भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 11)

             

                      सध्या जगाचा श्वास दोनच  गोष्टी भोवती कोंद्दला  गेला  एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तान . त्यातील हवामान बदलाविषयी मी या आधीच लिहले आहे ,माझे आजचे लेखन अफगाणिस्तानविषयक आहे  दररोज काहींना काही घडामोडी अफगाणिस्तानमध्ये  घडत आहेत . ज्यातील काही घडामोडी या भारतावर प्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत तर काही अप्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत चला तर जाणून घेउया तालिबानविषयक सध्या वेगवेग गतीने घडणाऱ्या  घडामोडी 
                               मित्रांनो तालिबानच्या प्रवक्त्याने आम्ही काश्मीरसह जगभरातील मुस्लिम बांधवांच्या प्रशांवर आवाज उठवू असे बीबीसी वरील एका लेखाद्वारे जाहीर केले आहे कतार या देशातील भारताच्या राजदूतांबरोबर होणारी चर्चा विशेष पुढे सरकत नसल्याने आणि भारताने अधिकृतरीत्या तालिबानला अफगाणिस्तानमधील राजवट म्हणून मान्यता न दिल्याने दबाव तंत्रांचा वापर करत  भारताला कोंडीत पकडण्यासाठी तालिबानने हे पाऊल उचलण्याचे या क्षेत्रातील जाणकारणांचे  मत आहे या आधी तालिबानने आम्ही अफगाणिस्तानबाहेरील कोणत्याही घडामोडीत लक्ष घालणार नाही काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत मुद्दा आहे त्यांनी परस्पर
चर्चेद्वारे सोडवावा असे जाहीर केले होते त्या वेळेस तालिबान अफगाणिस्तानचे शासनकर्ते बनलेले नव्हते त्यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतली आता तालिबान अफगाणिस्तानचे पूर्णतः शासक बनल्यावर त्यांनी  त्यांचे मुळातील रंग दाखवायला सुरवात केल्याचे या निमित्याने बोलले जात आहे हा मजकूर लिहीत असेपर्यंत भारतने तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही मात्र तालिबानशी चर्चा सुरु केली आहे 
                           एकीकडे तालिबानकडून भारतविरोधी वक्तव्ये केली जात असताना चीनकडून तालिबानला मोठ्या प्रमाणात साह्य करण्यात येत  आहे ज्या मोजक्या देशांनी आतापर्यंत तालिबानला अधिकृतपणे मान्यता दिली आहे त्यामध्ये चीनचा समावेश आहे तालिबानने चीन आमचा मित्र असल्याचे जाहीर केले होतेच चीन अफगाणिस्तानमधील बारगाम विमानतळावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे विधान अमेरिकेची दक्षिण आशियासाठीची माजी राजदूत  निकी  हेली यांनी केले आहे.  हा विमानतळ ताजकिस्तान चीन भारत आणि वाखान कॉरिडॉर  यांचा जवळ आहे अफगानिस्टनमध्ये नियंत्रण मिळवल्यावर अमेरिकेने त्यांचा सर्वात मोठा तळ याच विमानतळावर निर्माण केला होता तालिबानची सत्ता अफगाणिस्तानमध्ये आल्यावर याच विमानतळावरील शस्त्रसाठा त्यांना मिळाल्याने त्याने लष्करी बाळ मोठ्या प्रमाणात वाढले होते निकी हेली यांच्या मते चीन त्याचा वापर पाकिस्तानच्या मदतीने अमेरिकेचा दक्षिण आशियातील एक प्रबळ  साथीदार असलेल्या भारताविरुद्ध करू शकतो . 
                     तालिबानने अफगाणिस्तान मधील पंचशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचे वृत्त wion या वृत्तवाहिनीने दिले आहे मागच्या तालिबान सत्तेच्या काळात ज्या अफगाणिस्तानमधील प्रांतावर  तालिबानचा नियंत्रण नव्हते  तो
म्हणजे पंचशीर  प्रांत.  या प्रांतावर नियंत्रण  आल्याने तालिबानची सत्ता अफगाणिस्तानमध्ये बळकट झाली आहे त्यावेळेस नॉर्दन अलायन्स याचाकडे याचा ताबा होता 
                       युरोपीय युनियनने 3 कोटी 50 लाख युरो इतका निधी अफगाणिस्तानमधून युरोपात येणाऱ्या शरणार्थींसाठी राखून ठेवला असल्याचे जाहीर केले आहे 26 ऑगस्ट रोजी युरोपीय युनियनच्या संसदेने याबाबत खर्चाला मान्यता देण्यात आली आहे  युरोपीय युनियनच्या मते 30 हजार अफगाणी  शरणार्थी युरोपात शरण घेऊ शकतात . अमेरिकेचे बोट सोडून आपले  स्वतंत्र परराष्ट्र धोरण असावे या हेतूने या निधीची तरतूद  करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामुळे युरोपचे नुकसान होत आहे त्यामुळे आपले स्वतंत्र धोरण असावे असे  युरोपीय युनियमध्ये मोठ्या प्रमाणात मत असल्याने अमेरिकेपेक्षा स्वतंत्र धोरणाची सुरवात यातून होत आहे 
अफगाणिस्तान हा विषय येत्या काही दिवसात सातत्याने चर्चिला जाणार हेच यातून सिद्द होत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?