अशांत पूर्वांचल


आपल्या महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला असताना भारताच्या एका टोकाला असणाऱ्या दोन राज्यात अर्थात आसाम आणि मिझोराम  राज्यात  सीमेवरून वाद उफाळला आहे . सन 1972  साली आसाम राज्याचे  राज्याचे पुनर्गठन झाल्यापासून तीव्रता या प्रश्नातील दाहकता वाढली होती ,जिने गेल्या काही वर्षापसूम  गंभीर स्वरूप धारण केले आहे . मी या आधी याच ब्लॉग  मधून  समस्येविषयी लिहले होते . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे . 

सध्या या समस्येने अत्यंत हिंसक स्वरूप दाखल केले आहे  आसाम राज्यात . 10 जुलैपासून सुरु असलेल्या या ताज्या संघर्षात  सर्वप्रथम  10  जुलै रोजी आसाम मिझोराम यांच्या सीमावर्ती  भागात मात्र आसाम राज्यात  एक छोटासा बॉम्ब ब्लास्ट झाला दुसऱ्याच दिवशी अर्थात11   जुलै रोजी सीमावर्ती भागाच्या मिझोराम  राज्यात बॉम्बब्लास्ट झाला याबाबत दोन्ही राज्यांनी विरोधी राज्याला जवाबदार धरले 24 जुलैच्या मध्यरात्री आसाम राज्य

पोलिसांनी मिझोरामच्या प्रदेशात घुसून तेथील नागरिकांवर अत्याचार केले असे सांगत मिझोराम राज्यातील नागरिकांनी आसाम राज्य पोलिसांवर हल्ला केला .  मिझोरामच्या जनतेकडून झालेल्या हिंसाचारात आसाम मधील 7  पोलीस गंभीर जखमी झाले झाले .ज्यातील 6 पोलिसांचा दुर्दैवी मृत्य झाला आहे या हिंसाचारात तिथे कार्यरत असणारा भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मूळच्या महाराष्ट्रीय  वैभव निबाळकर सुद्धा ग जखमी झाला आहे .सदर घटना घडल्यावर दोन्ही राज्याचा मुख्यमंत्रांकडून ट्विटर वर एकमेकांवर अनेक आरोप करण्यात आले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या वादात मध्यस्ती केल्यावर या भागात तनवापूर्ण शांतता आहे 

     तसे भारताला दोन राज्यात असणारे वाद नवीन नाहीत .पंजाब आणि हरियाणा या राज्यातील चंदीगढच्या मालकी हक्कावरून असणारा वाद, तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात कावेरी पाणी वाटपावरून सुरु असणारा वाद किंवा आपल्या महाराष्ट्राचा गोदावरी नदीवरील बाभळी बंधाऱ्यावरून तेलंगणा राज्याबरोबर बरोबर असणारा वाद ही त्यांची काही प्रातिनिधिक उदाहरणे . कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरु असलेल्या वादाला थोडी हिंसक पाश्वभुमी आहे . मात्र सध्या असणाऱ्या वादाला त्यापेक्षा जास्त हिंसक पाश्वभुमी आहे तसेच कर्नाटक तामिळनाडू पेक्षा हा भाग अति संवेदनशील आहे . म्यानमार मधून चालणारी अमली पदार्थाची वाहतूक तसेच फुटीरतावादी

शक्तींच्या चालणाऱ्या कारवाया . बांगलादेशकडून होणारी घुसखोरी तसेच दुर्गम भौगोलिक परिस्थिती , प्रगतीच्या अभाव .  जलद दळणवण व्यवस्था नसणे,वांशिक आणि धार्मिक ओळख भारताच्या  इतर भागापेक्षा वेगळी असणे  आदी समस्या आसाम मिझोराम सीमावर्ती भागात आहेत .ज्या अन्य राज्याचा वादात नाहीये त्यामुळे या वादाला विशेष महत्व आहे 

तो लवकरात संपवा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुते थांबतो, रामराम 

या समस्येची माहिती देणाऱ्या लेखाची लिंक पुढीलप्रमाणे 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/10/blog-post_25.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?