बातमीतील चीन (भाग 14 )

       



   

 सध्या जगात अनेक घडामोडी घडत आहेत .ज्यामध्ये अफगाणिस्तानआणि तालिबान,  हवामान बदल आणि चीनविषयक घडामोड या प्रमुख बाबी आहेत . त्यातील अफगाणिस्तान आणि तालिबान , हवामान बदल याविषयी मी याआधीच बोललो आहे. मी आज बोलणार आहे ते चीनविषयी 

       तर मित्रानो चीनबरोबर तालिबानने केलेली चर्चा, चिनी राष्ट्रप्रमुखांनी  भारतीय सीमेजनिकच्या तिबेटला अनपेक्षितरित्या दिलेली भेट, आणि अफगाणिस्तानच्या प्रश्नावर रशियाने पहिल्यांदा चीन आणि अमेरिकेबरोबर उभारलेल्या  या समूहाचा विस्तार करताना कतार इराण पाकिस्तानबरोबर भारताचा केलेला  समावेश, तसेच अमेरिकी नौदलाबरोबर युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डम या देशाला आपल्याकडे इंग्लड या नावाने ओळखतात . मुळात युनाटेड किंग्डम या देशातील एक भाग म्हणजे इंग्लंड ) या देशाचा नौदलाने  आरमार चीनचा विरोध डावलून चीन आपला भूभाग म्हणणाऱ्या मात्र वादग्रस्त असणाऱ्या साऊथ चायना समुद्रात आपली विमानवाहू नौका तैनात करणे  यामुळे चीन प्रामुख्याने गेल्या काही दिवसात चर्चेत होता . आता बघूया एक एक घडामोड विस्ताराने . 

      तर मित्रानो, चीनच्या पश्चिमेकडे असणाऱ्या सिकियांग ( काही ठिकाणी याचा उच्चार झिकियांग सुद्धा आढळतो. याच नाही तर जवळपास सर्वच चिनी शहरांचे प्रांताचे  उच्चार अनेक प्रकारे केले जातात .चीन विषयी हे एक त्रांगडे आहे  )प्रांतामध्ये फुटीरतेची भावना आहे .( चीनने आपला अनधिकृतपणे घेतलेला पूर्व लडाखचा भूभाग याच प्रांतात विलीन केला आहे ) या मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असणाऱ्या प्रांतामुळे 90 किमीची चीन अफगाणिस्तान सीमा आहे .(वाखान  कॉरिडॉर हा  65 किमी रुंद आणि 130 किमी लांबीचा चिंचोळा पट्टा आहे या वाखान

कॉरोडॉरमुळेच भारत आणि अफगाणिस्तानची सामायिक सीमा आहे त्याच वाखान कॉरिडॉर मी चीन आणि अफगाणिस्तान शेजारी झाले आहेत .याची निर्मिती का आणि कशी झाली याबाबत मी अफगाणिस्तानविषयी लिहताना स्पष्ट केले आहे .) ईस्ट तुर्कस्तान इस्लमिक मूव्हमेंट नावाची दहशतवादी संघटना या फुटीरतेसाठीकार्य करत आहे चीन सरकारच्या अंदाजानुसार  जर या दहशतवादी संघटनेने जर अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतला तर चीनला अडचणी निर्माण होऊ शकतात  ते टाळण्यासाठी चीन तालिबानला विविध प्रकारे मदत करत आहे . ज्यात आर्थिक लष्करी मदत , जगभरात राजनैतिक मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणे आदी बाबी समाविष्ट आहेत त्याच मालिकेत  तालिबानचे एक शिष्टमंडळ चीनची राजधानी बीजिंग येथे जाऊन चीनच्या परराष्ट्र मंत्र्यास भेटले .चिनी सरकारच्या अधिकृत समाजमाध्यवरील खात्ययवार याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्यामुळे आपणास ही घडामोड समजली . 

सर्वसाधारणपणे चिनी राष्ट्रपतींचे चीनमधील दौरे हे पाच ते सहा महिने आधीच जाहीर झालेले असतात .मात्र याला फाटा देत चीनचे सध्याचे राष्ट्रपती शी जिनपिंग ( चिनी शहरांचा प्रदेशाचा नियम यांना देखील लागू होतो ) यांनी अचानक तिबेटमधील भारताच्या सीमेनजीकच्या भूभागाला भेट दिली . ज्या मध्ये भारतीय सीमेपासून 30  ते 40 किमी दूर असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या शहरास अर्थात न्यांची   या शहरास देखील भेट दिली तिबेटची  राजधानी ल्हासा ला चीनच्या मुख्य सभूभागाला जोडणाऱ्या तासी   160 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गवर हे स्थानक आहे . सध्या आपल्या भारताचे अमेरिकेबरोबर चीनला तिबेट या मुद्यावरून घेरण्याचे प्रयत्न सुरु आहेत त्या पाश्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे . \

मी अनेकदा सांगितले आहे की अफगाणिस्तानविषयी अनेक घडामोडी सध्या  घडत आहे त्यातील एक घडामोड म्हणजे रशियाने चीन आणि अमेरिका याच्याबरोबर एकत्रित रित्या एक आघाडी उघडली आहे . जिला रशियात बर्फावरून जाण्यासाठी तीन घोड्याचा वापर करून वापरण्यात येणाऱ्या ट्रॉयका   या गाडीवरून ट्रॉयका    हे नाव देण्यात आले आहे . या आघाडीत वाढ करणे आवश्यक असल्याचे समजल्यावर रशियाकडून ट्रॉयका   प्लस या
नावाने या आघाडीचा विस्तार करण्यात आला आणि भारत , कतार ( या कतारची राजधानी दोहा अनेक आंतरराष्टीय कराराच्या केंद्रासाठी असते )पाकिस्तान आणि इराण याना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे . या आघाडीमार्फत खर्च अफगाणिस्तानमध्ये  का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल . 

   आता बघूया शेवटची घडामोड तर युनाटेड किंग्डम या देशाने  क्वीन एलिझाबेथ ही  विमानवाहू नौका चीन स्वतःच्या भूभाग मानणाऱ्या दक्षिण चीन समुद्रात आणली . युनाटेड किंग्डमला मदतीला अमेरिकेच्या नौदलाचे एक जहाज सुद्धा होते . याबाबत चीनने तीव नापसंती दर्शवली .  दक्षिण चीन समुद्रात चीन स्वतःच्या भूभाग म्हणून मानत असलेल्या भूभागावरून या देशाचे फिलिपाइन्स , तैवान , ब्रुनेई व्हिएतनाम , या देशांबरोबर तीव्र मतभेद आहेत .

त्यांनी या  स्वागत केले आहे युनाटेड किंग्डम आणि अमेरिकेचे समुद्र सांगण्यासाठी आहे कोणीही त्यावर बंधने घालू नये असे धोरण आहे या धोरणानुसारच आम्ही हा प्रवास केला असे स्पष्टीकरण युनाटेड किंग्डम आणि अमेरिकेकडून देण्यात येत आहे 

चीन आपला शत्रू असल्याने त्याचा घडामोडीवषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे म्हणूनच मी ला लेख लिहिला आहे जो आपणास आवडला असेलच असे मानून तूर्तास इथेच थांबतो , नमस्कार . 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?