भारत युके संबंध नव्या वळणावर !

   

         सध्या आपल्या भारताचे अन्य राष्ट्रांबरोबरचे असणारे संबंध नव्या वळणावर आहेत याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत आणि युनाटेड किंग्डम या देशांमध्ये घडली . युके  असे संक्षिप्त नाव असणाऱ्या या देशाला आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लड असे म्हणतात वास्तविक युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड असे पूर्ण नाव असणाऱ्या या देशातील  चार भागांपैकी एक भाग म्हणजे इंग्लंड होय असो 
            तर मित्रानो सन 2004 पासून नित्यनियमाने भारतीय नौदल दल आणि युकेची रॉयल नेव्ही यांच्यामध्ये होणारी  कोकण एक्सरसाईज नुकतीच इंग्लिश चॅनेल या भागात झाली,  युके आणि फ्रांस या दोन देशांमध्ये असणाऱ्या खाडीला इंगलीश चॅनेल म्हणतात (दोन भूभागाच्या मध्ये आणणाऱ्या  अरुंद पाण्याचा पाण्याला किंवा  म्हणतात ) या वर्षी झालेल्या कोकण एक्सरसाईजमध्ये भारताकडून आयएनएस तब्बर आणि युनिटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड या देशाकडून एचएमएस  वेस्टमिनिस्टर या दोन युद्धदनौकानदाम्यान झाली
या दोन्ही युद्धनौका या फ्रिगेट  प्रकारच्या आहेत  ज्यामुळे अन्य जहाजांचे सरंक्षण करतात  या दोन्ही युद्धनौका  हवाई मार्गे जमिनीवरून आणि पाण्याचा आतून येणाऱ्या धोक्याला नामोहरम करू शकतात भारतातफे या युद्ध अभ्यासात  भाग घेणारी  आय एन एसतब्बर ही युद्धनौका आपण 2004 साली रशियाकडून विकत घेतली तर युकेकडून सहभाग नोंदवणारी युद्धनौका एचएमएस  वेस्टमिनिस्टर ही 1992  साली युकेच्या रॉयल नेव्ही मध्ये दाखल झाली 
         दोन्ही  देशांना सरंक्षण विषयक सारख्याच समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यावर तोडगा म्हणूनहा नौदलाचा अभ्यास करण्यात येतो.  युके बरोबर सन 2006 पासून आपण इंद्रधनुष्य या नावाखाली हवाई दलाचा अभ्यास देखील करतो तर लष्कराचा विचार करता अजेय योद्धा या नावाने आपण युद्धाभ्यास करतो . अजेय योद्धा  हा युद्धाभ्यास हा युनाटेड किंग्डम आणि भारत या दोन्ही देशात एका वर्षाआड होत असतो उदाहरणार्थ एख्यादा वर्षी तो युद्धा अभ्यास  भारतात झाला तर पुढच्या वर्षी तो युके मध्ये होईल.  युके मध्ये एखाद्या वर्षी युध्य अभ्यास झाल्यास त्या पुढच्या वर्षी भारतात होईल या प्रमाणे 
एकंदरीत भारताचा  जागतिक राजकारणात महत्त्वाचा देश म्हणून विचार होतो हे यातून दिसते . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?