माझा आवडता नेता...

     

कोणी त्यांना पप्पु म्हणून हिनवतं, कोणी त्यांना युवराज म्हणून हिनवतं . घराण्याची किर्ती धुळीस मिळवणारा , घराण्यामुळे मोठेपणा मिळणारा मात्र अंगी काहीच कर्तृत्व नसलेला म्हणून त्यांच्याकडे बघावे, असी प्रतिमा माध्यमांकडून उभी करण्यात येते.अपरीपक्तव व्यक्तीमत्व म्हणून त्यांचाकडे बघीतले जाते.अनेकदा त्यांचा आईचा अत्यंत खालचा दर्जाचा उल्लेख करण्यात येतो. तरी ते काहीही अनुचित प्रतिक्रिया देत नाहीत. स्थितप्रज्ञ ऋषितुल्य व्यक्तिमत्वाप्रमाणे या सर्व दर्जाहिन टिकेकडे दुर्लक्ष करुन आपले कार्य अधिकाधीक उत्तम करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो.सातत्याने नविन गोष्ट शिकण्याकडे त्यांचा कल असतो.
एखादी गोष्ट जर त्यांना आवडली नाही. तर कोणाचीही भीड न बाळगता ते स्पष्टपणे सांगतात. जर एखादी गोष्ट आवडली तर कसलाही बडेजाव न बाळगता त्याचे कौतूक करतात. उगीचच अन्य व्यक्तिंना शक्तीप्रदर्शन करत नाहीत. मात्र वेळ पडल्यावर त्यांची शाररीक ताकद भल्या भल्याची छाती दडपून टाकते. आपण भोगलेल्या कष्टांचे विनाकारण ते भांडवल करत नाही. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात शिक्षीत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.म्हणून मला त्यांचे व्यक्तीमत्व आवडते. मी बोलत आहे, क्राँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याविषयी .19 जून हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्याने लोकशाहीवर खरोखरचे प्रेम करणाऱ्या लोकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

        शालेय जीवनात आयुष्याच्या महत्तवाचा टप्यावर असताना   पंतप्रधानपदी असणाऱ्या आपल्या आजीची झालेली हत्या,  पुढे महाविद्यालयनी जीवनात अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या वडीलांची झालेली निर्घृण हत्या यांचा मोठा परीणाम त्यांचा आयुष्यावर झाला. या दोन्ही हत्येमुळे कायम पोलीस  संरक्षणात राहणे त्यांचा नशिबात आले. या दोघांचा मारेकऱ्यांचा निशाण्यावर असल्याने त्यांना आयुष्याचा मोठा आणि महत्तवाचा कालखंड समाजापासून लपत छपत काढावा लागला. परीणामी समाजाची नाळ त्यांच्यापासून काहीसी तूटली.मात्र त्यामुळे त्यांचे समाजावरील प्रेम मात्र तूटले नाही. याचा प्रत्यय वेळोवेळी त्यांचा वर्तणूकीतून येत असतो. 
     आपल्या भारतीयांना झालेल्या अतिरेकी साधेपणा या आजाराचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसला. एखाद्या क्रिकेटपटूचा अभिनेत्याचा मुलाने वडीलांच्या आईच्या क्षेत्रात पदार्पण केले की आपण त्याच्यावर वशीलेबाजीचा शिक्का देवून मोकळे होते. काही प्रमाणात वडीलांचा आईचा फायदा होत असेलही, पण त्यांचे काहीच कर्तत्व नाही, असे समजणे गैर आहे. त्यांना देखील संघर्ष करावा लागतो. सुनिल गावस्कर  यांचा मुलाचे अत्यंत जागते उदाहरण यासाठी देता येईल. आइ वडीलांचा मुळे त्यांना फायदा होत असेलही, मात्र त्यांची नेहमी आई वडीलांशी   तूलना होतेच.आपल्याकडे जर एखाद्या व्यक्तीला मोठे व्हायचे असल्यास त्या मागे काहीच पार्श्वभूमी नको असी मानसिकता आहे. तसेच विनाकारण साधेपणाचे कौतूक देखील  आहे. एखाद्या उच्चपदस्थाने गरज नसताना साधेपणा दाखवला की भारतीयांना खुप कौतूक वाटते. भारतीयांच्या या आजारामुळे राहुल गांधी यांना राजकारणात खुप काही सोसावे लागले आहे.  


   आक्रमक पद्धतीने केलेल्या अयोग्य प्रचाराला, स्वतःच्या शांत स्वाभावामुळे तेवढ्याच आक्रमकतेमुळे उत्तर देवू न शकलेला नेता, म्हणून भारतीय राजकारणाच्या इतिहासात त्यांची नोंद होईल, असे मला वाटते.
राहुल गांधी यांच्या विषयी खुप काही बोलता येवू शकते. मात्र तूर्तास इतकेच, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?