आता भारतभर एकच नंबर

   

 काही दिवसांपुर्वी पर्यतची ही गोष्ट आहे. ज्यांचा भारतभर बदल्या होतात, अस्या व्यक्तींना त्यांचे वाहन प्रत्येक राज्यात नव्याने नोंदवावे लागत असे. वाहन नोंदवताना प्रत्येक राज्यात रोड टँक्स द्यावा लागत असे. वाहनाचे आयुष्य 15 वर्षाचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे एका राज्यात नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात नोंदवताना आधीच्या राज्यातून शिल्लक वर्षाचा रोडटँक्स परत मिळत असे.मात्र त्यासाठी विहीत केलेली प्रक्रिया इतकी किचकट होती, की सबंधित वाहनचालकाची अवस्था भिक नको पण कुत्र आवरं असी होत असे. परीणामी एकाच वाहनावर अनेकदा रोड टँक्स सबंधित मालक भरत असे. भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या या बाबींमुळे होणाऱ्या त्रासातून मोदी सरकारने वाहन मालकांची सुटका केली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी होणार आहे. ती आहे.
       ज्या खासगी कंपनीचे क्षेत्र किमान चार राज्य आहे. त्या कंपनीचे कर्मचारी आणि शासकीय उच्चपदस्थ यांना भारत या नामावलीखाली आपले वाहन नोंदवता येणार आहे. हा लाभ यापूढे नोंदणी होणाऱ्या वाहनांवर लागू असणार आहे. या पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही सुट नसेल. या वाहनांना प्रत्येकी दोन वर्षाचा रोड टँक्स भरावा लागेल असे सात पुर्ण हप्ते आणि आठवा हप्ता निम्मा असे त्याचे स्वरुप असणार आहे. रोड टँक्स वाहनाचा किंमतीवर अवलूंबून असणार आहे.10 लाख पर्यंत किमत असलेल्या वाहनांवर 8% ,15 लाख पर्यतचा वाहनांवर
10% टक्के तर त्यापूढील किमतीचा वाहनावर 12% टँक्स असणार आहे.
या प्रकारात नोंदल्या जाणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट नेहमीपेक्षा वेगळी असणार आहे. यामध्ये सुरवातीला वाहन नोंदणी वर्षाचे अखेरचे 2 अंक उदा 2021 असल्यास 21 2022 असल्यास 22 2023 असल्यास 23 नंतर BH ही अक्षरे नंतर 4 अक्षरी अंक नंतर दोन अक्षरे असे त्यांचे स्वरुप असेल.
तसे बघायला गेल्यास अनेक वाहतूक विषयक नियम आपल्याकडून माहिती नसल्याने मोडले जातात आणि कोणाच्याही लक्षात येत नाही, असा एक माझ्या बाबतचा अनुभव सांगून सध्यापुरते थांबतो तर एका राज्यातच मात्र एका आर टी ओ कार्यालयात नोंदणी झालेले वाहन दुसऱ्या आर टी ओ हद्दीत आपण वापरणार असू तर सहा महिन्यापर्यत आपणास सहजतेने वापरु शकतो. त्यानंतर आपणास पहिल्या आर टी ओ कडे जावून  तो क्रमांक रद्द करावा लागतो आणि दुसऱ्या आर टी ओ कडे जावून नवा क्रमांक घ्यावा लागतो. मी पुण्यात वास्तव्यास असताना हा नियम माहिती नसल्याने मी नाशिकमध्ये नोंदलेले वाहन अडीच वर्षे सहज वापरले. असो माझाकडून अनावधानाने नियम भंग झाला आपण तो टाळावा, कारण नियम हे आपल्यासाठीच तर बनवले असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?