बातमीतील चीन (भाग 13)

     

मित्रांनो , मी माझा या ब्लॉग मधून कालच चीनविषयी लिहले होते. मात्र ते लिहून एक दिवस होत नाही तोच द हिंदूच्या न्युजलेटर्स मधून तीन चीनविषयक बातम्या माझ्या इनबाँक्स येवून धडकलेल्या मला दिसल्या. चीन आपला क्रमांक एकचा शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तर जाणून घेवूया या बातम्यांविषयी.
तर चीनच्या तैशान नावाच्या एका न्युक्लियर पाँवर प्लँटमध्ये नूकताच एक अपघात झाला आहे. ज्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा आहे. चीननुसार  या न्युक्लिअर पाँवर पाँइटमध्ये जरी अपघात झाला असला तरी किरणोत्सर्ग झालेला नाही. हा न्युक्यीलीअर पाँवर प्लँट हा फ्रान्समधील कंपनीच्या मदतीने सन2018मध्येच उभारण्यात आला होता. चीनच्या मते काही विशेष अपायकारक नसणारे वायूचा उत्सर्ग येथून झाला आहे. चीन जरी फार काही झाले नाही,असे म्हणत असला तरी चीनने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना येथे प्रवेश निषिध्द केला आहे. चीनच्या या न्युक्यिलर प्लँटचा जवळपास मोठी शहरे नाहीत. काही खेडी आहेत .त्यामुळे येथे जास्त लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता कमी आहे.  मात्र तो चीन आहे. एखाद्या आपत्तीचा वेळी झालेले नुकसान , एखाद्या आंदोलनाच्या वेळी मारले गेलेले, अटक केलेल्या लोकांचा आकड्याविषयी खरी माहिती न देण्याविषयी तो कुप्रसिद्ध आहे. हे आपण विसरायला नको.असो.

    दुसरी बातमी अमेरीकेच्या संरक्षण खात्याने अर्थात पँटागाँनने चीनविरोधात नौदलाची विशेष तूकडी पँसिफिक महासागरात कायमस्वरुपी तैनात करण्यास मंजूरी दिली आहे. सुमारे 100 दिवसापूर्वी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांनी प्रसंगी नाटोची (नाँर्थ अटलांटीक ट्रीटी आँरगायझेशन ) मदत घ्यायला लागली तरी चालेल, मात्र चीनच्या लष्करी विस्तारवादी महत्वकांक्षेला रोखले पाहिजे असे विधान केले होते.त्यानंतर सुमारे सव्वातीन महिन्यानंतर पँटागाँनने पँसिफिक महासागरात अमेरीकी नौदलाची विशेष तूकडी नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.चीन पँसिफिक महासागराचा एक भाग असलेल्या दक्षीण चीन समुद्रात प्रचंड कुरापती करत आहे, हे आपणास ज्ञात आहे. चीनची ही दादागिरी पँसिफिक महासागर आणि हिंदी महासागर यांना जोडणाऱ्या सिंगापूर जवळच्या सामुद्रधूनीद्वारे( दोन मोठ्या समुद्राला जोडणाऱ्या अरुंद पाण्याचा पट्ट्याला सामुद्रधूनी म्हणतात.{ जर हा अरुंद पट्टा दुसऱ्या बाजुला मोठ्या  पाण्याला स्पर्श करत नसेल तर त्यास खाडी म्हणतात तसेच समुद्राचे पाणी नदीत  ज्या हद्दीपर्यत घूसते त्यास खाडी म्हणतात उदा कल्याणची खाडी ,ठाण्याची खाडी, उल्हास नदीची खाडी, वसिष्ठी नदीची खाडी वगैरै} ) हिंदी महासागरात देखील येत आहे, हे आपण जाणतातच .त्याला यामुळे अटकाव होवू शकतो.असे आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. 


आता बघूया तिसरी बातमी 
तर मित्रांनो ,चीनने त्यांचा अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी या 29एप्रिल 2021रोजी  अंतराळात सोडलेल्या भागावर अर्थात "टिआंग्वे' वर   तीन अंतराळवीर राहण्यासाठी गेले आहेत. चीनच्या शेनझाँवे 12  या राँकेटमधून ते गेले आहेत. चीनच्या प्रस्ताविक अंतराळ स्थानकाच्या विविध भागांपैकी हा सर्वात महत्तवाचा आणि मोठा भाग आहे. जो सध्या पृथ्वीपासून 340 ते 380 किमी अंतरावरुन पृथ्वीभोवती फिरतोय. टिआंग्वे यासारखे विविध भाग पृथ्वीवरून अंतराळ सोडल्यावर अंतराळातच त्यांची आपसात जोडणी करून सन2022पर्यत अंतराळात नविन अंतराळ स्थानक बांधण्याचा चीनचा मानस आहे. सध्या प्रस्तावित असणारे.हे अंतराळस्थानक बांधून झाल्यावर आकाशात दोन अंतराळ स्थानक असतील.एक रशियन.स्पेस आँरगायनझेन , युरोपीय स्पेस आँरगानझेन, कँनडीयन स्पेस आँरगयानझेशन आणि नासाची संयुक्त भागीदारी असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि दुसरे हे चीनचे.
    सध्या ज्या गतीने चीनविषयक बातम्या येत आहेत. ते बघता स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे चीन जागा झाला असून जगाची झोप उडवण्यास सुरवात करत आहे, याची साक्ष पटते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?