ब....... बुद्धिबळाचा (भाग 2)

       


     सध्या ऑनलाईन पद्धतीने बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे यामध्ये भारताचे प्रदर्शन खूपच उत्तम होत आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये मात्र याविषयी फारसे बोलले जात नसल्याने या नव्या खुल्या माध्यमांचा वापर करत त्याविषयी आपणापर्यत माहिती पोहचवून बुद्धिबळपटुंचा आनंदात वाढ करण्यासाठी आजचे लेखन

           तर मित्रानो , बुधवारी 8 सप्टेंबर रोजी भारताने पहिल्या डावात  इजिप्तचा पूर्णतः धुव्वा उडवला  इजिप्तचा सहा पैकी एकही खेडाळू भारताच्या  खेडाळुला पराभूत करने सोडाच, बरोबरी देखील करू शकला नाही इजिप्तच्या सहाही खेळाडूंनी भारतासमोर सपशेल नांगी टाकली ज्यामुळे भारताने इजिप्तविरुद्ध 6 विरुद्ध 0 असे निर्धोक यश मिळवले . तर दुसऱ्या डावात फ्रांसविरुद्ध विरुद्धच्या डावात भारताचा कप्तान विश्वनाथन आनंद यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी Etienne Bacrot.विरुद्धच्या डाव बरोबरीत सोडवला . तर जागतिक मानांकात 21 व्या स्थांनी आणि  भारतातील क्रमांक दोनचे   खेळाडू नाशिकचे आयकाँन गँडमास्टर विदीत गुजराथी यांनी Yannik Gozzli यास बरोबरीत रोखले  हंपी यांनी Marie Sehag विरूद्ध डाव बरोबरीत सोडवला. हरीका द्रोणावली यांना सुद्धा बरोबरीत समाधान मानावे लागले. आर प्रग्नानंद यांना मात्र हार पत्कारावली लागली. त्यांना मात्र त्यांच्यापेक्षा 500इलो रेटींग कमी असणाऱ्या इंटरनँशनल मास्टर  Andria Maurizi यांनी हरवले.  मात्र भावाचा पराभवाचा वचवा

 त्यांच्या बहीणीने घेतला.काळ्या मोहऱ्याकडून खेळताना त्यांची बहीण आर वैशाली यांनी Florence Rollot यांना पराभवाचे पाणी पाजले. .भारत आणि फ्रान्स या दोघांनी या डावात 3-3 गुणांची कमाई केली.. भारताने  अखेरच्या डावात स्विडनविरुद्ध 4-2असे यश मिळवत दुसऱ्या डावात मिळालेले अपयश धूवून काढले. पेंटला हरीकृष्णन, बी अधिबान ,निहाल सरीन यांनी विजयी सलामी दिली. हंम्पी आणि तैया यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. तर बी सविताश्री यांना पराभव बघावा लागला. त्यांना Margarita यांनी हरवले.

            या स्पर्धेत जिंकल्यास दोन गुण आणि जर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना समान गुण मिळाल्यास एक गुण संघाला मिळतो 8सप्टेंबर रोजी स्विडन आणि इजिप्त ला हारवल्यामुळे त्यांचे प्रत्येकी 2 गुण असे 4 गुण तर फ्रान्सविरुद्द समान गुण मिळाल्याने त्याचा एक गुण भारताला मिळाला ज्यामुळे काल भारताने 5 गुणांची कमाई करत आपल्या पुलमध्ये दुसरे स्थान मिळवले. हंगेरीने त्यांच्या विरुद्धचा तिन्ही संघांना हरवल्यामुळे ते पहिल्या स्थानावर आहेत.तर फ्रान्स आणि मोल्डोवा चार गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. अझरबैझान तीन गुणांसह  पाचव्या क्रमांकावर आहे. बेलारूस, स्लोव्हारीया, हे आपल्या पुलमधील अन्य स्पर्धक आहेत.या यशामुळे गेल्यावर्षी नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या यशासारखेच यश याही वेळी मिळवण्यची शक्यता निर्माण झाली आहे         

          आपल्याकडे बुद्धीची देवता म्हणून मान्यता असलेल्या गणरायाचा उत्सवाच्यावेळीच  .भारतीय बुद्धिबळ असे उत्तम यश मिळवत असल्याने बुद्धिबुद्धिबळपटूच्या आनंद गनात मावेनासा झाला आहे . त्यांची यशाची मालिका अशीच निर्धोक सुरु राहू दे अशी गणरायाला प्रार्थना करत सध्यापुरते थांबतो , नमस्कार 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?