बातमीतील पाकिस्तान (भाग8)

 

  मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयक 9 घडामोडी घडल्या. त्यातील 5 घडामोडींंविषयी मी कालच लिहले होते.आज बघूया उरलेल्या 4घडामोडी.
     तर काल न लिहलेल्या 4 घडामोडी , पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये कायम राहणे, CPEC च्या कामांविषयी नकारात्मक बातम्या माध्यमात प्रसिद्ध होणे, पाकिस्तानाच्या लष्करप्रमुखांच्या हत्येचा कट उधळून लावल्याची बातमी माध्यमांमध्ये येणे आणि भारताला मुंबई हल्ल्या प्रकरणी हवा असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून मान्यता मिळालेई हफिस सय्यद याचा घराजवळ बाँम्बस्फोट होणे, या आहेत.आता बघूया या घडामोडी सविस्तरपणे .
तर सन 2000 मध्ये स्थापन झालेल्या FATF अर्थात फायनासियल अँक्शन टास्क फोर्सच्या ग्रे देशांच्या यादीत पाकिस्तान कायम राहिला आहे. पाकिस्तान सध्या तिसऱ्यांंदा FATF च्या ग्रे  यादीत आहे. या आधी पाकिस्तान

2008 मध्ये  पहिल्यांदा ग्रे यादीत सहभागी झाला होता.जो 2009 मध्ये बाहेर पडला . त्यानंतर 2013ला परत पाकिस्तान या यादीत आला जो 2015 मध्ये बाहेर पडला. नंतर 2018 ला पुन्हा यादीत समाविष्ट झाला जो आजपर्यत आहे. मागच्या वर्षी FATF ने 27 उदिष्टे पाकिस्तानला पुर्ण करण्यास सांगितले आहे. त्यापैकी 26 उदिष्टे पुर्णतः किंवा अंशतः पुर्ण झाली आहेत. दहशतवाद्यांविरोधीचे उदिष्ट जे अत्यंत महत्तवाचे आहे ,ते पाकिस्तानने पुर्ण केलेले नाही असे आंतरराष्ट्रीय पातळीवर समजण्यात येते. पाकिस्तानने ग्रे लिस्ट मध्ये कायम राहण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची केलेली निंदालस्ती कारणीभूत ठरली असल्याचा आरोप केला आहे.FATF चे भारतासह 39 सदस्य देश आहेत. देशात काळ्या पैसाची निर्मिती कसी होते? काळा पैसा  कसा खर्च होतो? त्याचे अर्थव्यस्थेतील प्रमाण किती ? या बाबींचा अभ्यास करुन FATF ची ब्लँक लिस्ट (सर्वात धोकादायक ) ग्रे लिस्ट (मध्यम धोकादायक) आणि उत्तम असी वर्गवारी होते. ग्रे आणि ब्लँक लिस्टमधील देशांवर अनेक बंधने FATF कडून लादण्यात येतात.  
  आता बघूया दुसरी घडामोड .
तर चीनच्या बिआरओ अर्थात बिल्ड अँड रोड इनेसेटिव्ह मधील महत्तवाचा भाग असलेल्या सिपेक म्हणजेच चायना पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडाँर मधील कामे अपेक्षीत गतीने होत नसल्याने, चीनने त्यांचा पाकिस्तानातील दूतावासामार्फत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या आधी अप्रत्यक्षरीत्या चीन याबाबत सातत्याने सांगत होताच. ते आता उघडपणे सांगितले आहे. ही गती वाढवण्यासाठी चीन आता पाकिस्तानी केंद्र सरकार, प्रांतीय सरकारे यांच्या बरोबर अन्य राजकीय पक्ष , नेते, लष्कराबरोबर चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे चीनच्या पक्षाला 100 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आयोजीत कार्यक्रमात जाहिर करण्यात आले  आहे. सिपेकच्या 

कामांविषयी बलूचिस्थानात या पाकिस्तानच्या क्षेत्रफळानूसार सर्वात मोठ्या मात्र लोकसंख्येने अत्यंत विरळ असलेल्या प्रांतात असंतोष आहे. बलूचीस्थान खनिजसंपत्तीने समृद्ध असून देखिल त्याचे फायदे बलूची लोकांना मिळत नाहीत. सिपेकमुळे या शोषणात तर वाढच झाली आहे, असी बलूची लोकांची भावना आहे. सिपेकमधील रस्त्यांची कामे कमी गतीने होत असल्याने चीनकडून यासाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्यात अनियमीतता झाली आहे, ज्याचा परीणाम अजून गती मंदावण्यात झाली आहे .
आता बघूया तिसरी घडामोड 
तर मुळचे पाकिस्तानी नागरीक मात्र दे लंडनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका व्यक्तीने  युट्युब व्हिडिओ पाकिस्तानी  लष्कर प्रमुखांना  ठार मारण्याचा  प्रयत्न झाल्याचा आणि या कारणासाठी पाकिस्तानी लष्करातील काही अधिकारी , जवान तसेच अन्य संरक्षण दलातील काही जणांना पकडल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानात लष्कराचा राजकरणात मोठा सहभाग आहे. तेथील लष्कर अनेक उद्योगधंदे देखील चालवते.  लष्कराने 
आतापर्यंत  तीनदा  देशाचे प्रशासन देखील चालवले आहे.ज्यामध्ये1956ते1971,1978ते1987 आणि 1999ते 2003 या काळाचा समावेश होतो. त्या लष्कराचा प्रमुखांना मारण्याचा प्रयत्नहोणे किती धोकादायक आहे, हे वेगळे सांगायला नकोच. सदर व्यक्ती जरी पाकिस्तानचा नागरीक असला तरी भारताला साह्य होईल असी भुमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
आता बघूया चौथी घडामोड.
तर मुंबई हल्ल्याप्रकरणी भारताला हवा असणारा आणि पाकिस्तानात समाजसेवकचा मुखवटा घेवून फिरणारा व्यक्ती ज्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून मान्यता मिळाली आहे, अस्या हफिज सय्यद याचा लाहोरच्या घराजवळ बाँम्बस्फोट झाला आहे. हफिज सय्यद त्यांच्यावर असलेल्या खटल्यासाठी न्यायालयात जात असताना हा स्फोट झाला आहे. पाकिस्तानने याबाबत भारतावर दोषारोप ठेवले आहे. आबोटाबाद येथे अमेरीकेने जसे ओसामा बिन लादेन यास मारले तस्या प्रकारे  हफिज सय्यदला मारण्याचा भारताचा पवित्रा होता , असा पाकिस्तानचा कांगावा आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आणि भारताकडून वारंवार त्याचा दहशतवादी कारवायांचे पुरावे देवून सुद्धा ते गुन्हा सिद्ध होण्यास पुरेसे नाहीत, असे कारण देत पाकिस्तान त्यांच्यावर योग्य कारवायी करत नाहीये.
पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचे शेपुट असून ते कधीच सरळ होणार नाही, हेच यातून सिद्ध होतयं , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?