बातमीतील चीन (भाग 10)

           

सध्याचा जगात कोणत्या देशाशी संबंधित घडामोडी सातत्याने घडत असतील तर तो देश आहे चीन . आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस असे असतात , ज्या दिवशी चीनसंदर्भात काहीतरी घडामोड घडल्याची बातमी येतेच  . चीन आपले शत्रू राष्ट्र तसेच आपल्या बरोबर सुमारे 4,000 किमीची सीमा शेअर करत असल्याने चीनमधील चीनविषयक छोट्यात छोट्या घडामोडीचा आपल्या भारतावर काहीतरी परिणाम होतोच . त्यामुळे  त्या आपणास माहिती असणे आवश्यक आहे . चला तर मग गेल्या काही दिवसात चीनविषयक घडामोडींची माहिती करून घेऊ . 
तर मित्रानो नुकतेच मध्य युरोपातील देश असणाऱ्या हंगेरी या  देशाच्या राजधानीत अर्थात बुडापेस्ट शहरात चीनविरोधी निदर्शने झाली . ज्याचे{ निमित्य होते वैयक्तिक स्वातंत्र्याचा कायम पुरस्कार करणाऱ्या हंगेरी या देशात चीनकडून उभारण्यात येणाऱ्या  विद्यापीठाच्या कॅम्पस  उभारण्याचा नियोजित प्रकल्प .  युरोपात उभारण्यात येणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे .  शांघाय येथील आंतरराष्टीयमुक्त बालीचीस्तान  मानांकित वुडान विद्यापीठाचा कॅम्पस हंगेरीत उघडावा . अशा करार हंगेरीच्या पंतप्रधान असणाऱ्या Viktor Obran  यांनी गेल्या वर्षी चीनबरोबर केला होता त्यानुसार हे विद्यापीठ स्थापन करण्यात  येणार आहे . आंदोलकांनी हे विद्यापीठ नको असे फलक घेऊन हंगेरीच्या विधिमंडळावर मोर्चा काढला तसेच ज्या ठिकणी हे विद्यापीठ होणार आहे तज्ञ ठिकाणच्या आसपासच्या रस्त्यांची नावे फ्री Tibet Road , Save Democracy अशी चीनच्या 
 दुखऱ्या  नसीचा उल्लेख करणारी सुद्धा ठेवली {आपण पण जिये सिंध रोड, स्वतंत्र बलुचिस्तान रोड  अशी रस्त्याची नावे ठेवण्याची कल्पना कशी वाटते ?)  आंदोलकांनी या मुळे कर वाढण्याबरोबर हंगेरी सारख्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नेहमी पुरस्कार करणाऱ्या देशात मानवी हक्काविषयी   फारसे उत्तम रेकॉर्ड नसणाऱ्या देशातर्फे उभारण्यात येणारे विद्यापीठ कशाला असे म्हणत यास विरोध केला आहे 

आता बघूया दुसरी घडामोड , ही घडामोड भारताशी संबंधित आहे . 
गेल्या वर्षी झालेल्या भारत चीन यांच्यामधील गलवान खोऱ्यात झालेल्या खोऱ्यात झालेल्या झडपेमध्ये आपले किती नुकसान झाले या विषयी चीनने चुकीची माहिती दिली आहे . चीन सरकार जरी 4 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत असली तरी प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा मोठा असल्याचा आरोप केल्या प्रकरणी  चीमधील अत्यंत लोकप्रिय ब्लॉगर  La Bi   Xiao Qiu  याला 8 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे .तसेच  त्यांच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसमोर चिनी लष्कराचे सैनिक मेलेले नाहीत . माझी बुद्धी भ्रष्ट झाल्याने मी असे विधान केले असे सांगत माफी मागायला लावली .  अनेक आंतरराष्टीय माध्यमांनी या ब्लॉगरचा हत्येचा निषेध केला आहे . चीनमधील सरकार आपल्या प्रतिष्ठेचा अती प्रेमामुळे चीनने हे कृत्य केले आहे .चीनमधील स्वातंत्रप्रेमी नागरिक ए ऑनलाईन लिहीत नसले तरी त्यानं हे माहिती असल्याचे बोलले जात आहे . या घटनेचा विचार करता भारतातील व्यक्तिस्वातंत्र किती उत्तम आहे . याची साक्ष मिळते चीनमधील अत्यंत  क्रूरपणे चिरडण्यात आलेले तीआनमेन आंदोलन देखील लोकशाहीतील हक्कासाठीच होते  ज्यात किती लोक मरण पावली या बाबत हे आंदोलन  चिरडून  32वर्षे झाली तरी माहिती नाही काही हजर पासून काही लाखापर्यंत विविध दावे करण्यात येतात शांततेचे नोबेल मिळाळेल्या  व्यक्तीला देखील सरकारविरोधी म्हणून चीनमध्ये अटक करण्यात आले होते त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या कडे बघता येऊ शकते असो  चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तपत्रांनी देशविघातकत शक्तींना शिक्षा झालीच पाहिजे असे सांगत याचे समर्थन केले आहे 

आता बघूया तिसरी घडामोड 
  चीनच्या 16 लष्करी विमानांनी  आंतराष्ट्रीय संकेताचा भंग करत मलेशियाचा हवाई हद्दीत प्रवेश  मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करचीनच्या मलेशियातील दूतावासातील अधिकाऱ्याला खडे बोल सुंवण्याची घटना नुकतीच घडली . ज्याप्रमाणे समुद्रकिनाऱ्यापासून काही नॉटिकल मेल ही  त्या देशाची हद्द असते त्याच प्रमाणे जमिनीपासून काही किलोमीटर लांब समुद्रात सुद्धा त्या देशाची हवाई हद्द समजण्यात येते . समुद्री सीमांप्रमाणेच यासाठी कायदे लागू आहेत . त्याच हवाई हद्दीचा भंग केल्याचे मलेशियाचे म्हणणे आहे . चीनच्या मते त्यानी मलेशियाच्या हवाई हद्दीचा भंग केलेला नाही . चीन आंतरराष्ट्रीय कायद्याचा सम्मान करतो .तसेही ती  लष्करी विमान नव्हती तर  वैमानिकांना शिकण्यासाठो योजलेली  विमाने होती ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे चीनचे म्हणणे आहे .चीन दक्षिण चीन समुद्रातील बऱ्याच मोठ्या भूभागावर तो भूभाग  स्वतःचा असल्याचा दावा करतेत्यामुळे त्याचे फिलिपाइन्स , मलेशिया , साऊथ कोरिया , तैवान ( अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना ) जपान या देशांबरोबर समुद्री हद्दीवरून विवाद आहेत . याच विवादित भूभागात ही घटना घडली आहे .  . असो 
चीन हा निदिस्त ड्रॅगन असल्याचे आणि तो जेव्हा जागा होईल तेव्हा जागची झोप उडवेल असे विधान स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या अमेरिकेच्या प्रवाशादरम्यान केलेल्या निरक्षणावरून केले होते . चीनच्या सध्याचा कारवाया बघता तो ड्रॅगन जागा झाला आहे असे वाटते . तो ड्रॅगन पर्यत निदिस्त व्हावा आणिजगात शांतता लाभावी अशी मनोकामना करून सध्यापुरते थांबतो ,नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?