहीत  सबब कोरोनाच्या उपचारामध्ये याचा कितपत फायदा होतो याचे शास्त्रीय कसोट्यांवर तपासता येतील असे  पुरावे देता येत नाही . असे कारण देत 
भूताननंतर नेपाळने कोरोनाला लाल  सिग्नल दिला आहे . सध्या कोरोना रुग्णाची संख्या नेपाळमध्ये मोठ्या वेगाने वाढत आहे तरी सुद्धा त्याने ही बंदी घातली  आहे हे विशेष . चीनकडून येणाऱ्या लशींच्या दारांवरून  नेपाळ आणि चीनमध्ये वाद निर्माण झाला असताना नेपाळने ही बंदी घातली आहे हे आपण लक्षात घेयला हवे . 
आता बघूया नेपाळच्या पंतप्रधानाने केलेले वादग्रस्त विधानाविषयी . 
तर 20 जून 2021 रोजी आपल्या घरात  आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नेपाळचे सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान  [सध्या नेपाळची संसद विसर्जित केली आहे येत्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नेपाळमध्ये संसदेची निवडणूक आहे त्यामुळे सध्याचे पंतप्रधान काळजीवाहू आहे] के पी ओली शर्मा यांनी योगाचा जन्म नेपाळमध्ये झाला आहे असे विधान केले आहे . सध्या उपलब्ध असणाऱ्या माहितीनीसार योगाचा जन्म उत्तराखंड आणि तिबेट यांचा सिमवेवर असणाऱ्या  असणाऱ्या  कांती सरोवराच्या काठी झाला यावेळी भारत हा देश अस्तित्वातच नव्हता तर एका भूभागाला भारत असे म्हणत असे .त्यावेळी विविध स्वतंत्र राज्य होती .असेही तारे त्यांनी यावेळेस तोडले. भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना भारताचे आणि नेपाळचे युद्ध झाले त्यावेळी तत्कालीन नेपाळमध्ये सध्याचा उत्तराखंड आणि
हिमाचल प्रदेशातील काही भागाचा समावेश होत असे या युद्धात  नेपाळ या युद्धात हरल्यामुळे त्याचा काही भूभाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यात अर्थात भारतात समाविष्ट केला . सध्या नेपाळमध्ये तेथील संसदेच्या निवडणुकीची जोरादार हवा आहे .सध्याचे पंतप्रधान या निवडणुकीत हरू शकण्याची शक्यता या निवडणुकीत व्यक्त केली जात आहे त्यामुळे नेपाळी राष्ट्रवादाला उभारी देऊन निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याचा नेपाळच्या सध्याच्या पंतप्रधानांचा प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी असे विधान केले असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे . 
भारतात अनेक नेपाळी लोक वास्तव्यास आहेत . दोन्ही देशातील सीमा खुली आहे . पासपोर्ट आणि व्हिसा यांची दोन्ही देशासाठी गरज नाही.  भारतीय प्रशासन सेवेत भारतीयांबरोबर नेपाळचे लोक देखील सहभागी होऊ शकतात भारतीय लष्करात नेपाळी लोकांची एक बटालियन आहे . त्या पार्शवभूमीवर या कडे बघायला हवे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?