जगाचा भूगोल बदलताना ...

       


   मित्रानो , आपल्या भारतात कोरोनाच्या लसीवरून  विविध दावे केले जात असताना सध्या जगाचा प्राकृतिक भूगोल  बदलण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे आणि या बदलला कारणीभूत आहे , नॅशनल जोग्रिफिकल सोसायटी  या संस्थेमार्फत जगात पाचव्या महासागराच्या अस्तित्वाला देण्यात आलेली मान्यता . नॅशनल जोग्रिफिकल  सोसायटी ही भूगोलाचा क्षेत्रात कार्यरत असणारी एक गैर सरकारी संस्था आहे . या संस्थेमार्फत सन 1915 पासून  जगात नकाश्यांचे  प्रमाणीकरण करून ते  प्रसिद्ध करण्यात येतात .  त्यांनी 8 जून असलेल्या जागतिक महासागर दिनाचे निमित्य साधत जगात पाचव्या महासागराच्या अस्त्विवाला मान्यता दिली आहे . 

   तर मित्रानो  जगात 8 जून पासून पॅसिफिक , अटलांटिक भारतीय  सदर्न ओशन आणि आर्टिक ओशन असे पाच महासागर असतील . मी वर ज्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे तो त्यांचा उतरता क्रम आहे , जगातील समुद्र अभ्यासक अनेक वर्ष या महासागरला अधिकृत दर्जा द्यावा अशी मागणी करत होते त्यांची मागणी अखेर पूर्ण करण्यात आली आहे  लवकरच या महासागराचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल . 


अंटार्टिका खंडाच्या सभोवताली असणाऱ्या अंटार्टिका सर्क्युलर करंट पासून अंटार्टिका खंडाकडे जाताना समुद्रातील जैवश्रुष्टीत स्पष्टपणे दिसतील असे बदल आढळून येत असल्याने तसेच येथील पाण्याचे गुणधर्म लक्षणीयरीत्या बदलत असल्याने या समुद्रास अन्य महासागरापेक्षा स्वतंत्र दर्जा देण्यात यावा अशी समुद्र संशोधकांची मागणी होती जी आता मान्य करण्यात आली आहे . सर्वसाधारपणे 60 अंश दक्षिण अक्षवृत्तापासून हा समुद्र सुरु होतो . या अक्षवृतावरील काही भाग वगळता अन्य सर्व भाग या नवीन महासागरता समाविष्ट होतो सुमारे तीस लाख वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका या खंडापासून अंटार्टिका वेगळा झाल्यावर या महासागराची निर्मिती झाली असे मानण्यात येते . 

 हा महासागर जगात आजमितीस असणाऱ्या पाच महासागरांपैकी चवथ्या क्रमांकाच्या महासागर आहे उत्तर ध्रुवानजीक असणारा आर्टिक महासार याच्या पेक्षा लहान आणि सर्वात छोटा महासागर आहे . या महासागरापेक्षा लगतचा मोठा महासागर हा हिंदी महासागर आहे  हा नवीन महासागर पुर्णतःअ दक्षिण गोलार्धात आहे आर्टिक महासागराच्या पूर्णतः दुसऱ्या टोकाला हा नवीन महासागर आहे 

मित्रानो जगात नवीन घडणाऱ्या घडामोडींची माहिती मी वरचेवर देतच राहील तूर्तास इतकेच , नमस्कार 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?