भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 9)

         


       आपण   आपल्या  भारताचा 75  स्वातंत्र्यदिन साजरा  करत असताना अफगाणिस्तानमधून अत्यंत वेदनादायक बातमी समोर येत आहे तालिबानने काबूलचा ताबा घेतल्याची ती बातमी आहे. अफगाणिस्तानचे लोकनियुक्त राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्याचे सांगण्यात येत आहे . तालिबान काबूलमध्ये रक्तपात  इच्छित नाही तेथील सरकारने स्वतःहून अफगाणिस्तानची सत्ता तालिबांकडे हस्तांतरित करावी , असे तालिबांकडून जाहीर करण्यात आले आहे . अफगाणिस्तानमधून अमेरिका पूर्णपणे बाहेर पडल्यावर काही महिन्यांनी अफगाणिस्तानची सत्ता तालिबानकडे येईल असे वाटतं होते मात्र अमेरिकाअफगाणिस्तानमधून पूर्णतः बाहेर पडण्याचा आधीच अफगाणिस्तानची  सत्ता तालिबांकडे आली आहे अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारकडे तालिबानपेक्षा अधिक लष्करी जवान तसेच मोठ्या प्रमाणत दारुगोळा आणि  तालिबानकडे नसणारे हवाई दल  अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारकडे असून देखील अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारचा पराभव झाला आहे . आणि कट्टर धार्मिक मध्ययुगीन मानसिकता असणाऱ्या तालिबानला सत्ता मिळाली आहे . 

               काही लोक अमेरिकेने घरी जाताना कचरा नको म्हणून काहिस्या बिघडलेलं मारक क्षमता काही  प्रमाणात कमी झालेली लष्करी साधनसामुग्री तशीच सोडून जाणे तसेच गरज नसताना पूर्णपणे देश सोडण्याची केलेल्या घोषणेमुळे वाढलेले तालिबानचे बळ यामुळे तालिबान सत्तेत येणे सोपे झाल्याचा दावा करतील जो काही

अंशी खरा देखील आहे मात्र संख्येने जास्त असून देखील आत्मविश्वास गळालेली अफगाण सेना देखील त्यास कारणीभूत आहे हे नाकारून चालणार नाही अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारने भारताकडे मागितलेली मदत भारताने न देणे हेही एक कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत येण्यास कारणीभूत आहे 

तालिबान सत्तेत आल्यावर महिलांची  मुस्कटदाबी देखील सुरु झाली आहे .  अश्या बातम्या बीबीसी,  सीएनएन आदी माध्यमातून दिल्या आहेत या मुळे अमेरिकेने गेल्या वीस वर्षात प्रगतीच्या वाटेवर आणलेला अफगाणिस्तान पुन्हा एकदा मध्ययुगात जाण्यास सुरवात झाली आहे .  सन 1973 मध्ये अफगाणिस्तानची साक्षरता 4% होती  त्यावेळी त्यावेळच्या  कम्युनिष्ट सरकारने केलेल्या सुधारणेला विरोध करताना उभ्या राहिलेल्या कट्टरतेला आपल्या विचारधारणेच्या विरुद्ध विचारधारेच्या विरुद्ध वापरण्यासाठी अमेरिकेने उभा केलेला हा राक्षस आता अफगाणिस्तानच्या सर्वसामान्य गोर गरीब जनतेला प्रचंड त्रास देत आहे . पाकिस्तानने भारताला अडचणीत आणण्यासाठी या सापाला वेळोवेळी अन्न देवून जिवंत ठेवले ज्याची किंमत आज अफगाणिस्तानमधील जनता 

चुकवत आहे .  अशिक्षित जनतेत धार्मिक विचारांचा पगडा मोठ्या प्रमाणावर असतो 1979 साली तालिबानची निर्मिती सुरु असताना अफगाणिस्तानमधील अल्प साक्षरतेमुळे तालिबानला समर्थनच मिळाले त्यावेळेस जर अफगाणिस्तानची जनता मोठ्या प्रमाणात साक्षर असती तर हे चित्र नक्कीच दिसले नसते अर्थात इतिहासात जर तर ला काहीच महत्व नसते वर्तमान काय आहे यालाच कधीही महत्व असते आणि तालिबानच्या अफगाणिस्तानमध्ये पुन्हा साता हाच येथील वर्तमान आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?