बातमीतील पाकिस्तान [ भाग 10]

     

 मित्रानो आपल्या भारतात वाढत्या इंधनदारामुळे आणि संथ कोरोना प्रतिबंधात्मक लशींच्या संथ वेगामुळे समस्त भारत चिंतेत असताना आपल्या शेकजारील देश पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आपला प्रमुख शत्रू आहे तसेच तो आपल्या भारतात सातत्याने अशांतता पसरवत असल्याने त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या बदलांविषयी 
      तर मित्रांनो पाकिस्तानने चीनकडून आयात केलेल्या लोमाड या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून येणे, पाकिस्तान आणि तूर्कस्थान या दोन देशांना अमेरीकेकडून लहान बालकांचा सैन्यासी सबंधित कारवाईत वापर केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले जाणे, आणि पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घ्यालण्याचे पाकिस्तानचे उदिष्ट जाहिर केलेल्या कालावधीत पुर्ण न होणे,
या गोष्टींमुळे पाकिस्तान सध्या चर्चेत आला होता.चला तर मग जाणून घेवूया ची घडामोडी विस्ताराने.
तर पाकिस्तानने चीनकडून सन 2014साली लोमाड  हवाई संरक्षण प्रणाली विकत घेतली. चीनने अन्य 17ते 18 देशांनी ही प्रणाली विकत घेण्यासाठी प्रयत्न केले..मात्र जूनाट कालबाह्य पद्धतीने ही प्रणाली  करते असे सांगत इतर देशांनी याबाबत नकारघंटा बजावली होती. तर चीनचा मित्र पाकिस्तानने ही प्रणाली विकत घेतली. ही प्रणाली रशियन हवाइ संरक्षण प्रणाली रशियन बुक एअर प्रणालीची सुधारीत आवृत्ती म्हणता येईल, अस्या प्रकारची आहे.
ती प्रणाली आता पुर्णतः काम करत नसल्याने चीनी तंत्रज्ञ ती दुरुस्त करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेले आहेत. चीनच्या मते ही प्रणाली 40 किमीच्या त्रीज्येत काम करते. मात्र पाकिस्तान संरक्षण मंत्रालयाचा तज्ज्ञांच्या मते ही यंत्रणा 15किमीच्या अंतरात काम करते.
         आता बघूया पाकिस्तानमधील बालकांसबंधी चर्चेत आलेली घडामोड.
तर मित्रांनो,अमेरीकेच्या मानवी हक्कांविषयी कार्यरत असणाऱ्या खात्याने तयार केलेल्या एका अहवालाचा आधार घेत अमेरीकेकडून पाकिस्तान आणि तूर्कस्थान या देशांना काळ्या यादीत टाकले आहे. या देशांकडून  लहान बालकांचा सैन्य कामासाठी वापर केल्याने त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे अमेरीकेकडून या देशांना शस्त्रात्र पुरवठा करताना बंधने घालण्यात येईल. सैन्य कामांसाठी 18 आणि पोलीसी कामांसाठी 16अथवा त्या त्या देशानी सज्ञान होण्यासाठी घातलेल्या वयोमर्यादेपर्यत असणाऱ्या वयोमर्यादेपर्यत लष्करी आणि सैन्य कामासाठी बालके वापरण्याविरुद्ध अमेरीकेची सक्त भुमिका आहे. या आधी दक्षीण सुदान, इराक इराण, अफगाणिस्तान ,माली लिबिया डेमोक्रेटीक रिपब्लिकन आँफ कांगो या देशांवर अमेरीकेने ही कार्यवाही केली आहे.
आता बघूया तिसरी घडामोड.
तर पाकिस्तान अफगाणिस्तानबरोबर असणारी त्याची सुमारे 2600किमी असणारी सीमा तारेच्या कुंपणांनी बंदिस्त करणार होता. पाकिस्तानच्या केंद्र सरकारकडून नुकतेच जाहिर केल्याप्रमाणे यातील 88% काम पुर्ण झालेले असून 30जूनपर्यत संपुर्ण काम पुर्ण होणार होते. या आधी डिसेंबर2020 मध्ये या विषयी वक्तव्य केंद्र
सरकारकडून करण्यात आले होते. ज्यामध्येसुद्धा जून2021अखेरपर्यत काम पुर्ण होणार होते. मात्र अद्याप ते अपुर्ण असल्याचे बिबिसीच्या बातमीत सांगितले आहे. सन 2014 पासून हे काम सुरु होते.अफगाणिस्तानचा पाकिस्तान अफगाणिस्तानचा सीमेलाच विरोध असल्याने पाकिस्तानच्या या कार्यवाहीस देखील विरोध होता. अफगाणिस्तानचा मते 1898साली दुसऱ्या अँग्लो अफगाण युद्धानंतर आखण्यात आलेल्या सीमेमध्ये अनेक अफगाणि संस्कृतीसी जवळीक असणारे प्रदेश विभागले आहेत.या कुंपणामुळे हे विभाजन अजूनच रुंदावेल. पाकिस्तानच्या मते या सीमेवरून अमंली पदार्थ पाकिस्तानात येत असतात, तसेच अफगाणिस्तानमधील अशांतता   पाकिस्तानमध्ये पसरते. म्हणून या सिमेवर कुंपण आवश्यक आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यावर हे कुंपण हटवण्यात येईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहिर केले आहे.
पाकिस्तान भारताच्या प्रमुख शत्रू असल्याने तेथील घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठीच केलेले हे लेखन आपणास आवडले असेल असे मानून सध्यापुरते थांबतो,नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?