बातमीतील पाकिस्तान( भाग7)

   


        पाकिस्तान, आपल्या भारतातील दहशतवादी कारवायांना जवाबदार असणारा देश. पाकिस्तानातील जवळपास सर्वच राजकीय सामाजिक घटनांचा  आपल्या भारतावर काहीना काही परीणाम होतोच. त्यामुळे त्यांच्या विषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. तरी चला तर मग        गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयी मात्र भारतावर परीणाम करणाऱ्या 5 घटनांचा परामर्श घेवूया .
तर मित्रांनो, पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात झालेले बदल, पाकिस्तानने अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या आझाद काश्मीरचा पंतप्रधानाने केलेले वक्तव्य, पाकिस्तानच्या पंतप्रधानाने त्यांच्या संसदचेच्या नँशनल अस्मेंलीमध्ये मध्ये केलेले एक वादगस्त वक्तव्य आणि शांघाय काँपरेशन आँरगायनाझेशनच्या राष्ट्रिय सुरक्षा सल्लागारांचा परीषदेत भारताचे  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला उद्देश्यून केलेले वक्तव्य,  पाकिस्तानला युनाटेड किंग्डम या देशांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक या 5घटनांमुळे पाकिस्तान गेल्या जागतिक पातळीवर  आठवड्यात चर्चेत आला होता.
आता बघूया या घडामोडी सविस्तरपणे.पहिल्यांदा शिक्षणाचा विचार करुया 

तर सन 2001 पासून पाकिस्तानात सुरु असणाऱ्या शैक्षणिक धोरणात मोठे धोरणात्मक बदल करण्याचे पाकिस्तानने ठरवले आहे. ज्यामुळे पाकिस्तानमधील शालेय शिक्षण आणि मदरस्यातील शिक्षण यातील दरी

