आसियान सार्क आणि भारत

 

आॉगस्ट
महीना अपल्यापैकी अनेकाचा कायम लक्षात असतो कारण देश आणि आंतराष्ट्रीय अणे घडामोडी या दिवशी घडल्या . भारताचे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार यांची झालेली हत्या असो किंवा पेशव्यांनी अटक या सध्या पाकिस्तानात असलेल्या गावावर फडकवलेला हिंदवी स्वराज्याचा ध्वज असो अथवा आसियानची झालेली स्थापना असो किंवा शीतयुद्धाचे सध्या अस्तित्वात मोठ्या निशाण्या म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल अश्या देशांच्या स्वतंत्रदिन असो (दक्षिण कोरियाचा स्वतंत्रदिन 15 ऑगस्ट आहे ) दुसऱ्या महायुदाची खून असणारा जपानच्या शहरावरील आण्विक हल्ला असो या सर्व घडामोडी ऑगस्ट मधीलच
                  तर 8आॉगस्ट हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना . एका माहितीनूसार भारताला स्थापनेच्या वेळी या संघटनेचे सदस्यत्व देण्यात येणार होते माञ तत्तकालीन सरकारने नामचा आधार घेत या यूनाटेड स्टेट ऑफ अमेरीकेच्या या कळपात येण्याचे नाकारले,  पुढे नरसिंहराव यांच्या काळात या देशाशी संपर्क वाढवण्यासाठी लुक ईस्ट पॉलीसी राबवण्यात आली .सध्याच्या अँक्ट इस्ट पॉलीसीची ती जननी होती 
                  .या प्रादेशीक संघटनेचा विकास फारच चांगला झाला . बांगलादेशाच्या शासकांची मुळ कल्पना असणाऱ्या सार्क चा विकास माञ अपेक्षीत होवू शकला नाही (इयु चा पण विकास झाला ) एकमेकांना  
लागून असणाऱ्या  या दोन प्रादेशिक संघटना पण सार्कचे नशीबच फुटके असावे आसियानच्या तूलनेत अपेक्षीत विकास आपणास करता आला नाही . सार्क आणि आशियान मध्ये सामाविष्ट असणाऱ्या  बहूसंख्य भुभागावर भारताचा प्रचंड प्रभाव , किंबहूना इस्लाम हा स्टेट रिलीजन  असणाऱ्या राष्ट्रातील सर्वाधीक मुसलमान असणाऱ्या  इंडीनेशियात गणपतिची मंदिरे दिसतात . थायलंडआणि कंबोडीया हे सध्या बौध्द धर्मीय बहूसंख्य असणारे दोन देश एकमेकांशी हिंदू मंदिरावरून भांडतात .यावरुन समजू शकते भारताचा आसीयान वरील प्रभाव किती आहे  आणि  सार्क मध्ये असणाऱ्या 8 देशापैंकी 3 देशांचा मिळून एकच देश होता . महाभारतात अफगाणीस्तानचा आणि रामायणात श्रीलंकेच तसेच पाकिस्तान मधील पेशावर लाहोरचा उल्लेख आहेच ना ?नेपाळ मधील पशुपती नाथ मंदिर नेपाळचा भारताशी संपर्क सागतो माञ माझ्या अल्पज्ञानाला मालदिव ते काय कुठे सापडत नाही .तज्ञांनी मार्गदर्शन करावे
.                 ईयु सारखे स्वतंञ्य चलन नसले तरी आसियान मधील राष्ट्रांचा अंतर्गत व्यापार प्रचंड आहे सार्क बाबत दूर्दैवाने या बाबत निराशात्मक चिञ आहे . भारत पाक सारखे कंबोडीया थायलंड याच्यात अंतर्गत वाद आहेच माञ त्याचा संघटनेवर काही परीणाम झालेला दिसत नाही सार्कचाच बाबतीत काही करायचे असल्यास भारत पाक संघर्ष का आडवा येतो कोणास ठाऊक माझ्या मते सार्कचे नशिबच फुटके असावे सध्या सध्या काहिसी संकटात
असणाऱ्या ईयुमध्येहि अंतर्गत कुरबुरी आहेत पण  संघटनेवर परीणाम होत नाही. आसीयान प्रदेशात बौध्द  आणि ईस्लाम धर्मीम लोक राहतात सार्क मध्ये हिंदू आणि  ईस्लाम धर्मीय लोक राहतात मग सार्क प्रगती का करू शकत नाही सार्कचे नशीब किती फुटके आहे हे या सर्व उदाहरणावरुन दिसते .या विषयी खुप काही बोलता येवू शकते मात्र तूर्तास इथेच थांबतो , नमस्कार
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?