ब बुद्धिबळाचा (भाग 10)

 

    सध्या आपल्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना,  भारतीय महिला बुद्धिबळपटू अत्यंत आश्वासक खेळ करत महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद स्पर्धेत विजयाचा आशा टिकवून ठेवत आहे या स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघ पाच साखळी फेरीचे  फेरीचे डाव खेळणार आहे .यावेळी जिंकल्यास दोन गुण आणि  डाव बरोबरीत सुटल्यास एक गुण  संघाला मिळणार आहे .या पाच डावांनंतर उप उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहे .जे या साखळी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ संघामध्ये होणार आहे  साखळी स्पर्धांमध्ये पाचव्या डावाच्या अखेरीस  भारताने आपल्या गटात सात  गूण प्राप्त करत आपले उप उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे . आजमितीस पाच फेऱ्यांमध्ये भारताचे सात गूण झाले आहेत दहा गुणसह रशिया भारताच्या गटात अव्वल स्थानी आहे. भारताच्या गटात आर्मेनिया रशिया आणि अझरबैजान यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे . भारताचा समावेश A गटात केला आहे . दुसऱ्या B गटात जार्जिया अव्वल स्थानी आहे या गटात फिडे अमेरिकन,  युक्रेन काझकिस्तान यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे तर A गटातील  फ्रांस आणि स्पेन या देशांचे साखळी स्पर्धेत  गुण कमी झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्ठात आले B गटात युके जर्मनी पोलंड यांना साखळी फेरीतील असमाधानकारक कामगिरीमुळे गाशा गुंडाळावा लागला . 30 सप्टेंबररोजी उप उपांत्य फेरीचे सामने होतील आणि 1ऑक्टोबररोजी उपांत्य फेरीचे सामने रंगतील आणि 2 ऑक्टोबर रोजी अंतिम फेरीची झुंज रंगेल 
           या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक चार वेळेस विजयश्री मिळवलेला चीनचा संघ सध्या खेळत नसला, तरी आता पर्यंत सातवेळा झालेल्या स्पर्धेत प्रत्येकी एक वेळा विजयाची माळ गळ्यात घातलेल्या जार्जिया , रशिया युक्रेन या देशाचे आव्हान भारतासमोर आहे . या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अझरबैजान बरोबर झाला जो दोन दोन असा
बरोबरीत सुटला . दुसऱ्या डावात आर वैशाली यांच्या विजयामुळे भारताने आयोजक असणाऱ्या स्पेनविरुद्ध अडीच विरुद्ध दीड असा विजय मिळवत दोन गन खिश्यात घातले पहिल्या डावातील एक गन आणि आत्ताचे दोन गुण यामुळे भारताचे एकूण तीन गुण झाले त्यावेळेस भारताच्या गटातील अमेर्नियाचे देखील तीन गूण होते तर रशिया चार गुणांसह पहिल्या स्थानी होता . तिसऱ्या डावात भारतने आर्मेनिया या देशाला सुदा अडीच विरुद्ध दीड असे नमवत अजून दोन गुणांची कामगिरी केली मराठमोळ्या भक्ती कुलकर्णी आणि तानिया सचदेव यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे डाव जिकल्यामुळे भारताला ही कामगिरी साधता आली चोथ्या डावात भारताची गाठ रशिया बरोबर पडली जिथे भारताला रशियाविरुद्ध तीन विरुद्ध एक असा पराभव बघावा लागला . मात्र अखेरच्या डावात जोरदार पुनरागमन करत भारताने फ्रान्सला तीन विरुद्ध एक अशी धूळ चारत  दिमाखातदारपणे  उप उपांत्य फेरीत प्रवेश केला 
भारताने या स्पर्धेत अद्याप विजयश्री मिळवलेली नाही त्यामुळे जर या वेळी भारताने विजय मिळवल्यास तो इतिहास  घडवणारा असेल हे नक्की . भारत खरच इतिहास घडवतो का हे येत्या दोन ऑक्टोबरला समजेलच तो पर्यंत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्या 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?