अवयवदान श्रेष्ठदान


वळपास सर्वधर्मीयांमध्ये दानाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे . प्राचीन काळी जेव्हा ज्या गोष्टी त्यावेळच्या समाजाला ज्ञात होत्या . त्यातील सर्वाधिक समाजोपयोगी वस्तूंचे दान त्यावेळी करायला  सांगितले होते  . ज्यामध्ये धान्य , विविध वस्तू आणि आर्थिक वस्तू यांचा समावेश होता . समाज नेहमी प्रगतशील असतो , समाजाच्या जगण्याच्या पध्द्तीत कायम बदल होत असतो त्यानुसार दानाच्या गोष्टी देखील बदललेल्या आपणस दिसतात , . सध्याच्या विविध आरोग्याच्या समस्यासनी माणसे ग्रस्त असताना जर दान करायचे झाल्यास ते मानवी अवयांचे करणे अधिक संयुक्तिक आहे . मानवाने आज कितीही प्रगती केलेली असली तर हात पाय वगळता अन्य मानवी अवयव मानवास अद्याप तयार करता आलेले नाहीत . त्यामुळे  अवयवदानाचे   महत्व आयनोसाधारण आहे . हे महत्व समाजाला समजावे म्हणून संयुक्त राष्ट संघातर्फे १३ ऑगस्ट हा दिन आंतर राष्ट्रीय अवयदान म्हणून साजरा करण्यात येतो .

                    ज्या व्यक्तीचा मृत्यू एखाद्या साथीच्या आजारात, अथवा एडस्, कावीळ, मधूमेह या प्रकाराच्या आजारामुळे झालेला नाही, असी व्यक्ती अवयवदानाबाबत पात्र ठरते.जर भूतकाळी करोना सारखा साथीचा

आजार झालेला असून  त्यातून बरे झालेल्या व्यक्ती  त्यानंतर सहा ते नउ महिन्यानंतर मृत झाल्यास त्या व्यक्ती देखिल अवयवदानास प्राप्त ठरतात .मात्र या काळाच्या आधी व्यक्ती मृत झाल्यास अस्या व्यक्ती अवयवदानास अपात्र ठरतात .

                           आपण आपल्या शरीराचे मूत्रपिंडफुफ्फुसे,  हृदय,  डोळेस्वादुपिंड,  कॉर्निया,  छोटे आतडे,  त्वचेच्या ऊती,  हाडांच्या ऊती हार्ट वाल्व्हशिरा इत्यादी अवयव दान करू शकतोएक अवयवदाता  त्याच्या चांगल्या  अवयवांचे दान करून आयुष्यात 8 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवू शकतो.एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे लाख लोक त्यांचे महत्त्वाचे वाया निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडत असतात . आपल्या भारताच्या विचार केला असता ज्या शहराची लोकसंख्या हि लाख असते त्या गावात महानगरपालिका स्थापन करण्यात येते . त्याचा विचार करता आपण समजू शकतो की जवळपास एका मोठ्या महानगर एव्हढी लोकसंख्या जर आपण जर अवयव दान केले तर वाचू शकते .आपल्या शरीराचे काही अवयव जिवंतपणी दान करता येतात, तर काही अवयव दान करण्यासाठी व्यक्ती मृत असणे भारतीय कायद्यान्वये आवश्यक आहे.अवयवदानासाठि ब्रेन डेड व्यक्तीसुद्धा मृत समजली जाते

                जर आपणास आपल्या मृत्यूपश्चात आपले अवयवदानासाठी देयचे असतील तर आपणास अवयवदानाची सोय असणाऱ्या रुग्णालयात अर्ज भरुन देणे आवश्यक असते . त्या अर्जानूसार आपल्या मृत्यपश्चात आपल्या नातेवाईकांनी संबधीत रुग्णालयात कळवल्यावर व्यक्तीचे शरीर दान करता येते. मृत शरीरातील कोणता अवयव किती वेळापर्यंत वापरता येतो , याचे नियम ठरलेले आहेत. त्यामुळे अवयवदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तींचा नातेवाईकांनी लवकरात लवकर संपर्क साधणे आवश्यक असते.

  आपल्याकडे जून्या कृष्णधवल काळातील हिंदी चित्रपटातील एक गाणे आहे, " किस्कीको मुस्कराहटों पे हो निसान, किसीका दर्द मिल शके तो लेले उधार , जिना इसिका नाम है !" तर मग दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी भराल ना मृत्यूपश्चात अवयवदानाचा अर्ज आणि त्या साठी आंतराष्ट्रीय अवयवदान दिनापेक्षा उत्तम मुहूर्त तो कोणता असणारा 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?