विलक्षण प्रतिभेचा, बहु आयामी , हळव्या मनाचा सिने दिग्दर्शक, सिने निर्माता..... गुरूदत्त

 

  आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक, सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता, काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते. दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो. अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमार शिवशंकद पदूकोन अर्थात गुरुदत्त .
  अत्यंत हळव्या मनाचे, प्रतिभाशाली बहू आयामी सातत्याने नाविन्याचा ध्यास असणारे बाँलीवूडमधील सिने निर्माते सिने दिग्दर्शक म्हणून तै सुविख्यात आहेत.9जूलै ही त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.
आज गुरुदत्त यांना आपल्यामधून जावून 50 वर्षांपेक्षा अधिक कालखंड उलटला आहे. मात्र त्यांचे चित्रपट आज देखील काळजाला भिडतात, आपलेच जीवन तर चित्रपटात दाखवले नाही ना, असे वाटावे इतके सत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाचा समाजावरील परीणाम त्यांना पुर्णपणे माहिती असल्याचे त्यांचे चित्रपट बघताना वारंवार जाणवते. गुरुदत्त हे काळाच्या पुढे बघणारे सिने दिग्दर्शक , सिने निर्माते होते. त्यांनी तयार केलेल्या चित्रपटांचे कथानक आपणास खिळवून ठेवते पटकथेवर.त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे त्यांचे चित्रपट बघताना समजते.आपणास हवे असणारे दृश्य चित्रीत करण्यासाठी प्रकाश योजना कस्या प्रकारे हवी आहे. याचा फारच
बारकाईने अभ्यास केल्याचे त्यांचा चित्रपटातून दिसते. कागज के फूल या चित्रपटातून ते स्पष्टपणे जाणवते सुद्धा 
   नेहमी प्रयोगशील असणारे गुरुदत्त मनाने मात्र प्रचंड हळवे होते. एखाद्यावर त्यांचे चटकन प्रेम जडत असे.  त्यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. आपल्या कलाकृतीवर ते प्रचंड प्रेम करत, दुसऱ्या व्यक्तीने व्यावसायिक यशापशयाचा विचार करून त्यांचा कलाकृतीमध्ये बदल सुचवला तरी ते त्याबाबत फारसे तयार नसत. त्यांनीच पुढे आणलेल्या अलबार अल्वी यांनी त्यांचा गुरुदत्त यांचाबरोबर सहवासाचे वर्णन करणारे ten years with Guru dutt नावाचे पुस्तक लिहले आहे,त्यात ही बाब विशेष स्पष्ट करून सांगितली आहे. त्यांचा हळव्या मनाचे प्रत्यंतर त्यांचा वैयक्तिक आयुष्यात उमटलेले दिसते.गीता दत्त बाली यांच्या बरोबरचे वादळी वैवाहिक आयुष्य, वहिदा रेहमान यांच्या बरोबरचे अयशस्वी न फुललेले प्रेम जीवन याचीच साक्ष देतात.
गुरुदत्त यांच्यावर खुप काही लिहता येवू शकते, मात्र हे समाजमाध्यमावरील लेखन असल्याने तूर्तास इतकेच, नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?