जाने क्यू .....

 

 कालचीच गोष्ट आहे. सहज विरंगुळा म्हणून युट्युब वर सर्फिंग करत असताना एक गाणे समोर आले. प्रीती झिंटा आणि अमीर खान यांच्यावर चित्रीत झालेले. बाँलीवूडच्या आतापर्यतचा इतिहासातील सर्वोत्तम गाण्यापैकी एक असणारे हे गाणे  प्रेम का करतात ? या अतिगहन प्रश्नाचे उत्तर शोधणारे.
     गाण्याचा सुरवातीला नायक प्रेमामध्ये काय काय तडजोडी कराव्या लागतात? प्रेमामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? याचा पाढा नायीकेसमोर वाचतो. नायक प्रेमाच्या अडचणी सांगत असताना नायिका तिच्या कामात व्यस्त असते. नायकाकडे सातत्याने दुर्लक्ष करते. सरतेशेवटी नायकाच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देते, आणि गाणे संपते. एक छोटीसी संकल्पना कस्या पद्धतीने खुलवता येते याचे उत्कट उदाहरण म्हणजे हे गाणे, दिल चाहता है या.चित्रपटातील आहे. मुळच्या चित्रपटाविषयी काहींच्या नकारात्मक भावना ,  अभिप्राय असू शकतील , मात्र या गाण्याविषयी नकारात्मक भावना ठेवणारा खचितच एखाद दुसरा असेल.
  जावेद अख्तर यांची रचना असलेल्या या  गाण्याला  उदीत नारायण ,अलका याग्निक यांनी स्वरसाथ दिली आहे. तर संगीत रचना शंकर एहसान राँय यांची आहे. दिल चाहता हे या चित्रपटातील गाण्याची पार्श्वभूमी आँस्टोलियातील सिडनी शहराची आहे. सिडनीतील मेट्रो, विविध पर्यटनस्थळांवर या गाण्याचे शुटिंग करण्यात आले आहे. 

    नायकाच्या मते प्रेमामध्ये आपण दुःखी असलो तरी हसरा चेहरा ठेवावा लागतो.  प्रेमांमध्ये दुःख आहे, प्रेमामुळे दुसऱ्या च्या मनाने घ्यावे लागते, ज्यामुळे फक्त दुःखच मिळते. प्रेमात पडणे म्हणजे विकतचे दुःख विकत घेण्यासारखे आहे. प्रेमात पडणे म्हणजे आयुष्यात विष कालवण्यासारखे आहे. प्रेमापासून दूर राहण्यातच पुरुषार्थ आहे.
नायिकेच्या मते, जगात प्रत्येकजण प्रेम करतच असतो, काहीचे प्रेम व्यक्त होते, काहींचे प्रेम अव्यक्त असते. प्रेमाशिवाय जगाची कल्पना करणे अवघड आहे. जी लोक दुसऱ्यावर प्रेम करत नाहीत असी लोक दुर्देवी आहेत. लोक दुसऱ्यावर प्रेम करतात , मात्र आपल्या भावना सबंधीतांना कळवत नाही. आयुष्य जगणे प्रेमामुळे खुपच सोपे होते. प्रेमाअभावी जगणे वाळवंटासारखे आहे. कोणत्याही स्थितीतील प्रेम आदर्शवत असते.जगात प्रेमात पडण्यातच मज्जा आहे.
सुमारे चार मिनीटांचे हे गाणे आपल्या प्रेमाविषयक जाणिवा प्रगल्भ करते. प्रेमाविषयीची  आपला दृष्टिकोन सकारात्मक होण्यात हे गाणे मोठी आणि महत्तवाची भुमिका बजावते. गाण्याचे पार्श्वसंगीत देखील स्फुर्तीदायक आहे. याबद्दल गीतकार आणि संगीतकाराचे कौतूक करावे तितके कमीच आहे. मुळातील उत्तम असणाऱ्या गाण्याला, संगीत वेगळ्याच उंचीवर पोहचवते. प्रेम या भावनेची सकारात्मक बाजू आपल्या मनावर ठसवण्यात हे गाणे अत्यंत यशस्वी होते. प्रेमावर आधारीत अनेक गाणी या आधी बाँलीवूडमध्ये आलेली आहेत. यापुढेही येतील.मात्र ती सर्व.व्यक्तीसापेक्ष आहेत. निरपेक्ष व्यक्तीविरहीत प्रेमावरचे हे गाणे म्हणूनच वेगळे ठरते असे मला वाटते.      हे गाणे ऐकत असताना मला सातत्याने कवीवर्य कुसुमाग्रजांची "प्रेम कोणावर करावे" ही कविता आठवत होती. दोन्ही वेगवेगळ्या पातळीवरचा साहित्यकृती आहेत. दोघांची तूलना होवूच शकत नाही, हे मला माहिती आहे. एक  हिंदी चित्रपटातील गाणे आहे. तर एक कवीवर्य कुसुमाग्रजांची मराठीतील एक उत्कृष्ट काव्यरचना आहे. विषय थोडासा सारखा आहे इतकंच .पण मला सहज जाणवलं म्हणुन तूमच्याबरोबर शेअर केले इतकेच.


आपल्या बाँलीवुडमध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरुपातील गाणी काहीसी कमी आहेत. "झूठ बोले कंवा काटे, काले कवांसे बचियो,मे मायके चली जाउंगी तूम देखतो रहियो",  ऐ दिल मुस्कील है जिना यहा ये हे बाँम्बे मेरी जान, किंवा लडकीयां लडकोंसी नही होती, अस्या सारखी काही मोजकी गाणीच या प्रकारची आहेत(निदान मला माहीती आहे, असे म्हणा) त्यापैकीच हे एक गाणे आहे. अत्यंत सुमधूर संगीत रचना आणि  शद्बरचना असणारे हे गाणे ऐकता ना मग 

मी ज्या गाण्याविषयी लिहले त्या गाण्याची लिंक 


Ajinkya Tarte 

9423515400
9404204949
9552599495 




  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?