वंदन त्यांचा बलीदानास !

   

                     आजपासून 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.खलीस्तान आंदोलनानंतर पंजाब शांत होत होता . तो आँगस्ट मधील रविवार होता. तारीख होती 10 आँगस्ट 1986 .पुणे शहरातील कँम्प भागात अचानक गोळीबार होतो.दुचाकीवरुन आलेल्या  दोन व्यक्ती घरासाठी भाजी घेवून  जाणाऱ्या   कारमधील दोन जणांना गोळ्या घालून पसार होतात. गोळीबारामुळे दोघांचाही मृत्यू होतो . आणि इतिहासात नोंद होते. दोन वर्षापुर्वी 1984 जून 3 रोजी झालेल्या आँपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची खलीस्तानवादी अतिरेक्यांनी हत्या केली. या गोळीबारात माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या मानेत आणि पाठीत एकुण 8 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू होतो. तर त्यांचा अंगरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .
                    आज 2021 साली त्यांच्या हौताम्यास 35 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांनी भारताच्या एकात्मेतेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावून खिंड लढवली. हे अतिरेकी पुढे आपल्या प्राणांचे मोल घेवू शकतात, हे माहिती असूनसुद्धा त्यांनी हे कार्य केले. ज्यांना जम्मू काश्मीर , हिमाचल प्रदेश,  पंजाब यातील भौगोलिक अडचण माहिती आहे. त्यांना  हे किती धाडसी आणि देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक कृत्य होते. हे समजून येईल गेल्या काही वर्षापर्यंत हिमाचल प्रदेशाची सीमा काश्मीर खोऱ्यास लागून असली तरी  हिमाचल प्रदेशातून काश्मीर खोऱ्यात जाण्यास बारामाही रस्ता नव्हता.  (आता ही सोय झाली आहे. त्याबद्दल सध्याचा केंद्र
सरकारचे अभिनंदन करायलाच हवे )  पुर्वी काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी पंजाबमधूनच एकमेव रस्ता होता. दुर्देवाने पंजाब हातातून गेले असते, तर काश्मीरवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले असते .मात्र लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या नेर्तुत्वाखालील लष्कराने ही नामुष्की टाळली.देश अखंड राहिला. खलिस्तान आणि भिद्रावाला या दोन राक्षसांची समस्या होण्यामागे कोणत्या दोन पक्षांचे अंतर्गत राजकारण कारणीभूत होते, याचा उहापोह करुन मला त्यांचा हौतात्म्याचा अनादर करायचा नाही. ही पोस्ट वाचणाऱ्यांनी देखील करु नये, असे मला वाटते. देशाची एकात्मता राखण्यासाठी एका मराठी भाषिक  व्यक्तीने आपले रक्त सांडले असीच याची नोंद घ्यावी असे मला वाटते.्
              या वीरपुत्राची हौत्माम्याची तारीख आहे, 10 आँगस्ट. जी योगायोगाने माझी जन्मतारीख सुद्धा आहे (अर्थात वर्ष वेगवेगळे) याचा मला वैयक्तिकरीत्या अभिमान आहे. {तसे 10 आँगस्ट या दिवशी 1758 साली पेशव्यांनी अटक जिंकले होते. ज्यामुळे मराठीतील एका म्हणीचा जन्म झाला मराठी भाषिकांची ध्वजा उंचावणारी ही घटना आहे , याबाबत कोणाचे दुमत नसावे. 1765 साली  याच दिवशी पेशवाइतील दुर्देवी अस्या नारायणराव पेशवे【काका मला वाचवा】 यांचा देखील  जन्म झाला } स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासातील एक महत्तवाची घटना म्हणून जनरल अरूणकुमार वैद्य  यांच्या हत्येची नोंद घ्यावीच लागेल, याबाबत कोणाच्या मनात शंका नसावी. आँपरेशन ब्ल्यु स्टार आणि त्यानंतर पंजाबमध्ये वाढलेली व्यसनाधिनता, अशांतता याविषयीच्या बातम्या आजही आपल्या माध्यमात येत असतात. आँपरेशन ब्ल्यु स्टारनंतर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात फैलावलेल्या मादक द्रव्यसेवनावर आधरीत उडता पंजाब हा चित्रपट ही पोस्ट वाचणाऱ्यांनी बघावाच. त्यात हा मुद्दा खुपच उत्तम पद्धतीने मांडला आहे .
                   जनरल अरुण श्रीधर वैद्य हे भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. इ.स. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र पुरस्कार मिळाला. नंतर इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी ते भारतीय भूदलाचे प्रमुख होते. ते लष्करातून 1986 जानेवारीत निवृत्त झाले . निवृत्तीनंतर  त्यांनी पुण्यास आपले वास्तव्याचे ठिकाण केले. त्यानंतर 8 महिन्यातच खलीस्तानवादी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. सन 1945 साली लष्करामध्ये दाखल झालेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांनी 1986पर्यत देशाची सेवा केली. निवृतीपूर्वी सुमारे अडीच वर्षे ते लष्करप्रमुख होते. अमृतसर येथील शिखधर्मीयांच्या पवित्र पाच ठिकाणांपैकी एक असणाऱ्या सुर्वण मंदिरात लष्कर घूसवण्याची कार्यवाही       त्यांचाच कार्यकाळात झाली. दोनदा महावीर चक्र मिळवणारे सेनापती असुन देखील जनरल अरुणकुमार वैद्य याच कारणासाठी ओळखले जातात. पुढे याच कारवाईच्या रागातून दोन शीख तरुणांनी त्यांची हत्या केली. आणि भारत एका लढवय्याला मुकला. भारताची अमर्याद हानी जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या त्या हत्येने झाली. जी कदापी भरुन येणे अशक्यच.त्यांच्या 35 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली ,जय हिंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?