बातमीतील लक्षद्विप (भाग2)

 

  लक्षद्विप, आपल्या भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित  प्रदेश असणाऱ्या आणि निसर्गाची मुक्तहस्ताने सौदर्याची उढळण झाली आहे, असा प्रदेश . सध्या मात्र दोन गोष्टीमुळे अत्यंत चर्चेत आला आहे. त्यातील एक गोष्ट सुखवणारी  तर गोष्ट काहीसी चिंताजनक वाटणारी आहे. चला तर जाणून घेवूया या दोन्ही घटनांविषयी. पहिल्यांदा चिंता वाढवणाऱ्या घटनेविषयी बोलूया .
तर लक्षद्विपच्या प्रशासकाने आणलेल्या काही प्रस्तावित बदलांमुळे लक्षद्विपचे समाजजीवन ढवळून नीघत आहे. हे आपण जाणतातच.(ज्यांना त्या विषयी माहिती करुन घेयची आहे. त्यांनी माझी या आधी या विषयावर  लिहलेला लेख वाचावा. तूम्हाला तो लेख शोधणे सोपे व्हावे यासाठी या लेखाच्या खाली त्या लेखाची लिंक देतो. तिथे क्लिक करुन तूम्ही वाचू शकता ) तर या विषयी एका मल्ल्यालम भाषेतील वृत्तवाहिनीवर बोलत असताना लक्षद्विप येथील सिने अभिनेत्री, सिनेदिग्दर्शक आसीया सुलतानी यांनी सध्याचा प्रशासकांचा उद्देश लक्षद्विप हा मुस्लिम बहुल प्रदेश असल्याने येथे जैविक शस्त्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे विधान केले .या दाव्याच्या पुष्टतेसाठी त्यांनी सदर प्रशासक येण्याचा आधी असणारी कोरोनाची स्थिती, प्रशासकांनी कोरोना विषयक नियम बदलल्यावर वाढलेली संख्या यावर बोट ठेवले. {डिसेंबर 2020 पर्यत लक्षद्विपमध्ये  कोरोना रुग्णांची संख्या शून्य होती. कारण बाहेरच्या व्यक्तींना सक्तीचे काँरटाईन होते. सध्याचा प्रशासकाने यात बदल करत निगेटिव्ह आर टी पिसार कागद पाहिजे असा बदल केला.} आसीया सुलतान यांच्या या दाव्यावर लक्षद्विपच्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष  असणाऱ्या सी अब्दूल काझी यांनी त्यावर  आक्षेप घेत आसिया सुलतानी यांनी देशद्रोह केल्याचा आरोप केला.[या बदलाच्या प्रस्ताव सध्या गृहमंत्री अमित शहा यांच्या टेबलावर पडला आहे. त्यांनी  मंजूरी दिल्यावर मोदींचे मंत्रीमंडळ त्यास मान्यता देईल. नंतर राष्ट्रपतीची सही होवून कायदे.लागू होतील ] सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाची परीभाषा करताना या आधी किमान तीन खटल्यांमध्ये नुसते.वक्तव्य केल्याने देशद्रोह होत नाही. त्यामुळे कोणी कृती केली तर आणि तरच देशद्रोह होतो , हे स्पष्ट केले आहे, हे आपण लक्षात घेयला हवे. सध्या कोरोनाविषयक चर्चामध्ये जागतिक स्तरावर चीनने जैविक शस्त्र म्हणून कोरोना वापरल्याचा मुद्दा उपस्थित आहे. भारताने जैविक शस्त्रे विरोधी जागतिक करारावर सही केली आहे. या आरोपामुळे चीनचा रोख भारतावर येवू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असो. 

आता बघुया सकारात्मक घटना .
तर एकुण लोकसंख्येपैकी 60% लोकसंख्या मासेमारीवर अवलूंबन असणाऱ्या लक्षद्विपमध्ये नुकताच एका गोष्टीस प्रायोगिक तत्वावर सुरवात झाली आहे. जर या गोष्टीस उत्तम प्रतिसाद मिळाल्यास येत्या 15 सप्टेंबर पासून सदर गोष्ट कायमस्वरुपी करण्यात येण्याची घोषणा लक्षद्विपच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ती गोष्ट आहे बंगोलर येथील सिश्मा फुड प्रायव्हेड लिमिटेड या कंपनीच्या मदतीने लक्षद्विपमध्ये सापडणाऱ्या टुना मास्याची निर्यात जपानला करण्याची..जर.ही गोष्ट यशस्वी झाल्यास लक्षद्विपमधील नागरीकांचे राहणीमान प्रचंड प्रमाणात सुधारण्याची आशा यामुळे व्यक्त करण्यात येत आहे.
लक्षद्विप भारतासाठी अत्यंत महत्तवाचे आहे. समुद्रामार्गे होणाऱ्या जागतिक व्यापारापैकी मोठा हिस्सा लक्षद्विपचा जवळुन जातो.त्यामुळे तेथील घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. मी त्याच हेतूने.मी आपणास हे सांगीतले, जे तूम्हाला आवडले असेल, असे मानून सध्यापूरते थांबतो, नमस्कार 


लक्षद्विपविषयीच्या सध्याची समस्या सांगणाऱ्या लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?