भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग7)

   

     सध्या जगभरात एकच मुद्दा चर्चिला जात आहे  , तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान . जगातील विविध देश याबाबत आप आपली भूमिका जाहीर करत आहेत अफगाणिस्तानची तालिबान करत असलेल्या उभारणीत आपली भूमिका असावी या हेतूने विविध आघाडी उभारत आहे . यामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत . नुकतीच रशियाकडून नॉर्दन अलायन्स उभारण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे.  तर अमेरिकेकडून,  अमेरिका उझबेकिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची आघाडी उभारण्यात आली आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणशी ठाव ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन . 
       तर मित्रांनो 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रभाव फारशा वाढू नये या हेतूने रशिया अमेरीका , चीन भारत, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा एक गट कार्यरत होता .ज्यास नाँर्दन अलायन्स असे म्हणतात..हा गट त्यावेळी सक्रीय असल्याने तालीबानच्या सक्रिय कालावधीत सुद्धा अफगाणिस्तानचा उत्तरेकडील भागात तालीबानचे अस्तिव नव्हते. वीस वर्षानंतर तालीबानचा प्रभाव वाढत असताना तूर्कमेनीस्तान मध्ये रशियाने लष्करी तळ सज्ज केल्याने तसेच आपले काही सैन्य अफगाणिस्तान तजाकिस्तान सीमेवर सज्ज केल्याने पुन्हा एकदा नाँर्दन अलायन्स जिवीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र रशियाच्या डेप्युटी हेड मिशन Roman Babushkin  यांनी माध्यमांशी वार्तालाप करताना भारताने तालिबानचे वास्तव स्विकारले पाहिज, आणि तालिबानबरोबर चांगले सबंध तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्हाला अफगाणिस्तानमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव असला तरी आम्ही त्यासाठी भारताबरोबर कोणतेही लष्करी सहकार्य करणार नाही असे सांगितले  आहे.. त्यामुळे नाँर्दन अलायन्स उभारण्याचा शक्यता धूसर झाल्या आहेत. आम्ही तूर्कस्थान ला लष्करी साह्य करतो ते आम्ही  अर्मेनिया बेलारुस  तूर्कस्थान किरीगिस्तान कझाकिस्तान या देशांबरोबर केलेल्या लष्करी सहकार्याचा करारातील बंधनामुळे .या करारामुळे वर सांगितलेले देश आणि रशिया या पैकी कोणत्याही देशाला धोका निर्माण झाल्यास ते समस्त देशाला धोका निर्माण झाल्याचे समजून त्यानुसार कार्यवाही करण्यात येते .यास collective security Treaty  Organization {CSTO}असे म्हणतात. 
एकीकडे रशियाने तालीबानच्या बाबतीत आपले हात वर केले असताना अमेरीकेने उझबेकिस्तान अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि स्वतः.अमेरीका यांच्या एक गट स्थापन केला आहे. अमेरीकेकडून यास कोणतेही विशेष नाव दिले नसले तरी डेक्कन क्रोनीकल, बिबिसी आदी माध्यमांकडून अफगाणिस्तान सिक्युरीटी क्याड असे नाव दिले गेल्याचे  दिसत आहे. क्याड हा क्यारीरँडरल चे संक्षीप्त रुप आहे. याचा अर्थ कोणत्याही 
 आकाराची चार कोपरे असलेली आकृती असा होतो. असे दोन क्याड सध्या अमेरीकेनेने केले आहेत. एक म्हणजे चीनविरोधी केलेला क्याड ज्यास अमेरीकेने सिक्युरीटी फाँर डेमाँक्रसी क्याड असे नाव दिले आहे. दूसरा म्हणजे हा आताचा क्याड . या दोन्ही क्याडला रशियाने विरोध केला आहे. हा पाकिस्तानचा समावेश असणारा क्याड अफगाणिस्तान आणि परीसरात कशी शांतता निर्माण करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
मित्रांनो, अफगाणिस्तानमध्ये आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सध्या जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू केंद्रीत झाल्याने अनेक घडामोडी घडत आहे,त्याविषयी मी त्या त्या वेळी सांगेलच तूर्तास इतकेच , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?