सन 2021 मधील सहाव्या मन की बातच्या निमित्याने

   


        27 जून 2021  रोजी पंतप्रधान यांनी त्यांच्या महिन्याचा शेवटचा रविवारी होणाऱ्या  मासिक संबोधनात अर्थात मन की बात मध्ये संबोधित केले .नेहमीप्रमाणे व्यवस्थापनाच्या तिसऱ्या प्रकारातील अर्थात महत्वाच्या  मात्र तात्काळ केली नाही तरी चालू शकेल  अश्या गोष्टींचा त्यात समावेश होता . व्यवस्थापनाच्या दृष्टीने पहिल्या प्रकारात येणाऱ्या अर्थात महत्वाच्या आणि तात्कळ करावयाच्या कामांविषयी याविषयी देखील इतर मन की बातप्रमाणे याही मन की बात मध्ये मौन बाळगले गेले . 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आपल्या संबोध

नाची सुरवात ऑलम्पिक स्पर्धीविषयी बोलून केली . काही दिवसात भारताचा ओलम्पिकचा संघ  ऑलम्पिक स्पर्धेसाठी टोकियोला जाणार आहे. त्या अनुषंगाने काही खेळाडूंचा परिचय त्यांनी आपल्या संबोधनात केला . तसेचखेळाविषयी तसेच ऑलम्पिक विषयी इच्छुकता निर्माण व्हावी या हेतूने ऑलम्पिक मध्ये भारताला  सर्वाधिक  पदके कोणत्या खेळात मिळाले आहेत तसेचसर्वाधिक  वैयक्तिक पदके कोणी मिळवले आहेत याविषयी प्रश्न विचारले . या प्रश्नाचे उत्तर आपण नमो ऍप आणि www. my gov.in या संकेतस्थळावर देयचे आहे मागील काही मन की बातमध्ये प्रत्यक्ष  किंवा प्रत्यक्ष  आणि  अप्रत्यक्षरीत्या आरोग्यविषयक काम करणाऱ्या लोकांशी वार्तालाप केल्यावर, या मन की बातमध्ये  सध्या लशीकरणाबाबत देशभरात असणाऱ्या विविध गैरसमजुती दूर करण्यावर भर दिला. या बाबत त्यांनी मध्यप्रदेशमधील दोन खेडुतांशी संपर्क साधला . तसेच लशीकरणाबाबतची स्थिती सांगितली लोकांना लशीकरणाबाबत आवाहन केले . तसेच आगामी 74 व्या स्वतंत्रदिनाच्या निमित्याने आयोजित स्पर्धेविषयी देखील त्यांनी आपल्या संबोधनात उल्लेख केला . 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशभरात वाढलेले इंधनाचे दर आणि वाढत्या मानसिक अनारोग्याविषयी मन की बात मध्ये  काहीतरी बोलणे , मला अपेक्षित होते . मी नमो ऍप वर देखील हा विषय मांडला आहे . बघूया कधी या विषयाचा नंबर येतो एकंदरीत मागच्या अनेक मन की बात प्रमाणे मागच्या पानांवरुन पुढे चालू असेच याही मन की बातचे स्वरूप होते . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?