वंदन दोन सारस्वतांना !

       

   त्या दोन व्यक्तींची जन्मतारीख एकच 13 ऑगस्ट . फक्त वर्ष वेगवेगळे . एकाचे 1890 तर दुसऱ्याचे 1898   मात्र त्या दोघांमध्ये अजून एक साम्य आहे ते म्हणजे दोघेही मराठी भाषेतील  सिद्धहस्त साहित्यिक . एकाच्या कवितांनी भल्या भल्याना वेड लावले त्यांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर मराठीतील काव्यप्रकार सातासमुद्रापार पोहोचला असता . अल्पायुषीचा शाप मिळालेल्या त्यातील एकाने स्वतःच्या ऊणा पुऱ्या 28  वर्षाचा आयुश्यात मराठीतील सर्वात्तम म्हणता येईल अशी काव्यरचना केली . दुसऱ्या व्यक्तिबाबाबत तर विचारायलाच नको . त्या व्यक्तीने साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपली छाप सोडली . साहित्याबरोबर त्यांनी लोकशाहीच्या चार  स्तंभापैकी एक असणाऱ्या पत्रकारितेवरही आपली छाप मांडली . मी बोलत आहे बालकवी म्हणून परिचित  असलेल्या  त्रंबक बापूजी ठोंबरे आणि केशवकुमार म्हणून परिचित असणाऱ्या  आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याविषयी  13 ऑगस्ट ही  या दोंघांची
जयंती त्या निमित्याने मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 
                         निसर्गकवी म्हणून परिचित असणाऱ्या बालकवी अर्थात त्रंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितेत निसर्गाच्या विविध छटांचे वर्णन खूपच लयबद्ध  सहजगाता येईल अश्या प्रकारे केलेले आढळते . त्याची  श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाते चोहीकडे ही कविता या बाबत खूपच प्रसिद्ध आहेच. सध्या सुरु असलेल्या श्रावणाचे खूपच सुंदर वर्णन यात केलेले आढळते . बालकवीनंतर उदयास आलेल्या बा सी मर्ढेकर आणि ना. धोमहानोर यांच्या कवितेवर बालकवींच्या कवितेचा प्रभाव जाणवतो असे काही अभ्यासकांचे मत आहे बालकवींचा जन्म  13 ऑगस्ट 1890रोजी त्यावेळेच्या धुळे जिल्ह्यातील आणि आताच्या  जळगाव जिल्ह्यतील धरणगाव येथे झाला   .. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉकान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात त्रंबक बापूजी ठोंबरेंयाना  बालकवी ही उपाधी दिली.त्यानंतर ते त्याच नावाने प्रसिद्ध झाले 
                 आचार्य अत्रे यांच्या हजारजवाबीपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला साहित्याचा सर्व प्रांतात त्यांनी भटकंती केली . त्यांनी वृत्तपत्रीय सद्यस्थितीवर भाष्य करणारे लेखन केले त्यांनी नाटके लिहली, त्यांनी काव्यरचना देखील केली काही कादंबऱ्या देखील त्यांनी लिहल्या आहेत .त्यांनी आपल्या लेखनाद्वारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीस नेहमीच समर्थन दिले त्यासाठी तुरुंगवास देखील भोगला ,एखादयला चटकन हसवणारे लेखन करणारा व्यक्ती त्याचा दुसऱ्या लेखात डोळ्यात पाणी आणणारे लेखन सुद्धा करू शकतो
हे त्यांनी स्वतःच्या लेखनातून दाखवून दिले . त्यांनी साने गुरुजींवर मराठा या वृत्तपत्रात लिहलेला मृत्युलेख डोळ्यांचा कड पाणवल्याशिवाय राहत नाही त्यांनी तयार केलेल्या श्यामची आई या चित्रपटाला 1954  राष्ट्रपतींनी सुवर्ण कमळ देऊन गौरवले श्यामची आई हा भारतातील  पहिला  सुवर्ण कमळ विजेता चित्रपट होता . मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी संपादकीयाच्या माध्यमातून अनेक महतवाच्या विषयावर त्यांनी समाजाचे मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन केले . 
आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या दोघांना त्यांचा योगदानाबद्दल शतशहा नमन . 
                       


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?