महाराष्ट्राची एसटी बदलताना .........

           

   कोणी तिला लालडब्बा म्हणून हिणवते कोणी तिला यस्टी म्हणते,  कोणी तिला एसटी म्हणते तर कोणी तिला लालपरी म्हणते तर कोणी  सरकारी बस म्हणते मात्र ती सर्वांना सारखीच सेवा देते ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस . अर्थात आपली एसटी . हवामान काहीही असो , बाहेरची स्थिती शांततामय असो किंवा तणावपूर्ण असो प्रवाशी संख्येचा विचार ना करता विहिरवेल्स ती प्रवाश्याना आपल्या इच्छित स्थळी घेऊन जाते , या करोनकाळात सुद्धा ती  काळ विश्रांती घेऊन अविरत धावतच होती करोना काळात आपल्या सर्वांच्या आर्थिक उत्पनावर जसा परिणाम झाला तसा  एसटीवर देखील झाला एसटीच्या उत्पनाचे प्रमुख साधन असलेली प्रवाशी संख्या रोडवल्यावर एसटीने आपल्या उत्पनाचे  नवीन मार्ग शोधले त्या नवीन मार्गाची माहिती देण्यासाठी आजचे लेखन 
या उपायांपैकी काही उपाय यशस्वी ठरले तर काही तितकेसे प्रभावी ठरले नाहीत उत्पन्नवाढीबरोबरच एसटीने प्रवाश्याना चांगली सेवा देण्यासाठी काही बदल पण केले चला तर जाणून घेउया या बदलाविषयी 
      उत्पन्न वाढीसाठी यशस्वी ठरलेल्या उपायांमध्ये एसटीमार्फत मालवाहतूक सुरु करण्याचा उपाय सर्वाधिक यशस्वी ठरला महाकार्गो या ब्रॅंडनेम खाली एसटीने मालवाहतुकीच्या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले त्यासाठी प्रवाश्यासाठी आयुर्मान संपलेल्या मात्र इंजिन उत्तम स्थितीत असणाऱ्या बसेससचे ट्रकमध्ये रूपांतर केले या आधी अत्यंत सुरवातीला बसच्या टपावरून मालाची ने आण केली जात असे हा मार्ग प्रवाश्यांसाठी धोकादायक आहे

यामुळे बसला अपघात होण्याचा धोका कैक पटीने वाढतो असे केंद्रीय वाहतूक खात्याचा लक्षात आल्यावर तो प्रकार केंद्रीय वाहतूक खात्यामार्फत बंद करण्यात आला त्या नंतर एसटी बसच्या डिक्कीमध्ये मालवाहतूक करण्यात येऊ लागली मात्र त्यास काहीमर्यादा होत्या जास्त प्रमाणत त्या प्रकारची वाहतूक करता येत नसे यावर उपाय म्हणून तेलंगणा राज्य परिवहन महामंडळामार्फत जुन्या एसटी बसचे ट्रकमध्ये रूपांतरण करून मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण करण्यात आले त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे करोना संसर्गाचा काळात महाकार्गो या ब्रॅंडनेम अंतर्गत मालवाहतुकीच्या क्षेत्रात यशस्वी पदार्पण करण्यात आले . त्यासाठी लाल रंगाच्या पाश्वभूमीवर आडव्या दोन पिवळ्या रेषेच्या साह्याने वेगळा लोगो देखील तयार करण्यात आला . 
        काही प्रमाणात यशस्वी ठरणाऱ्या उपाययोजनेचा विचार करता एसटीच्या राज्यातील 3 मध्यवर्ती कार्यशाळांच्या मदतीने खाजगी बस वाहतूकदारांना बस बांधून देणे तसेच 9 विभागीय कार्यशाळच्या मदतीने विविध वाहन बस आणि इतर वाहन चालकांना टायर रिमोल्डींग करून देणे , तसेच टायर विषयक इतर कामे करून देणे यासाठी लागणारी साधनसामुग्री हि एसटीने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली असल्याने अन्य खाजगी व्यवसायिकांपेक्षा एसटीचे दर अत्यंत कमी होते .  तसेच आगर आणि जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या माध्यमातून शासकीय खात्यांतर्गत महामंडळा अंतर्गत विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांची दुरुस्ती देखभाल करण्याचे प्रयत्न या दरम्यान एसटी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आले 
     एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी फासलेला किंवा काहीसा अल्प यशस्वी प्रयोग म्हणजे इंडियन ऑइल या तेल उत्पादक कंपनीच्या सहकार्याने एसटीच्या अनुत्पादक मात्र विविध शहरात मोक्याचा जागी असणाऱ्या जागांवरइंधन पंप सुरु करणे ते इंधन पंप एसटीच्या विविध आगारात असणाऱ्या पंपापेक्षा वेगळे असणार होते या बाबाबत इंडियन ऑइल या कंपनीबरोबर एसटीच्या अधिकाऱ्यांनी मेमोरिदम ऑफ अंडरस्टॅण्डिंग (MOU ) देखील केले होते मात्र याबाबत दुर्दैवाने पुढे फारशी प्रगती झाली नाही . 
उत्पन्न वाढीच्या या बाबीबरोबर प्रवाश्याना एसटीमधून प्रवास करताना चांगले,  स्वच्छ आणि किफायतशीर दारात
पाणी उपलब्ध व्हावे या साठी खाजगी कंत्राटदाराबरोबर करार देखील केला.  नाथजल या ब्रॅंडनेम अंर्तगत हे पाणी रेल्वेकडून रेलनीर ज्या पद्धतीने पुरवले जाते त्या धर्तीवर पुरवण्यात येणार आहे . 
सन 1962 च्या चीन विरोधी आणि 1965च्या पाकिस्तानविरोधी युद्धांमध्ये भारतीय लष्करासाठी अत्यंत कमी वेळेत वाहन निर्मिती करणारे आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कितीही संकटे आली तरी त्यातून यशस्वी मार्ग काढतंच हेच यातून दिसून येत आहे मी स्वतः आपल्या एसटीच्या आवडेल तिथे प्रवास आणि आता बंद झालेल्या 200 रुपये भरूनपास  घ्या आणि वर्षभरात एसटीच्या प्रवासात 10% सूट मिळवा या योजनेचा फायदा घेत खूप फिरलो आहे .सध्याचे करोनाचे संकट दूर झाल्यावर आपण देखील फार आणि आपल्या महामंडळचे हात बळकट करा असे माझे तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे मग जल ना फिरायला ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?