स्वामी विवेकानंद, भारतीयांना भारतीय तत्वज्ञानाची नव्याने ओळख करुन देणारे व्यक्तीमत्व

 

 समस्त भारतीयांचे ज्यांचे नाव जरी ऐकले अंग स्फुरले जाते ,असे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद येत्या 4 जूलै रोजी त्यांची 119 वी पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.
 स्वामी विवेकानंद यांचे  भारतीयांसाठी खुप मोठे योगदान आहे. विविध प्रकारची समाजसेवा करणारे रामकृष्ण मठ हे त्यापैकीच एक. ज्याविषयी   मी  काल लिहले होते.. आज मी आपणासी  बोलणार आहे, स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांना भारतीय तत्वज्ञानाची नव्याने कसी ओळख करुन दिली याबाबत.
   मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा कार्यकाळात ब्रिटिशांचे शासन होते. त्यामुळे खेत्रीच्या संस्थानिकांंसारख्या अनेकांचा भारतीय तत्वज्ञानावरील विश्वास उडाला होता. भारतीय तत्वज्ञान हे पुर्णतः टाकाउ आहे. जर तूम्हाला जगात चांगले जगायचे असेल तर आपणास पाश्चात्य तत्वज्ञान अंगिकारणे, आवश्यक आहे असा अनेकांचा
समज होता. त्यांना भारतीय तत्वज्ञानाचा मोठेपणा स्वामी विवेकानंद यांनी सोदारक्षण पटवून दिला. पाश्चात्य कार्यसंस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांंचा सेतू स्वामी विवेकानंद यांना अपेक्षीत होता, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. 
     स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला असला, तरी ते जसेच्या तसे त्या वेळेस आचरणात होते तसे स्विकारले नाही . केरळ राज्यात सुरु असणाऱ्या धर्मामाचरणावर त्यांनी कडक शद्बात आसुडसुद्धा ओढले. त्या वेळच्या केरळ राज्यातील धर्माचरणाची  त्यांनी मनोरूग्णालय असी निर्भत्सना केली.  हिंदू धर्मातील स्पुर्श अस्पुर्श ही संकल्पना चूकीची असल्याचे त्यांनी आपल्या जीवनात बालपणी आणि पुढील आयुष्यात देखील दाखवून दिले. याबाबतची त्यांची वडीलांना भेटायला येणाऱ्या लोकांना ओढायला ठेवलेल्या हुक्याची तसेच रेल्वे स्टेशनवर घडलेल्या प्रसंगाची गोष्ट प्रसिद्ध आहेच. 
स्वामी विवेकानंदाना भारतीयांनी पाश्चात्य तत्वज्ञानाऐवजी पाश्चात्यांची एकत्रीत समुहात काम करण्याची प्रवृत्ती अंगिकारावी, असे वाटत होते.  रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेमार्फत मराठीत प्रसिद्ध केलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पत्रामध्ये आपणास याचा वारंवार प्रत्यय येतो.( ही पत्रे स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा परीजार्वक अवस्थेत तसेच अमेरीकेत कार्य करताना आपल्या सहकार्यांना लिहलेली आहेत.) स्वामी विवेकानंद
यांनी पाश्चत्यांनाच नव्हे, तर भारतीयांना देखील भारतीय तत्वज्ञानाची ओळख करुन दिली, ही गोष्टी यामुळे स्पष्ट होत आहे.
 स्वामी विवेकानंद यांचे कार्य खुप मोठे आहे. मात्र हे समाजमाध्यमावरील लेखन आहे. जे प्रामुख्याने मोबाईलवर वाचले जाते. त्यामुळे यास विस्ताराचा मर्यादा आहेत. तरी आपली रजा घेतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?