16 वर्षांच्या पर्वाची अखेर !

         


  येत्या 26 सप्टेंबरला जर्मनीत तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुका होणार आहेत . {जर्मनीच्या केंद्रीय विधिमंडळाला बुडस्टॅग  म्हणतात }  यामध्ये बहुमत मिळणाऱ्या पक्षाचा नेता जर्मनीचा पुढील चॅन्सलर होईल . चॅन्सलर याचे राज्यशात्रानुसार स्थान राष्टपतींपेक्षा दुय्यम मात्र पंतप्रधानपदापेक्षा वरिष्ठ असते . चॅन्सलरला पंतप्रधानपेक्षा जास्त मात्र राष्ट्रपतीपेक्षा कमी  अधिकार असतात . चॅन्सलर हा तेथील केंद्रीय  मंत्रिपरिषदेचा प्रमुख समजला  जातो .चॅन्सलरची मुदत चार वर्षे असते {तर जर्मनीच्या राष्ष्ट्रपतीची मुदत पाच वर्षे असते }  सन 2005 पासून जर्मनीच्या  चॅन्सलरपदी अँजेला मर्केल या होत्या . मात्र सन 2018 साली  त्यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे त्या 2021 च्या चॅन्सलरच्या शर्यतीपासून दूर आहेत त्यांनी 2018 मध्ये त्यांचा पक्ष ख्रिश्चन डेमोक्रेट्रीक पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे .  17 जुलै 1954 साली जमलेल्या अँजेला मर्केल यांनी लोकांना हळहळ वाटेल अश्या स्थितीतच राजकारणातून निवृत्ती घेऊन जगातील सर्व राजकारणी लोंकांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . त्यांची राजकारणातून निवृत्ती त्यांच्या 30 वर्षाच्या राजकारणाची अखेर मानण्यात येत आहे . 

                 अँजेला मर्केल या युरोपीय युनियनच्या कणखर नेत्या समजल्या जातात . त्यांच्या कार्यकाळात युरोपीय युनियनने अमेरिकेतील 2008 सब प्राईम क्रायसिस, पिग्स आर्थिक समस्या   (सन 2011, 12मध्ये पोर्तुगाल आयर्लंड ग्रीस स्पेन या देशांच्या अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्या होत्या . ज्यास पिग्स आर्थिक समस्या पिग्स आर्थिक समस्या म्हणतात )  ब्रेक्झिट आदी समस्यांचा सामना केला या प्रत्येकवेळी त्यांनी आपल्या कणखर नेर्तृत्वाची चुणूक दाखवणून दिली आणि युरोपीय युनियनला मोठ्या आर्थिक संकटातून यशस्वीपणे बाहेर काढले .

सन 2020 मध्ये युरोपीय युनियनच्या 14 देशांमध्ये एक सर्वेक्षण घेण्यात आले ज्यामध्ये 75% प्रौढ नागरिकांनी अँजेला मर्केल या युरोपीय युनियाचा सर्वात ताकदवर नेत्या असे मत नोंदवले होते . त्यांनी युरोपला या आर्थिक संकटाबरोबरच सीरिया देशातील अंतर्गत यादवीमुळे निर्माण झालेल्या विस्थापितांच्य संकटामुले होणाऱ्या अनिष्ट परिणामापासून वाचवले . 

त्या युरोपातील पहिल्या  महिला चॅन्सलर होत्या (भारत महिलांना सर्वोच्च स्थानी नियुक्त  करण्याबाबत यांच्यापेक्षा खूपच पुढे आहे हि आनंदाची बाब  आहे ) त्यांच्या कार्यकाळातच रोडवणारी जर्मनीची अर्थव्यवस्था वाढीस लागली कार्यकाळाच्यासमाप्तीकडे त्यांना विविध नैसर्गिक संकटाना दोनदा द्यावे लागले यंत्र देखील त्यांनी आपली चुणूक दाखवली 

त्यांच्या निवृत्तीमुळे जर्मनी आणि युरोपच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे हि कशी भरून काढणार याची चिंता तेथील राजकारणी व्यक्तींना असल्याचे फोर्ब्स च्या लेखात म्हंटले आहे . ती पोकळी भरून निघावी आणि जर्मनी आणि युरोपला त्यांची गादी चालवणारा व्यक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?