कमी होईल. आजमितीस पकिस्तानात 25 लाख विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. तर साडे बावीस लाख विद्यार्थी शालेय शिक्षणापासून दूर राहत मदरस्यांमधून शिकत आहे. यात तीन.टप्पे असून पहिल्या टप्यात पहिली ते तिसरीपर्यतच्या शिक्षणाचा समावेश होतो. दुसऱ्या टप्यात सहावी पर्यतचा तर तिसऱ्या टप्यात सहावी ते बारावी पर्यतचा समावेश होतो.पहिला टप्पा या आधीच बदलण्यात आला आहे. पुढील दोन टप्पे 2023पर्यत कमी करण्याचे पाकिस्तानचे उदिष्ठ आहे. या कार्यक्रमास पाकिस्तानने नँशनल स्कुल करीक्युलम असे नाव दिले आहे,ज्यानुसार पाकिस्तानात कुराणाचे शिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्यांकावर धार्मिक शिक्षणाची सक्ती होवू नये यासाठी त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम पाकिस्तानच्या शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात येत असल्याचे डेक्कन क्रोनीकलच्या बातमीत म्हंटले आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे मदरस्यांची स्थिती सुधारण्याऐवजी शालेय शिक्षणाची स्थिती बिघडण्याचा धोका असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
आता बघूया दुसरी घडामोड 
तर पाकिस्ताने अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या आझाद काश्मीरच्या 2016पासून पंतप्रधानपदी असणाऱ्या फारुक हैदर खान यांनी आझाद काश्मीरला कदापी पाकिस्तानचा पुर्ण प्रांत बनवता येणार नाही. माझा त्यास
कायमचा विरोध आहे. असे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री शाह मोहमद्द कुरेसी यांनी आझाद काश्मीरविषयी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते.आझाद काश्मीरविषयी काहीही निर्णय घेताना काश्मीरींना समाविष्ट करुन घेतलेलेच पाहिजे असेही ते म्हणाले.फारुक हैदर खान   हे पाकिस्तानने अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या आझाद काश्मीरचे 2016आधी 2008ते2010 या कालावधीत सुद्धा पंतप्रधान होते.
आता बघुया तिसरी घडामोड 
तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या संसदेच्या नँशनल अस्मेंली या सभागृहात अमेरीकेने पाकिस्तानात केलेल्या कारवायांविषयी बोलताना दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा उल्लेख शहिद म्हणून केला. ते उर्दूतून बोलत होते. आपल्या वक्तव्यावर वाद होत आहे. हे बघून त्यांनी मला असे म्हणायचेच नव्हते. माझ्या तोडूंन चूकुन निघालेल्या वक्तव्याचा विपर्यास माध्यमांकडून करण्यात आला , असी सावरासावर केली.कोणत्याही देशाच्या संसदेत पंतप्रधान राष्ट्रपती यांनी केलेले वक्तव्य त्या देशाची भविष्यातील वाटचाल दाखवणारे असते, ते बघता या गोष्टी तील गांभिर्य लक्षात येते.
आता बघूया चौथी घडामोड 
तर सध्या शांघाय काँपरेशन आँरगायझेशन या बिजिंग येथे मुख्यालय असणाऱ्या संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परीषद तजाकिस्तान या मध्य आशियाची राजधानी तौशांबे सुरु आहे. (【मध्य आशियातील भुतपुर्व यु एस एस आर चा घटक असणाऱ्या मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने असणाऱ्या पाच देशांपैकी एक देश म्हणजे तजाकिस्तान] { या संघटनेत तुर्कमेनीस्तान या मध्यपुर्वेतील देशाचा अपवाद वगळता अन्य चारही देश म्हणजेच कझाकिस्तान, किरीगिस्तान, उझकेबिकस्तान .तजाकिस्तान या देशांसह रशिया
भारत पाकिस्तान चीन हे सदस्य देश आहेत})  बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहमद्द युसुफ यांना स्पष्ट शद्बात पाकिस्तान   दहशतवाद्यांना करत असलेली  आर्थिक मदत तात्काळ थांबवण्यास सांगितले. ज्याला अन्य सदस्य राष्ट्रांनी संमती दिली. यावर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र त्यास कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. परीषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात देखील पाकिस्तानी प्रतीसादावर विशेष भाष्य करण्यात आलेले नाही.  
आता बघूया पाचवी घडामोड 
तर सध्या भारत आणि युके दरम्यान अनेक बाबतीत करार होत आहेत. ज्यामध्ये भारतातील आयटी तज्ज्ञांना युकेत नोकरीच्या संधी ,  भारतीयांना युकेत आणि युकेच्या नागरीकांना सवलतीत प्रवेश , व्यापारविषयक सवलती देवू करण्याबाबतचे करार आदी सारख्या अनेक बाबींचा  समावेश आहे. असे करार युकेने पाकिस्तानबरोबर देखील करावेत यासाठी पाकिस्तान.प्रयत्नशील होते.त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यूकेला जाणार होते. मात्र युकेने पाकिस्तानबरोबर असे करार करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे ओव्हरसीस नागरीकांचा (नाँन रेसिडन्ट पाकिस्तानी) विचार करता सौदी अरेबिया ,युएई नंतर तिसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानी ओव्हरसीस नागरीक युकेमध्ये राहतात. त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे बघावे. पाकिस्तानने हा दौरा स्वतःहुन रद्द करत असल्याचे जाहिर केले.तर बिबिसीने दिलेल्या बातमीनूसार युकेने इम्रान खानचा हा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे इम्रान खान युकेच्या दौऱ्यावर जाणार नाहीत.
कायम भारताशी बरोबरी करण्यास उत्सुक असणाऱ्या पाकिस्तानचे वारंवार अपयशी ठरणारे प्रयत्नच यामुळे दिसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
ताजा कलम :हा लेख लिहीत असताना पाकिस्तान बाबत अजून 4 घडामोडी घडल्याचे समजले त्याविषयी पुढच्या भागात बोलेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?