डेअरी दूध पिता आहात आपण ?

       

 डेअरी दूध पिता आहात आपण ? अशा प्रश्न यापुढे जर तुम्हाला कोणी विचारला तर आश्चर्य वाटायला नको . याला कारणीभूत आहे. प्राण्याचा हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या अमेरिकास्थित गैर सरकारी समाजसेवी संस्था 'पिपल फाँर इथिकल ट्रिटमेंट फाँर अँनिमल' अर्थात  "पेटा" या संस्थेने  भारतातील आघाडीची दुग्ध उत्पादक संस्था अमूल या संस्थेला टीट्वीर वर पाठवलेल्या पत्रावरुन सुरु झालेला विवाद..
      तर मित्रांनो, जगभरात आता प्राणीजन्य दूध (डेअरी मिल्क ) कमी वापरले जाते. दूधासाठी आता वनस्पतीजन्य दूधाचा (व्हेगन मिल्क)चा वापर करण्याकडे कल वाढला आहे. अमूलने सुद्धा प्राणीजन्य दूधाचा ऐवजी वनस्पतीजन्य दूध (व्हेगन मिल्क )चा निर्मितीवर लक्ष केंद्रीत करायला हवे असे ट्टीट आणि त्यासोबत एक पत्र अमुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस सोधी यांना पाठवले.ज्यात प्राणीजन्य दुध वापरताना प्राण्यांवर अन्वयीत अत्याचार केला जातो.  तसेच हे दूध हिंदु धर्माचा तत्वाचा विरोधात आहे. तसेच हे दुध जीवनसत्वाच्या विचार करता वनस्पतीजन्य दूधापेक्षा कमी प्रतीचे असल्याचे सांगितले आहेत. याला उत्तर देताना आर एस सोधी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी उत्तरादखल वनस्पतीजन्य दुधाची किंमत सर्वसामान्य भारतीयांना परवडणारी नाही. तसेच प्राणीजन्य दुधाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींचा रोजगाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. हा मुद्दा इतका तापलेला आहे की, पेटा या संस्थेवर भारतात बंदी घालण्याची मागणी काही व्यक्तींवर करण्यात येत आहे. पेटाला  के एफ सी, डाँमिनोझ यांचा विरुद्ध काही करता न आल्याने ते अमूल विरोधात आहेत.असा आरोप अमूल समर्थक  करत आहे.जगातील प्राणीजन्य दुधापैकी(डेअरी मिल्क) 22% दूध भारतात तयार होते.{डेन्मार्क देश दूधाची निर्यात सर्वात जास्त करतो. याउलट भारतात उत्पादीत होणारे दूध भारतातच वापरले जाते. भारताची दूधाची निर्यात कमी आहे}त्यामध्ये आनंद मिल्क युनियन लिमिटेड अर्थात अमूलचा वाटा मोठा आहे. त्याद्वारे भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आणण्यासाठी रचलेले परदेशी षडयंत्र म्हणून त्याकडे बघावे असी अमुल सर्मथकांची भूमिका आहे.

      गाय , म्हैस, शेळी,  आदी प्राण्यांकडून मिळणाऱ्या दुधाला प्राणीजन्य दुध  म्हणजे डेअरी मिल्क म्हणतात. सोयाबीन, बदाम, काजू  अस्या पदार्थाला पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करुन  तयार करण्यात येणाऱ्या तसेच नारळावर काही प्रक्रिया करुन तयार केलेल्या दुधाला वनस्पतीजन्य दूध म्हणजे व्हेगन मिल्क म्हणतात. 
अमेरीकेत प्राणीजन्य दूध काढण्यासाठी प्राण्यांवर अत्याचार करण्यात येत असतील . मात्र आपल्या भारतात तितकी वाइट स्थिती नाही. अपवाद सर्वत्र असतात मात्र अपवाद हे नियम म्हणून स्विकारता येत नाहीत हे आपण जाणतातच. त्यामुळे अमेरीकेचे  नियम इथे लावून त्यानुसार प्राणीजन्य दुधावर (डेअरी मिल्क) बंदी घालणे सर्वथा अयोग्य आहे. तसेच भारताची लोकसंख्या बघता इतक्या मोठ्या प्रमाणावर वनस्पतीजन्य दूध (व्हेगन दूध) वापरता येणे अशक्य आहे .सध्याचा दुग्धोत्पथनासाठी सरकारचे विशेष प्रयत्न आहेत. जे श्वेतक्रांती नावाने प्रसिद्ध आहेत. ते सर्व पुन्हा  करणे अशक्यप्राय आहे . तसेच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी वनस्पतींवर अत्याचार होणार नाहीत. याची खात्री देता येणे अशक्य आहे. तसेच त्याची किंमत देखिल महत्तवाचा घटक आहे. वनस्पतीजन्य दुध (व्हेगन मिल्क )साठी  वापरण्यात येणारे घटक अत्यंत महाग आहेत. तसेच ती सर्व जीवनसत्वे देवू शकत नाही. त्या प्रकारचे दूध पुर्णान्न होवू शकत नाही. मला स्वतःला वनस्पतीजन्य दूध ( व्हेगन मिल्क ) ही संकल्पना अमान्य आहे. वनस्पतीजन्य दुध (व्हेगन मिल्क) ही संकल्पना खुप भूतदया वाटली तरी प्रत्यक्षात येणे अवघड आहे. सबब मी पेटा आणि अमूल या वादात अमूल बरोबर आहे, आणि आपण ?




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?