फितूरीची 264वर्षे!

 

 आज 23 जून 2021अर्थात भारताच्या इतिहासातील एका काळकुट्ट्या फितूरीच्या अध्यायाला 264 वर्षेज्यामुळे  पुर्ण होण्याचा दिवस . आजच्याच दिवशी 264 वर्षापुर्वी, अर्थात 23 जून 1757 साली बंगालमध्ये फितूरीच्या मार्गाने ब्रिटीशांनी बंगाल प्रांत घश्यात घातला, आणि ब्रिटीशांची सत्ता भारतावर सुरु झाली. जी 1947आँगस्ट 15 अर्थात पुढील 190 वर्षे होती. या फितूरीच्या मार्गाने बंगाल इंग्रजांनी ताब्यात घेण्याचा घटनेस आपण प्लासीची लढाई म्हणतो. आज 2021 जून 23 रोजी या प्लासीच्या लढाईला 264 वर्षे पुर्ण झाली .
        ब्रिटीशांनी त्यावेळच्या कलकत्याचा वखारीभोवती भिंत बांधली. जी तत्कालीन बंगालचा सत्ताधिश सिराज उद्देला यांनी पाडण्याचा आदेश दिला. जो ब्रिटिशांनी धुडकावला. त्यातून उद्भवलेले युद्ध म्हणजे प्लासीची लढाई. या लढाईत सिराज उद्देला यांनी फ्रेंच इस्ट इंडियाची मदत घेतली. या लढाईत ब्रिटिशांपेक्षा सिराज उद्देलाचे सैन्य संख्येने जास्त होते. मात्र सिराज उद्देला यांच्या माजी सेनापती मीर कासीम  याने फितूरी करत आपले सैन्यच प्रत्यक्ष लढाईत उतरवले नाही. परीणामी सिराज ऊद्देला यांचा पराभव झाला. ज्याची परीणीती बंगाल ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यास झाली. ज्यामुळे त्यावेळच्या भारतातील एक समृद्ध प्रांत परकीय सत्तेचा आहारी गेला. या नंतर ब्रिटिशांचा आत्मविश्वास वाढला आणि हळू हळू काही मोजका भाग वगळता सर्व  देश त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या  ताब्यात आला. एका फितूरीमुळे हे सर्व घडले. त्यावेळच्या बंगालमध्ये सध्याचा बिहार, झारखंड ओडिसा, पश्चिम बंगालया भारताच्या राज्यासह ,  बांगलादेशातील सिल्हेट जिल्हा वगळता संपूर्ण बांगलादेश इतक्या मोठ्या भूभागाचा समावेश  होतो . 

प्लासीच्या लढाईत केलेल्या फितूरीचे बक्षीस म्हणून मीर कासीम यास ब्रिटीशांच्या वतीने बंगालचा नवाब म्हणून नेमण्यात आले. मात्र त्याचे देखील आपल्या मालकासी अर्थात ब्रिटिशांशी पटले नाही. त्यामुळे मीर कासीमच्या मालकाने अर्थात ब्रिटीशांनी त्याचा जावयास बंगालचा नवाब बनवले. या सर्व संघर्षात प्लासीच्या लढाईनंतर 9 वर्षांनी बक्सारची लढाई झाली. आणि ब्रिटीश त्यावेळच्या बंगालचे म्हणजेच आताच्या बिहार झारखंड ओडीसा पश्चिम बंगाल बांगलादेशचा सिल्हेट जिल्हा वगळता संपुर्ण बांगलादेश इतक्या मोठ्या राज्याचे राजे बनले.
या कार्यकाळात महाराष्ट्रात काय घडत होते याचा विचार करता 1761 साली पानिपतचे तिसरे युद्ध मराठी भाषिकांनी लढले.  भारतावर प्रचंड परीणाम करणाऱ्या या घटना.  या  प्लासी आणि त्यांचे छोटे भाग असणाऱ्या  बक्सारच्या लढाईमुळे भारत वेगाने बदलला हे नाकारून चालणार नाही. (छोटी गंमत 1756, 1761,1765 या तीन वर्षाची सरासरी 1760 येते. जो आकडा मराठीत विशेष प्रसिद्ध आहे)
बंगालमध्ये राजा राममोहन राँय सारख्या समाजसुधारकांचा जन्म, आँगस्ट हिकी या ब्रिटीश माणसाकडुन भारतातील पहिले वर्तमानपत्र (या पहिल्या वर्तमानपत्रामुळे नाही, पण या नंतर निर्माण झालेल्या इतर वर्तमानपत्रामुळे समाजात  जागृती होण्यास मदत झाली. ) तसेच देशात सर्वत्र एकच व्यवस्था असण्याचा पाया या प्लासीच्या लढाईने घातला. या बदलाला अनकुल स्थिती प्लासीच्या लढाईमुळे निर्माण झाली. जर प्लासीची लढाई झाली नसती.तर आपल्या भारतात अनेक वेगवेगळे देश अस्तिवात  बराच काळ अस्तिवात राहिले असते हे नक्की .आपण एक देश  आहोत ही भावना  भारतीयांमध्ये उभी राहण्यात प्लासी लढाईचे मोठे योगदान आहे, हे नाकरण्यात काही अर्थ नाही. म्हणजेच जरी आपण ही लढाई हारलो आणि त्यामुळे आपणावर परकीय चक्र आले असले तरी या लढाईने आपणास बरेच काही शिकवले. हे नक्की .
आज या घटनेस 264वर्षे पुर्ण झाली आहेत. 264वर्षे हा मोठा कालखंड आहे.त्यावेळचे ठोकताळे पुर्णतः बदलले आहेत, त्यामुळे या घटनेचे आजचे ठोकताळे वापरुन आकलन करणे चूकीचे आहे. त्यावेळचे ठोकताळे वापरुनच हे करायला हवे.असो. 
प्लासीच्या लढाईबाबत खुप काही बोलता येवू शकते. मात्र हे समाजमाध्यमांवरील लेखन आहे. वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे हे मोठे करता येणे अशक्य आहे. तरी ईथेच थांबतो.नमस्कार  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?