( बातमीतील चीन भाग 16)

         


    काही  विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चीन बातम्यांचा अग्रभागी येण्यास सुरवात झाली आहे  गेल्या आठवड्याभरत चीन विषयी तीन मोठ्या घडामोडी घडल्या . चीन आपला  शत्रू आहे . पाकिस्तान चीनच्याच मदतीने आपल्या भारतविरोधी कारवाया करत असतो .त्यामुळे आर्य चाणक्य नीतीनुसार तेथील घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे  समर्थ रामदास स्वामी यांच्या  आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे  उक्तीनुसार त्याविषयी पंस अवगत करण्यासाठी आजचे लेखन 

         तर मित्रानो तैवानच्या मुद्यावरून चीन आणि युरोप खंडातील एक देश असणाऱ्या लिथिनवेनिया या देशाबरोबरचे आर्थिक संबंध अडचणीत येणे चीनने युनाटेड अरब अमिरात (UAE ) या देशात एक ब्लॅक साईट  तयार केल्याचे  ठिकाणी उघर मुस्लिम बांधवाना ठेवल्याचे स्पष्ट होणे आणि सिपेक च्या कामासाठी पाकिस्तानातील ग्वादार या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या चिनी नागरिकांवर हल्ला होणे या त्या घटना आहेत आता बघूया या घडामोडी विस्ताराने 

           पहिल्यांदा  लिथिनवेनिया या देशाबरोबरची घडामोड बघूया  तर युरोप खंडातील देश असलेल्या लिथिनवेनिया या देशाने युरोपात पहिल्यांदा तैवान हा स्वतंत्र देश असून आम्ही त्याच्याशी स्वतंत्रपणे व्यवहार करणार आहोत असे 20 जुलै रोजी  जाहीर केले.   लिथिनवेनिया  या देशात तैवान देशाचे राजनैतिक ऑफिस उभारले जाणार होते त्याला आमच्याकडून तैवान हे नाव दिले जाईल असे लिथिनवेनिया देशाकडून जाहीर

केल्यावर हा वाद सुरु झाला .  तैवानच्या चीनचा मते तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे.  त्यामुळे त्याच्याशी स्वतंत्र संबंध गैर आहे अशी चीनची भूमिका आहे.  चीन तैवानला चिनी तैपेई मानतो  लिथिनवेनिया या देशाने तैवान या देशाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे चीनने  त्यांचा  लिथिनवेनिया या देशातील राजदूत माघारी बोलावला त्याला प्रत्युत्तर म्हणून  लिथिनवेनिया या देशाने देखील चीनमधील त्यांचा राजदूत माघारी बोलावला आहे यानंतर 10 ऑगस्ट रोजी चीनकडून  लिथिनवेनिया  या देशाबरोबर असणारे आर्थिक संबंध तोडून टाकत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे 20  .ऑगस्ट रोजी चीनकडून लिथिनवेनिया या देशाला चीनच्या सरकारी रेल्वेकडून एकही कटनेर पाठवला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे चीनमार्फत लिथिनवेनिया तैवानला  देत असणारी सन्मानाची वागणूक  लिथिनवेनियाला त्रासदायक ठरू शकते असे जाहीर करण्यात आले आहे . लिथिनवेनियाकडून आम्ही या धमक्यांना घाबरत नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे . लिथिनवेनिया  देश हा ईयू आणि  नाटोचा सदस्य देश आहे अमेरिकेने आम्ही लिथिनवेनिया  देशाबरोबर आहोत. असे जाहीर केले आहे तैवान या देशाचे जगभरातील  राजनैतिक ऑफिस चायनीज तैपेई या नावाने ओळखले जाते मात्र त्यास देशाच्या म्हणजेच तैवान या देशाला  जाणीवरून सुरु झालेल्या वादावरच्या विविध घडामोडी मी तुम्हला सांगेलच आता बघूया दुसरी घडामोड 

तर चिनी सरकारच्यातर्फे  हॉंगकॉंगमध्ये चालवण्यात येणाऱ्या दडपशाही विरोधात समाज माध्यमाद्वारे लेखन करणाऱ्या हान चिनी वंशाच्या चिनी महिलेद्वारे चिनी सरकारद्वारे युनाटेड अरब अमिरात (UAE ) या देशात एक ब्लॅकसाईट तयार केल्याचे जाहीर करण्यात आले या ठिकाणी 2उघर मुस्लिम बांधवाना देखील ठेवल्याचे जाहीर केले होते सदर महिला आता नेदरलँड मध्ये आश्रयास आहे . ब्लॅक साईट म्हणजे एक प्रकारचा तुरुंग असतो ज्यामध्ये आता टाकलेल्या आरोपीस कायदेशीरपणे कोणतेही सरंक्षण असते या मध्ये टाकण्यासाठी कोणतेही कारण नसले तरी चालते यातुन बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे ब्लँक साईट चालवण्याचा विनंतीववरच अवलुबुन राहावे लागते . चीनमध्ये अश्या ब्लॅक साईट खूप मोठ्या प्रमाणवर आहेत  त्या विषयी अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमातून बोलले जात आहे मात्र चीनबाहेर चीन सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या ब्लॅक साईट असतील याबाबतआतापर्यन्त फक्त  शंका व्यक्त केल्या होत्या . या हान चिनी महिलेच्या वक्तवव्यामुळे त्याची पुष्टी झाली आहे . चीनच्या दडपशाहीचा एक नमुना म्हणून आपण या घटनेकडे बघू शकतो . 

आता बघूया तिसरी घडामोड तर  पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान एकॉमोमिक कॉरिडॉर अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पाममध्ये आत्मघातकी स्फोट होऊन काही चिनी नागरिकांची हत्या झाली आहे बलुचिस्तानमधील ग्वादार या बंदराच्या ठिकाणी हा हल्ला झाला आहे पाकिस्तानी सरकारच्या मते या मध्ये 2 चिनी बालकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर स्थानिक वृत्तपत्र असलेल्या बलुचिस्तान पोस्ट या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार 9  जणांचामृत्यू झाला आहे गेल्याच महिन्यात याच चायना पाकिस्तान एकॉमोमिक कॉरिडॉर अंतर्गत सुरु असलेल्या दासू डॅममध्ये

स्फोट झाला होता ज्यामध्ये अनेक चिनी इंजिनीयर्स चा मृत्यू झाला होता बलुचिस्थानतील स्थानिक जनतेचा या प्रकल्पना विरोध आहे त्यामुळे हे हल्ले होत आहे 

आपला प्रमुख शत्रू असलेल्या चीनबाबत सांगितलेल्या बाबी आपणास आवडल्या असतील असे मी मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?