जगात हे बी घडतंय

   

     आपल्या भारतातील माध्यमे अफगाणिस्तान विषयक बातम्या देण्यात मग्न असताना  पृथ्वीगोलाच्या विचार करता आपल्या  भारताचा पूर्णतः विरुद्ध दिशेला असणाऱ्या हैती देशात फार मोठा म्हणजे 7.2 रिक्टर स्केलचा भूकंप झाला आहे ज्यामध्ये ला लेख लिहण्यापर्यंत (16 ऑगस्ट सायंकाळ ) 1300  लोकांचा मृत्यू झाल्याचे साऊथ चायना पोस्टतर्फे प्रकाशित बातमीत म्हंटले आहे . भूकंपामुळे कोसळलेले ढिगारे काढण्याची प्रक्रिया अजून सुरु असल्याने हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकण्याची शक्यता असल्याचे  या बातमीत सांगितले आहे हे काम खूपच संथ गतीने सुरु असल्याचे न्यूयॉर्क टाइम्स च्या बातमीत सांगितले आहे आजपासून अकरा वर्षांपूर्वी अर्थात 12 जानेवारी 2010 रोजी हैतीत या पेक्षा थोडा कमी म्हणजे 7 रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता ज्यामध्ये 2  लाख 20 हजार लोक मृत्युमुखी पडले होते सध्याचा भूकंपामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होणार नसल्याचे तेथील पंतप्रधानांनी जाहीर केले आहे . कॅरिबियन प्लेट वर्षाला 20 मिलीमीटर ईशान्य बाजूला दिशेला उत्तर अमेरिका प्लेटकडे  सरकत असल्याने हा भूकंप झाला आहे 
         भारतीय प्रमाणवेळेनुसार 14ऑगस्ट रोजी सायंकाळी  6 वाजता हा भूकंप झाला.  हैती देश पश्चिम गोलार्धातील (जागतिक प्रमाणवेळेच्या डाव्या बाजूच्या आंतराष्ट्रीय वार रेषेपर्यंतच्या भागाला पश्चिम गोलार्ध म्हणतात ) सर्वात गरीब देश आहे सुमारे दीड  महिन्यापूर्वी हैती देशाच्या राष्ट्रपतींची तेथील दहशतवाद्यांनी राष्ट्रपतींच्या खाजगी घरात घुसून हत्या केली तेव्हापासून आधीच सुरु असलेल्या राजकीय लाथाळ्यांना वेग आला
आहे . त्यात हा भूकंप . अमेरिकन भूगर्भ संस्थेमार्फत सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे . हे कमी  काय काय म्हणून Grance नावाचे उष्ण  कटिबंधीय प्रदेशात येणारे चक्रीवादळ येण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत (उष्ण  कटिबंधीय प्रदेशात येणारे चक्रीवादळास येथे हरिकेन म्हणतात ) ज्यामुळे तंबू उभारून  तात्पुरत्या स्वरूपात राहण्याऱ्या लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागू शकण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून व्यक्त करण्यात येत आहे 
         सध्या पृथ्वीच्या भूगर्भ हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे ज्याला पृथ्वीच्या अंतर्गत बाबी तसेच वाढते तापमान कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे त्यामुळेभारतापासून लांबवर झालेला भूकंप म्हणून या कडे दुर्लक्ष करू नये . आपल्यासाठी तो लांबवर असेल पृथ्वीसाठी ते काही नाही (आपल्या मान्संमु वर मोठ्या प्रमाणत परिणाम करणारे आलं निनो आणि ला लीना हे समुद्रप्रवाह पृथ्वीच्या कोणत्या भागात उदयास येतात हे अभ्यासूंनी अभ्यासावे ) आपल्या ऊत्तर भारतात खूप मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाचा अंदाज या आधीच वर्तवलेला आहे.  त्या पाश्वभूमीवर आपण या भूकंपाकडे बघायला हवे . म्हणून आपण या भूकंपकडे लक्ष  द्ययलाच हवे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?