107 वर्षानंतर

   


  28 जून 1914 साली एका सर्बियन नागरीकाने आस्ट्रियन राज्यपुञाची हत्या केली आणी पहिल्या महायुध्दाची सुरवात झाली त्याला 2021 साली 107 वर्षे पुर्ण होतील या 107 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे पहिल्या महायुध्दानंतर युरोपीय राष्टांनी ज्या जर्मनीवर अपमानास्पद अटी घातल्या त्याच जर्मनीचा अशा विश्वास त्याना वाटत आहे. जर्मनी सध्या आपल्या आर्थिक ताकदीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघात सुरक्षा परीषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे. काही वर्षापुर्वी युरोपात आलेल्या पोर्तुगाल, आयर्लंड, ग्रीस स्पेन या देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्यावर जर्मनीनेच त्यांना मदतीचा हात दिला होता. वाहन निर्मिती क्षेत्रात आज जर्मन कंपन्या आघाडीच्या समजल्या जातात . जगातील सात सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा समावेश होतो जगात कोणतीच गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते याचेच हे द्योतक समजता येईल असो

युरोपीय राष्टे अश्या प्रकारे युध्द करतील अशी शंका शका19शतकाच्या अखेरीस आणी 20व्या शतकाच्या सुरवातीस स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केली होती. येत्या रविवारी (4 जूलै 2021) त्यांची 117 वी पुण्यतिथी आहे त्या वेळेस या विषयी अधिक बोलेल तर पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीवर लादलेल्या अपमानास्पद अटी त्यातून राष्ट्रीयत्वाची जर्मन्स मध्ये उदयास आलेली प्रखर भावना. या भावनेतून निर्माण झालेला हिटलरचा उद्य त्याने केलेले अत्याचार (त्या विषयीचे डायरी आँफ अँनफँक हे पूस्तक मी वाचले आहे अंगावर शहारे आणणारा अनुभव होता तो. मुळच्या जर्मन भाषेत असणाऱ्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला आहे. ) या युद्धात जिंकत

असताना हरल्यामुळे जर्मनीचे पडणारे तूकडे शीतयुध्द आणि जगाचे 3 ठिकाणी विभागणे ( युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्रणित भांडवलशाही गट यूनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचा कम्युनिष्ट गट आणि बुध्द फिलॉसॉफी शी साधर्म्य सांगणारा भारताचा ताकदीने काहीसा क्षुल्लक वाटणारा नामचा गट . बहूतेक ठिकाणी नामला बाजूला काढतात मात्र मला ते योग्य वाटतं नसल्याने मी त्याचा उलेल्ख केला आहे हे ते गट ) याचा खुप पुढे सध्याचे जग आले आहे. त्यावेळचे द्विध्रुवीय किंवा त्रीध्रुवीय जग आता  बहुध्रुवीय  होत आहे. पुर्वीच्या अमेरीका , रशिया बरोबर भारत चीन , इंडो पँसिफिक, दक्षीण अमेरीका असे अनेक ध्रुव सध्याचा जगात आहे. पुर्वीची स्पर्धा आता सहकार्यात बदलत आहे.(अर्थात पुर्वी जसा उघड उघड संघर्ष असे, त्याचे स्वरुप आता छूपे झाले इतकेच ) 

अफगाणिस्तान मधील गेल्या 40 वर्षापासून सुरु असणारी अशांतता आणि कोरीया या देशाची विभागणी हे दृश्य बदल वगळता त्यानंतरचे जग पुर्णतः.बदलले आहे. शीतयुद्धाचा शेवटी युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणानंतर पेटलेला वणवा अजूनही शमण्याचे नाव घेत नाहीये . दक्षीण कोरीया आणि उत्तर कोरिया या देशांचे एकत्रीकरणही येत्या भविष्यात अवघड आहे. हे दोन घटक वगळता संपुर्ण जागतिक राजकारण बदलले आहे.
        या कालखंडाचे पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंड, दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड त्यानंतर 1990 पर्यतचा कालखंड ,1990ते 2010पर्यंतचा कालखंड, त्यानंतर 2010 पासून आतापर्यतचा कालखंड असे विभाजन करता येते .पहिल्या दोन्ही कालखंडात युरोपीय राष्ट्राचा प्रभाव जागतिक राजकरणात प्रभाव. होता.  तिसऱ्या कालखंडाचा विचार करता जगावर अमेरीका आणि युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा प्रभाव होता. चौथ्या कालखंडात फक्त अमेरीकेचा जागतिक राजकारणात प्रभाव होता. पाचव्या आणि अखेरच्या कालखंडात जग बहुध्रुवीय झाले. या महायुद्धामुळे पुर्वेकडचे
रोमन साम्राज अशी ओळख असलेल्या आँटोमन साम्राजाचे विघटन होवून त्यातून सध्याचे इराक, सिरीया कुवेत पँलेस्टाइन, सौदी अरेबिया आदी मध्यपुर्वेतील अनेक देश स्वतंत्र झाले . यातील काही प्रदेश लीग आँफ नेशन्स (मराठीत राष्ट्रसंघ) च्या नियमाखाली ब्रिटीश सरकारचे अंकीत प्रदेश बनले .तर काही स्वतंत्र्य देश बनले.
आज या पहिल्या महायुद्धानंतर जगात फारच मोठ्या प्रमाणात बदल झाले . पहिल्या महायुद्धापूर्वीचे जग आणि पहिल्या महायुद्धानंतरचे जग यात जमीन अस्मानाचा फरक आहे . आज या घडामोडीस 107  वर्षे पूर्ण झाली आहेत . मात्र जागच्या इतिहासात याचे महत्व फारच अधिक आहे . जगात इतक्या व्यापक स्तवरावर लढले गेलेलं युद्ध या आधीचा इतिहासात सापडत नाही . आजच्या सुरु झाल्याचा 107 व्य वर्षपूर्तीनिमित्य या युद्धात प्राण गमावलेल्या जीवन भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सध्यापुरती आपली रजा घेतो, नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?