ऑस्ट्रोलीया भारताचा नवा साथीदार

         

          भारताचा सध्या जागतिक राजकारणात दबदबा वाढत आहे , याची साक्ष देणाऱ्या दोन घडामोडी नुकत्याच घडल्या .दोन्ही घडामोडीत भारताचा साथीदार ऑस्ट्रोलीया हा देश होता . ऑस्ट्रोलीया  भारताबरोबर कॉमनवेल्थ नेशनचा सदस्य ,तसेच सध्या अमेरिका देशाच्या नेतृत्वात चीनविरोधी उदयास आलेल्या क्याड या आघाडीचा भारतासह सदस्य असणारा सदस्य देश , आणि  क्षेत्रफळानुसार जगात  पाचव्या क्रमांकाचा मोठा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणात असणारा मात्र भारताने सीटीबीटी आणि एनपीटी या करारावर सही ना केल्याने भारताला युरेनियम देण्यास नकार देणारा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया.  त्या ऑस्ट्रलिया देशाने भारताला महत्व देत असल्याचे दोन घडामोडीतून दिसले . त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन त्यातील एक घडामोड भारताच्या सांस्कृतिक वारस्याविषयी आहे . तर दुसरी घडामोड लष्करी सामर्थ्याविषयी आहे . पहिल्यांदा सांस्कृतिक वारस्याविषयीची घडामोड बघूया , 
      तर भारताच्या प्राचीन शिल्पकला चित्रकला , धातुकाम याचा याच्या वारसा सांगणाऱ्या मात्र सुभाष कपूर या व्यक्तीकडून नैतिक अनैतिक मार्गाने ऑस्ट्रेलिया च्या राष्ट्रीय संग्रहात दाखल झालेल्या 14  कलाकृती ऑस्ट्रलिया आपल्या भारतास परत करणार आहेत ज्या नवी दिल्लीतील जुन्या किल्ल्यातील राष्ट्रीय संग्रहात ठेवल्या जाणार आहेत या व्यक्तीकडून भारताच्या जुन्या वारस्याशी नाते सांगणाऱ्या  एकूण 22 कलाकृती चोरून ,  स्मगलिंगच्या माध्यमातून किंवा नैतिक मार्गाचा अवलंब करत ऑस्ट्रलियाच्या राष्ट्रीय संग्रहाला विकल्या होत्या त्याचे हे कृत्य लक्षात आल्यावर ऑस्ट्रेलियाने त्या भारतास परत करण्याचे ठरवले . त्यातील 5 आधीच परत केल्या आहेत आता उरलेल्या17 पैकी 14  कलाकृती परत केल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे सध्या  हा  सुभाष कपूर सध्या तुरुंगात आहे . या 14  कलाकृतीमध्ये बाराव्या ते अठराव्या शतकापर्यंत काढण्यात आलेल्या  चित्रांचा,  तयार करण्यात आलेल्या विविध देवतांच्या मुर्त्यांचा तसेच एका धातुकामांचा अनोखा नमुना असलेल्या गोष्टींचा आणि एका रंगवलेल्या कापडाचा समावेश आहे .ज्यामध्ये  6 चित्रे आहेत तर 6  मूर्त्यांचा समावेश आहे . सुभाष कपूर या व्यक्तीने अमेरिकेतील महत्त्वाचे  न्यूयॉर्क शहराचा प्रसिद्ध भाग मॅनहॅटन भागात स्वतःची एक आर्ट गॅलरी होती जिथे तो भारतातून ठेवलेल्या वस्तू ठेवत असे तसेच अनेक राष्ट्रीय संग्रहालयांना विकत असे . तो  आपल्या कार्यात प्रचंड प्रसिद्ध होता .सुमारे तीस वर्ष त्याचे हे उदयॊग सुरु होते . असो 
आता बघूया लष्करी घडामोड 
तर मित्रानो ऑस्ट्रोलियने भारताला Talisman Sabre या युद्ध अभ्यासात सहभागी करावे असे सूतोवाच केले  आहे .  ऑस्ट्रलियाचे संरक्षण  मंत्री Peter Duttons लवकरच  भारताच्या भेटीवर येणार आहे .त्यावेळेस आपणास अधिकृत आमंत्रण मिळेल अशी शक्यता आहे .  हा युद्ध अभ्यास ऑस्ट्रोलीया  आणि अमेरिकेकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात येतो . या युद्ध अभ्यासात जमिनीवरील आणि पाण्यावरील तसेच हवाई तिन्ही प्रकारच्या युद्धाभ्यास केला वाजतो ऑस्ट्रोलियाच्या ईशान्य दिशेला असणाऱ्या कोरल रिल्फ प्रदेशात आणि हवाई बेटांवर हा युद्धाभ्यास होतो
यामध्ये सहा ते सात देश सहभागी होत असतात दर दोन वर्षांनी हा युद्ध अभ्यास होतो 2021 सालचा युद्ध अभयस नुकताच झाला त्यांनतर ऑस्ट्रलियाने हे  संकेत दिले आहेत 
आंतरराष्टीय राजकारणात भारताच्या सामर्थ्याची जाणीव आता जगणे घेतली आहे याचीच साक्ष या घटना देत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?