कवितेची पंचवीसी !

   

 काही दिवसात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु होईल. त्यानिमित्ताने विविध उपक्रम सध्या देशभरात सुरु आहेत. या सर्व धुमाळीत एका कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे कवीवर्य कुसुमाग्रज यांनी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरु असताना एका दैनिकाचा दिवाळी अंकासाठी लिहलेली कविता जी पुढे शिधापत्रीकेवर सुद्धा झळकली आणि घराघरात पोहोचली. फटका या काव्यप्रकारातील ही कविता स्वातंत्र्यदेवता आपणास संबोधित करत आहे, असे समजून लिहली होती. आज या कवीतेस सुमारे 25 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मी बोलत आहे  'स्वातंत्रदेवतेची विनवणी' असी नाव असलेली " पन्नासीची उमर गाठली, अभिवादन मज करु नका , मीच विनवते हात जोडूनी वाट वाकडी धरु नका" या कवितेबाबत.
                  या कवितेत काही धोके सांगण्यात आले होते . भष्ट्राचार, महिलांविषयीचा  नकारात्मक दृष्टिकोन,  हुंड्याची लोकांना असलेली आवड, मराठीची दयणीय स्थिती,  चांगल्या कामासाठी लोकांनी एकत्र न येणे, करमणूकीच्या सबबीखाली तरुणाईची शक्ती नष्ट होणे, विविध स्मारके, पुतळे यांच्या वरुन चालणारे राजकारण,   मराठी भाषिकांचा परभाषेविषयीचा दृष्टिकोन, मराठीत प्रगतीच्या संधी नसणे, सहकार्याची घटती भावना, एक माणूस दुसऱ्या माणसावर करत असलेला अत्याचार,  आर्थिक विप्पणता, जातीय सलोखा, सुस्त आणि अकार्यक्षम नोकरशाही,  एकोप्याची उणीव हे यातील काही धोके म्हणता येवू शकता.
             यातील काही धोक्यांवर आपण खुपच मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. अनेक मराठी भाषिक जर्मन, फ्रेंच आदी भाषेत पारंगत आहे, मराठी भाषिकांमध्ये आर्थिक सुब्बतता आली आहे. भष्ट्राचारावर देखील संपुर्णतः नाही, मात्र बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. नोकरशाही आता बऱ्याच मोठया स्तरावर गतीमान झालेली आहे.
लोक आता पुर्वीप्रमाणे अत्याचार सहन करत नसल्याने माझ्या मते अनेकांना मानुस म्हणजे पशू नसे हे तत्व पटलेले दिसत आहे.{अत्याचार कमी होत आहे, काही अत्याचारांचा अपवाद करून} लोक आता अनेक चांगल्या कामासाठी एकत्र येत आहेत, नाशिकमधील ब्रम्हगिरी आणि  झाडे वाचवण्यासाठी झालेले आंदोलन हे त्याचे अत्यंत ताजे उदाहरण याबाबत आपण आपले कौतूक करायलाच हवे. 
       मात्र काही ठिकाणी आपण काही प्रमाणात घसरलोय किंवा घसरतोय हे सुद्धा विसरुन चालणार नाही, जातीय सलोखा , महिलांवरील अत्याचार, मराठीची स्थिती,  सहकार्याची भावना या बाबींचा या मध्ये समावेश होवू शकतो असे मला वाटते. काही दिवसापुर्वी वल्ड हँपीनेस इंडेक्स 2020प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये सर्व्हेक्षणात सहभागी असणाऱ्या बहुसंख्य भारतीयांनी आपणास अडचणीच्या वेळी आप्तेष्ट, मित्र परीवार यांची मदत मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर जवळपास नाहीच वाटते असे उत्तर दिल्याचे आपणास आठवत असेलच. महिलांवरील अत्याचाराचा घटना वाढल्याचे रोज न्युजपेपर /न्युजचँनेल बघणारा कोणीही सांगू शकेल. काहीजण या घटना पुर्वीइतक्याच आहेत. फक्त पुर्वी त्या रिपोर्ट होत नव्हत्या आता होत आहे. असे मानून यात घसरण न झाल्याचे मत मांडू शकतो. मात्र यामध्ये कडक कायदे केल्याने सुधारणा झाल्याचे खचीतच कोणी म्हणेल असे मला वाटते. सध्याचा फेसबुकवर आणि अन्य समाजमाध्यमांवर जातीच्या , धर्माच्या नावाने एखादा सर्च मारल्यास जातीय भीषण वास्तव सहजतेने लक्षात येईल. विविध स्मारके पुतळे यांच्यावरुन होणारे राजकारण , हे वाढल्याचे आपणास सहजतेने दिसते. या कवीतेत सांगितल्याप्रमाणे त्यांचा मार्ग अनुसरणारे खुपच कमी आपणास सध्या दिसतात(हे माझे निरीक्षण आहे, जे परीपुर्ण असल्याचा माझा कोणताही दावा नाही, किंबहुना ते अयोग्यच समजणे रास्त  ठरेल) त्यामुळे दूर्दैवाने याबाबत आपण कवीवर्य कुसुमाग्रजांंना अपेक्षीत असणारी उंची गाठू शकलेलो नाही. असे मला वाटते. ज्याप्रमाणे  हाताची पाची बोटे सारखी नसतात , त्या प्रमाणे या माझ्या निरीक्षणापेक्षा इतरांचे मत भिन्न असू शकते.मी वैयक्तिकरीत्या त्यांचे स्वागतच करेल.
           माझ्या मते काही बाबत आपण त्या वेळेस होतो तिथेच आहोत, जसे नविन संकल्पना, नाविन्याचा स्विकार करणे, जून्या कालबाह्य रुढी परंपरा त्यागणे , जून्या गोष्टीचा विनाकारण गर्व करणे. इत्यादी.
आज जर कवीवर्य कुसुमाग्रज असते तर त्यांनी या धोक्याचा यादीत पर्यावरण बदल , सुरक्षीरता बाबत करावयांचा गोष्टींचा नक्कीच समावेश केला असता, असो
मी वैयक्तिकरीत्या युट्युबवर ही कविता अनेकदा ऐकतो, माझी अत्यंत आवडती कविता आहे. आपल्यापैकी अनेकांची असेल.मी या लेखाच्या खाली तिची लिंक देइलच. आज या कवीतेस जवळपास 25वर्षे झाली आहेत.. तरी ती कविता कंटाळवाणी वाटत नाही. माझ्यामते ती कविता आपणास कुठे वाटचाल करायची आहे, हे सातत्याने सांगते. या कवितेविषयी खुप काही बोलता येईल , मात्र ज्यास सुरवात आहे, त्यास शेवटही हवाच, म्हणून इथेच थांबतो, नमस्कार 
जय हिंद भारतीय स्वतंत्रदिन चिरायू होवो 

कविता ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?