भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग2)

 

   दोन दिवसापुर्वी माझ्या अफगाणिस्तानमधील तालीबानच्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना, काही जणांनी तालीबानच्या उदयाची पार्श्वभूमी माहिती करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासाठी तालीबान मागची पुर्वपिठीका सांगणारी ही ब्लॉग पोस्ट .
तर ज्या राजकीय अस्थिरतेमुळे अफगाणिस्तानात तालीबानचा उदय झाला, ती राजकीय अस्थिरता अफगाणिस्तानात तालीबानच्या उदय होण्याचा कितीतरी आधीच म्हणजे 1973 साली सुरू झाली. ज्यामध्ये अनेक घडामोडी घडत 1992च्या सुमारास तालीबानचा उदय झाला. गृहयुद्धानंतर 1996सप्टेंबर 26 या तारखेला काबूल तालीबानच्या हातात आले आणि अफगाणिस्तानचे सत्ताधीश तालीबान बनले, चला तर मग  जाणूया घेवूया हा घटनाक्रम.
   1973 साली तत्कालीन राजा झाहीर शहा यांच्या सत्तेविरूद्ध त्यांचाच पंतप्रधान मोहमद्द दाऊद खान यांनी उठाव केला. (त्यावेळचे राजा झाहिर शहा हे नादीर शहा यांचे वंशज आहे. नादिर शहा यांनी 1771साली भारतावर आक्रमण केले होते. ज्या विरोधात मराठी भाषिक सैन्य भारतासाठी लढले होते.ज्याला आपण पानीपतचे तिसरे
युद्ध म्हणतो) मोहमद्द दाउद खान यांनी राज्येशाही संपवून अफगाणी प्रजासत्तकाची स्थापना केली. त्यावेळी अफगाणिस्तानची सत्ता 1965 मध्ये स्थापन झालेल्या पिपल्स डेमोक्रेटीक पार्टी आँफ अफगाणिस्तान (PDPA)यांचा हातात आली..
  हा पक्ष कम्युनिस्ट विचारधारा मानणारा होता.  सत्ताधिकारी PDPA या पक्षात एक कम्युनिष्ठांचा कट्टट गृप होता. दुसरा गट काहीसा मवाळ होता. या अंतर्गत वादातून 1978एप्रिल 17 रोजी कट्टर गटाच्या लोकांनी मवाळ गटाच्या महत्तवाच्या नेत्याची हत्या केली. पुढे दहा दिवसांनी 28एप्रिल 1978रोजी कट्टर लोकांनी मवाळ गट नाहीसा केला आणि अफगाणिस्तान पुर्णतः कम्युनिस्ट राष्ट्र बनले . या सरकारने अफगाणिस्तानात साक्षरता, महिलांची स्थिती सुधारणे यासाठी धडक कृती कार्यक्रम सुरु केला. परंपरावादी लोकांचा विरोध होता. त्यांनी यास विरोध सुरु केला,आणि अफगाणिस्तानात मुहाज्जदीन या वर्गाचा उदय झाला. ज्यातून पुढे तालीबानचा उदय झाला.
     अफगाणिस्तानात या परंपरावाद्याची वाढती ताकद आणि आपली विचारधारा मानणाऱ्या कम्युनिष्ठांची कमी ताकद बघून कम्युनिस्ट सरकारच्या बाजुने परंपरावादी लोकांच्या विरोधात 1979साली युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. हे युद्ध पुढे 10वर्षै चालले यात निर्णायक विजय कोणालाच मिळाला नाही. मात्र तालीबानी लोकांना उदयास अनकुल स्थिती निर्माण झाली. देशातील अंतर्गत स्थिती आणि युद्धात यश न मिळाल्याने अफगाणिस्तानातून रशियाने माघार घेतली. आणि अफगाणिस्तानात सत्तेसाठी यादवी माजली. ज्यात 1992ते 1996चा काळ मोठा कठीण होता. यात प्रचंड संघर्ष होवून पुढे 26सप्टेंबर 1996 या दिवशी  तालीबानचा हातात अफगाणिस्तानचा कारभार आला.
      या तालीबानच्या उदयासाठी 1979 ते1989 पर्यत युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरीकेने पाकिस्तानच्या मदतीने  मुलतत्वांना दिलेली मदत सुद्धा कारणीभुत आहे.  अमेरीकेने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय एस आय च्या मदतीने या मुलतत्ववाद्यांना प्रशिक्षीत केले. पुढे यु एस एस आर मागे फिरल्यावर पुर्वीचे कमकुवत कम्युनिस्ट सरकार पुर्णतः कोसळले. आणि सत्ता पुर्णतः पारंपरावादी लोकांचा हातात आली. 1992 च्या सुमारास या पारंपारीक लोकांचे विविध गट होते.त्यातील एक गट म्हणजे तालीबान कालांतराने बाकीचे गट या तालीबानमध्ये विसर्जीत होत गेले.परीणामी तालीबान नावाचा एकच गट तयार झाला. ज्यांचाकडे  1996 सप्टेंबर 26 ते 2001सप्टेंबर11पर्यत पुर्ण सत्ता होती. या काळात अफगाणी जनतेवर पाशवी अत्याचार झाले. छोट्या छोट्या अपराधासाठी अमानवी शिक्षा झाल्या. महिला देखील यातून सुटल्या नाहीत. मात्र यातील एका गटाने अमेरीकेवर हल्ला केला.त्यानंतर अमेरीकेने याचा बिमोड करण्यासाठी युद्ध पुकारले. या युद्धामध्ये अफगाणिस्तानचा भौगोलिक परीस्थितीचा फायदा घेत तालीबानने गमिनी कावा
पद्धतीने युद्ध लढवले. अमेरीकन सैन्याला हे युद्ध तंत्र माहिती नसल्याने ते हे युद्ध जिंकू शकले नाही. मात्र अमेरीकन सैन्याची मोठी हानी झाली.परीणामी या युद्धातून अमेरीकेने माघार घ्यावी असा सुर अमेरीकेतून उमटू लागला .त्यामुळे आता सप्टेंबर11 रोजी अमेरीका अफगाणिस्तानमधून पुर्णतः बाहेर पडणार आहे.  त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा वीस वर्षापुर्वी होता , त्या नरकात जाणार आहे . या काळात तालीबान विविध ठिकाणी लपून होता. अमेरीका कधीना कधी बाहेर जाणारच आहे. अमेरीका बाहेर जाईल तेव्हा आपण कार्यरत होवू, असा विश्वास ठेवत त्यांनी कळ काढली. ज्याचे फळ त्यांना आता मिळत आहे. 
मित्रांनो, ही होती तालिबानची कुळकथा जी आपणास आवडली असेल, असे मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?