आपल्या एसटीमध्ये हे बदल कधी दिसतील ?

   

सध्या जग मोठ्या प्रचंड गतीने बदलत आहे .ज्याला आपल्या भारतातील विविध राज्य परिवहन महामंडळे देखील अपवाद नाहीत . नुकतेच गोवा  राज्याचा परीवहन महामंडळाकडून ( जे कदंब नावाने प्रसिद्ध आहे)  आणि गुजरात राज्याचा परीवहन महामंडळ  राज्याच्या परिवहन महामंडळाकडून दोन मोठे बदल करण्यात आले. त्यातील गोवा सरकारकडून त्यांचा परीवहन महामंडळात करण्यात येणारा बदल आपल्या महाराष्ट्राचा परीवहन सेवेत करावा, यासाठी खुप आधीपासून आपल्या एसटीमध्ये सुरु आहेत. मात्र आपल्या नंतर येवून गोव्याने यामध्ये बाजी मारली आहे 
       तर गोवा राज्य परीवहन महामंडळाकडून इलेट्रीक बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. गोवा राज्यातील म्हापसे या बस स्थानकावर त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे . या बस स्थानकातून गोव्यात आणि शेजारील कर्नाटक राज्यात बेळगाव निपाणी भागात बस वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गोवा एसटी प्रशासनाची महाराष्ट्रात सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुद्धा  इलेक्ट्रीक एसटी बस सेवा सुरु करण्याची तयारी होती. मात्र
महाराष्ट्राने त्यास नकार दर्शवला असे प्रतिपादन गोव्याचे परीवहन मंत्र्यांनी केल्याचे म्हापसा न्युज या वेबपोर्टलवर दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
   आपले शिवाई या नावाने मुंबई पुणे आणि पुणे नाशिक या मार्गावर  इलेक्ट्रीक बस चालवण्याचे नियोजन होते. मात्र विविध तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात आपले एसटी प्रशासन कमी पडले , परीणामी आपली देशात पहिल्यांदा सार्वजनिक परीवहन महामंडळात इलेक्ट्रीक बस सुरु करण्याची संधी हुकली.  गोव्यासारख्या छोट्या राज्याने हे यश मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे, तितके कमीच आहे. छोटे राज्य असल्याने उत्पनावर साहजिकच मर्यादा येतात, त्या मर्यांदांवर यशस्वी मात करत गोव्याने हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेललेले आहे.आता महाराष्ट्र एसटी प्रशासन शिवाईची सेवा कधीपासून सुरू करतेय, हे बघणे औच्छुकतेचे ठरेल.
        एकीकडे गोवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असी गगनभरारी घेत असताना, गुजरात सरकारने त्यांचा मालकीच्या सार्वजनिक परीवहन महामंडळात अर्थात GSRTC मध्ये सध्या सर्वात कमी प्रदुषण करणाऱ्या BS6 प्रकारच्या बससेचे अनावरण 7आँगस्ट 2021 रोजी केले. यासाठी गुजरात राज्यातील आनंद येथे या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . GSRTCने  यासाठी नव्या बस खरेदी केलेल्या नसून त्यांचा सध्या
वापरात असणाऱ्या बसेसचे रूपांतर BS6 मध्ये केले आहे. आपल्या महाराष्ट्राचा एसटी प्रशासनाने याचा विचार करणे आवश्यक आहे. 
      आजमितीस जून्या  चेसीजवर नव्याने बस बाँडी उभारुन आपले महामंडळ आपल्या प्रवाश्यांना आरामदायी प्रवास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.आपल्याला लाल आणि पांढऱ्या आडव्या पट्टीचा रंगसंगतीत किंवा विठाई प्रकारात ज्या बसेस आपणास दिसतात. त्या या प्रकारच्या बसेस असतात .या  बसेसच्या धर्तीवर प्रदुषण कमी व्हावे यासाठी आपल्या महामंडळाने प्रयत्न करावेत, असे मला वाटते. आपण याबाबत त्यांचा आदर्श घेवू शकतो. GSRTCच्या फेसबुकपेजवर, आणि संकेतस्थळावर यातील तांत्रीक बाबींवर प्रकाश न टाकल्याने याबाबत किती खर्च येतो?  हा खर्च आपणास परवडू शकतो का ?याबबत काहीही माहिती देता येणे अशक्य आहे. मात्र खर्चाच्या विचार सोडता, आपल्या एसटी महामंडळाची जून्या बसेसचे रुपांतर BS6 मध्ये करण्याची पुर्णतः क्षमता आहे. हे नक्की.
    आपले एसटी महामंडळ अनेक प्रकारच्या सवलती देते. ज्या गुजरातसारख्या एसटी महामंडळाकडून देण्यात येत नाही.( मला एकदा गुजरात एसटी महामंडळाच्या पुणे सुरत बसच्या कंडक्टरसी बोलण्याचा योग आला. तो म्हणाला तूमच्या एसटीकडून देण्यात येणाऱ्या अर्धे तिकीटासारख्या सुविधा आमची डोकेदुखी वाढवतात. आम्ही त्या सोईसवलती देत नसूनही लोक आमच्याकडून त्या मिळाव्यात म्हणून आग्रह धरतात. )त्यांचा आढावा घेवून अनावश्यक सवलती कमी  केल्यास या बदलांसाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ आपणास सहजतेने मिळू शकते. ज्यामुळे एकेकाळी देशात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात आदर्शचे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटीस पुन्हा सुगीचे दिन येतील, मग आपणही असेच पराक्रम करु हे नक्की! 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?