28 वर्षापूर्वीची ती काळरात्र

     


  दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी आपण अनंत चतूर्दशी साजरी केली  .या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील दहा दिवसांची यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 28 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , .गणरायाचे विसर्जन करून ते झोपे गेले ते कायमचेच.  
लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे 

    मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 28वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. .लातूर किल्लारी परीसराला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील धारवाड या परीसरात भुगर्भात असणाऱ्या फटीमुळे (जी धारवाड फाँल्ट म्हणून ओळखली

जाते) हा भुकंप झाला, त्यावेळी या परीसरात असणाऱ्या दगडाच्या घरे बांधण्याचा सदोष पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली, .या ठिकाणी त्यावेळी दगडांचा मोठ्याला चिरा एकमेकांवर रचून घरांच्या भिंती रचल्या जात भुकंपामुळे जेव्हा घरे कोसळली तेव्हा या दगडाच्या चिरा माणसांवर पडल्या ज्यामुळे अनेक  लोक जखमी झाली सेच लोक झोपले असताना मध्यरात्री भुकंप झाल्याने यामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली 

              त्यानंतर भारतात भुकंपाच्या दृष्टीने अत्यंत सखोलतेने अभ्यास सुरू झाला . भारताची भुकंपाच्या दृष्टीने  विविध भागात विभागणी करण्यात आली .भुकंपासाठी सदर भाग किती संवेदनशील आहे? या वर ही विभागणी करण्यात आली .ज्यामुळे त्या भागात कश्या प्रकारे घरे बांधायची ?याचे नियम निश्चित करण्यात प्रशासनाला मदत झाली . ज्यामुळे  भारतातील नंतरच्या भुकंपामध्ये तूलनेने कमी प्राणहानी झाली .
महाराष्ट्राचा बाबतीत बोलायचे झाल्यास या भुकंपानंतर आपत्ती व्यवस्थापन या बाबत गंभीरतेने विचार करण्यात आला .
             मित्रांनो, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जी काही प्राणहानी होते ती निसर्गाच्या क्रुरतेमुळे नाही, तर मानवी चूकीमुळे . मानव स्वतःच्या फायद्यासाठी कमकुवत अथवा चूकीच्या ठिकाणी घरे बांधतो,किंवा घरे बांधण्याचा खर्चात घट  व्हावी यासाठी  अयोग्य दर्जाचे साहित्य वापरून घर बांधतो .ज्याची किंमत आपणास प्राणहानीच्या माध्यमातून द्यावी लागते, असो लातूर किल्लारी येथे झालेल्या भुकंपामुळे लाव्हा पसरलेले आपले
दख्खनचे पठार हे भौगोलिकदृष्ट्या  सक्रीय असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले (या आधी कोयनाचा भुकंपात हे दाखवून दिले होते) ज्यामुळे भुगर्भशास्त्रज्ञांच्या ज्ञानात प्रचंड प्रमाणात भर पडली .
               काळ कोणासाठी थांबत नाही,या भुकंपात सर्वस्व गमावलेले लोकही आता यातून सावरलेले आहेत.मात्र त्याचा मनात कुठेतरी या महाविनाशकारी भुकंपाच्या स्मृती असतीलच .त्या तस्याच ठेवून या भुकंपात मृत्युमुखी पडलेल्या जीवांना श्रद्धांजली वाहुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?