शतकोत्तर रौप्य महोत्सवाची दुर्देवी अखेर !

     

  महिलांनी जाकिटे घातली पाहिजे. स्त्री शिक्षणानेच आपल्या समाजाची प्रगती होवू शकते.आपल्या समाज्याचे अधःपतन होण्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष! सरकारने शिक्षणाकडे लक्ष देयल हवे! ही मते कोण्या आजच्या समाजसुधारकांची नाहीत. ही आहेत आज पासून 126 वर्षापूर्वी आपल्यातून अनंताच्या प्रवास्याला निघून गेलेल्या एका थोर समाजसुधारकाची अर्थात गोपाळ गणेश आगरकर  यांची .  2021 या वर्षी जून 17 रोजी त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी वर्षाची अखेर आहे.(मृत्यू 1895 जून 17) त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली 
         आपल्या 39 वर्षाच्या उणापुऱ्या आयुष्यात त्यांनी सातत्याने महिलांची स्थिती सुधारणे, यासाठी जीवाचे रान केले. प्रसंगी लोकमान्य टिळकांसारख्या  त्यावेळच्या समाजमान्य व्यक्तीमत्तवाशी वैचारीक युद्ध देखील पत्कारले. अन्य कर्तृत्ववान व्यक्तींना असणारा अल्पायुशी ठरण्याचा शाप (.पहिल्या महिला डाँक्टर आनंदी जोशी, थोर गणितज्ज्ञ रामानुजम ही असीच अल्पायुशी व्यक्तीमत्वे) त्यांना देखील मिळाला. आणि जेमतेम 39 वर्षाचा आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा लोकमान्य टिळकांचा आणि नंतर स्वतःच्या वर्तमानपत्रातून त्यांनी सातत्याने स्त्रीयांची स्थिती , समाजाची स्थिती सुधारण्यासाठी आपली लेखणी चालवली.त्यासाठी स्वतःच्या आर्थिक स्थिती, आणि आरोग्याकडेही त्यांनी बघीतले नाही. परीणामी दारीद्र आणि दम्याचा आजारांनी त्यांची पृथ्वीतलावरील यात्रा संपवली. सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा यांच्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे यासाठी त्याच्यांत आणि लोकमान्य टिळकांमध्ये झालेला वाद सर्वश्रूत आहेच. 

           आज आपण अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे पाहतो , त्यांच्यासाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे योगदान विसरता येण्यासारखे आहे (दुसरे असेच दुर्लक्षीत समाजसुधारक म्हणजे र. धो. कर्वे . त्यांच्या जीवनावरील ध्यासपर्व हा चित्रपट बघाच) आजच्या महिलांच्या प्रगतीच्या इमारतीच्या पाया त्यांनी रचला.असे म्हटल्यास वावगे ठरू नये .  लग्नाचे किमान वय, महिलांचा पेहराव, शिक्षण यांच्या विषयी आज देखील क्रांतीकारक वाटतील असी मते त्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या पाउण कालखंडात मांडली होती. त्यासाठी कर्मठ लोकांनी काढलेली स्वतःची अत्यंयात्रा देखील त्यांनी बघीतली.तरी ते डगमगले नाहीत. त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले. मात्र  समाजाने त्यांना  याबाबतचा पुरेसा मान दिल्याचे मला तरी दिसलेले नाही( माझे अनुभवविश्व परीपुर्ण आहे, असा माझा मुळीच दावा नाही .किंबहूना ते अपुरे आहे असेच समजणे योग्य ठरेल). आज त्यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरण वर्षात देखील त्यांचा कार्याचा आढावा घेतल्याचे मला दिसले नाही. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने आँनलाइन स्वरुपात का होईना घेता आला असता.कोणी घेतला असल्यखस या लेखाचा खाली सांगावे , मला आवडेलच. 
गोपाळ गणेश आगरकर प्रसंगी समाजाचा रोष पत्कारुन यांनी समाजाचे  हित साधण्याचाच प्रयत्न केला. गोपाळ गणेश आगरकर यांनी समविचारी व्यक्तींचा मदतीने न्यु इग्लीश स्कुल सोसायटीची स्थापना केली. ते काही फग्युसन ( दुसरा उच्चार  फर्गसन) {सध्या पुण्यात एफ सी नावाने प्रसिद्ध .सध्या पुण्यात शाँटफाँमचीच चलती आहे पुर्ण नाव घेतले तर ही जागा पुण्यात नाही असेच ऐकू येण्याची शक्यता आहे} चे प्राचार्य देखील होते.बुद्धीप्रामाण्यवाद हा त्यांचा समाजसुधारणेचा पाया होतो. त्यांची समाजसुधारणा स्त्री पुरुष समानता, योग्य अयोग्याचा विचार करण्याचा विचार करुन केलेल्या कृतीस प्राधान्य देणारी ,होती. जर आगरकर अजून काही वर्षे जगले असते, तर समाजाचे चित्र अजून उत्तम झाले असते, असे त्यांचा समाजसुधारणा बघून अनेक लोकांनी मत व्यक्त केले आहे.
आपल्याकडे प्रथम पुजनाचा मान असणाऱ्या बुद्धीचा देवता असणाऱ्या गणेश हे वडीलांचे नाव असणाऱ्या या व्यक्तीने समाजाला खऱ्या अर्थाने बुद्धीचा वापर करण्यास शिकवले असे म्हटले तर वावगे ठरु नये.
त्यांचा निधनास 126 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस अभिवादन करुन.सध्यापुरते थांबतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?