पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि भारत

 

  येत्या रविवारी अर्थात 25 जूलै रोजी पाकिस्तानने अनधिकृतरीत्या ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमधील दक्षीण भाग ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात ( पाकव्यात काश्मीरच्या उत्तरेच्या भागाला आतापर्यत पाकिस्तान आतापर्यत फेडरली अँडमिस्टर्ड नाँर्दन एरीया अर्थात फाना म्हणत असे आता गिलगीट बाल्टीस्तान असे म्हणतो.) या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. भारताने या निवडणूका जाहिर झाल्या त्या वेळीच सदर भुभाग आमचा असल्याने पाकिस्तानकडून या प्रदेशात घेण्यात आलेल्या निवडणूका बेकायदेशीर आहे.असे जाहिर केले आहे【गेल्या वर्षीच गिलगीट बाल्टीस्तान भागात विधानसभेच्या निवडणूक झाल्या होत्या . ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंन्साफ या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या 
  याही निवडणूका भारताने बेकायदेशीर ठरवल्या होत्या   】पाकव्याप्त काश्मीरच्या भाग असलेल्या आझाद काश्मीर च्या विधानसभेच्या एकुण 53 जागा आहेत . त्यातील 45 जागांवर मतदान होणार आहेत. या 45 जागांपैकी 33 जागा या आझाद काश्मीरमधील आहेत. 12 जागा या आपल्या जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानात विविध 
ठिकाणी स्थाईक झालेल्या जनतेसाठी राखीव आहेत. उरलेल्या 8 जागांपैकी प्रत्येकी एक जागा , मुल्ला मौलवी , लष्कर, टेक्नीकल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीसाठी  राखीव आहेत.तर उरलेल्या पाच जागा सत्ताधिकारी पक्षातर्फे भरावयाचा असतात.  
     सध्या आझाद काश्मीरचे पंतप्रधानपद ( तिथे मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणतात) पाकिस्तान मुस्लिम लीग (नुर गट) या पक्षाकडे आहे. नुर गटाचा उल्लेख अनेक ठिकाणी N म्हणून करतात.त्यामुळे काही ठिकाणी आपणास पाकिस्तान मुस्लिम लिग (N) असा उल्लेख मिळू शकतो. पाकिस्तानच्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरीयाना शरीफ या पक्षाचा महत्तवाचा नेता आहे. या खेरीज पाकिस्तानच्या राष्ट्रीय राजकारणात असणाऱ्या पाकिस्तान पिपल्स पार्टि ,पाकिस्तान तेहरीके इंन्साफ  हे पक्ष तसेच काही दिवसापूर्वी झालेल्या  फ्रान्सविरोधी आंदोलनामुळे चर्चेत  आलेला तेहरीके लब्बेक या पक्षासह मुस्लिम काँन्फरस, जम्मू कश्मीर काँन्फरस हे दोन स्थानिक पक्ष सत्तेत आहे.पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या महत्तवाचा नेता म्हणून पाकिस्तानात मिस्टर टेन पर्सेंट म्हणून विख्यात असणारा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती तथा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा नवरा आसीफ अली झरदारी याचा मुलगा बिलवाल प्रसिद्ध आहे. पाकिस्तान तेहरीके इन्साफ याचा प्रमुख नेता म्हणून सध्याचा पंतप्रधान माजी क्रिकेटपटु  इंम्रान खान याचे नाव घेता येईल .तेहरीके लब्बेक या पक्षाचा महत्तवाचा नेता म्हणून रिझवी यास ओळखले जाते. हा पक्ष पाकिस्तानमध्ये झालेल्या फ्रान्सविरोधी आंदोलनात विशेष प्रकाशझोतात आला .
अल्.जझीरा ही वृत्तवाहिनी आणि Dawn (पहाट) या वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार आझाद काश्मीरमध्ये झालेल्या विविध एक्सिट पोलमध्ये  पाकिस्तानात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मुळच्या आपल्या काश्मीरमधील लोकांसाठी राखीव असलेल्या 12 जागांपैकी7,8 जागांवर पाकिस्तान तेहरीके इंन्साफ हा पक्ष निवडून येईल. तेहरीके लब्बेक या पक्षाला बऱ्यापैकी मते मिळतील मात्र एकाही ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून येणार
नाही. मुस्लिम काँफरस  आणि जम्मू काश्मीर काँफरन्स या दोन्ही  पक्षाला मिळून तीन ते चार जागा मिळतील. मुस्लिम काँन्फरस हा पक्ष पाकिस्तान पिपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पैकी जो पक्ष सत्तेचा जवळ येईल त्या पक्षाबरोबर हातमिळवणी करुन सत्तेत येवू शकतो. जर पाकिस्तान तेहरीके इंसाफ पक्ष पाकिस्ताने अनधिकृतरीत्या ताब्यात ठेवलेल्या आझाद काश्मीरमध्ये  सत्तेत आला तर पाकिस्तानात सिंधचा अपवाद वगळता सर्व प्रांतीय विधानसभा आणि केंद्रीय सत्तेत हा पक्ष असेल. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार याठिकाणी आझाद काश्मीरमधील जनतेमार्फत निवडुन येत असलेल्या 33 उमेदवारांमध्ये पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाच्या उमेदवारांचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे तोच पक्ष सत्तेत येवू शकतो.
पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाच्या विरोधकांनी  पाकिस्तान तेहरीके इंसाफ पक्षातर्फे अन्य पक्षातील उमेदवार फोडणे निवडणूकीत गैर प्रकार करणे असे आरोप केले आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने केलेल्या प्रचारसभेत प्रदेशाच्या विकासाऐवजी भारतविरोधी गरळ ओकल्याचे तसेच या प्रदेशात भारतात जायचे की पाकिस्तानात जायचे या बाबत सार्वमत घेण्यात येणार असल्याची घोषणा केली  असल्याचा मुद्दा द  हिंदूने दिलेल्या बातमीत सांगितला आहे. 
एकंदरीत भारत पाकिस्तान यांच्या संबंधात  महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या प्रदेशातील निवडणूका या दोन्ही देशांसाठी महत्तवाचा आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?