ब....... बुद्धिबळाचा (भाग 6)

       

            भारताचे सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ आँल्मपियाड जिकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच झाले. उपात्य फेरीत ब्लिटीश प्रकारात खेळताना भारताला अमेरीकेडून 1.5विरुद्ध 4.5 अस्या मोठ्या फरकाला सामोरे जावे लागले आणि भारताचा बुद्धीबळ आँल्मपियाडमधील प्रवास थांबला. भारताला नमवून अमेरीकेने बुद्धीबळ आँल्मपियाडच्या आंतीम फेरीत प्रवेश केला.आंतीम फेरीत त्यांचा सामना रशियाबरोबर होईल. रशियाने चीनला पहिल्या डावात 3.5 विरुद्ध 2.5 आणि दुसऱ्या डावात 4 विरूद्ध 2असे नमवून आंतीम फेरीत प्रवेश केला आहे.
            भारताची उपांत्य फेरीची सुरवात उत्तम झाली.अमेरीकेविरूद्धचा पहिल्या डावात भारताने अमेरीकेवर 5 विरुद्ध एक असे दिमाखदार हरवले. मात्र दुसऱ्या डावात अमेरीकेने भारतावर बाजी उलटवत  भारताला 4विरुद्ध 2 असे हरवले.परीणामी विजेता ठरवण्यासाठी ट्राय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. ज्यामध्ये अमेरीकेने भारताला 5विरुद्ध एक असे हरवले.आणि आंतीम सामन्याचे तिकीट बुक केले. पहिल्या डावात भारताचे कप्तान विश्वनाथन आनंद  यांनी  जेफ्री जिओंगचा यांना तर  पी हरीकृष्ण यांनी डारिऊस स्विर्कझ यांना  आणि द्रोणावली हरीका यांनी अँना झातोन्सकी तसेच आर वैशाली यांनी थालिअ यांना पराभवाचा धक्का दिला.कोनेरु हंपी आणि निहाल सारीन यांचे डाव बरोबरीत सुटले परीणामी पहिल्या डावात भारताने अमेरीकेला 5 विरुद्ध 1असे आस्मान दाखवले. दुसऱ्या डावात मात्र भारताच्या नशिबाचे फासे पलटले. आतापर्यत एकही डाव न हारणाऱ्या भारताला अमेरीकेकडून
धक्कादायक पराभव बघावा लागला विश्वनाथन आनंद यांना 20 वर्षीय गँडमास्टर जिओंगकडून पराभव स्विकारावा लागला.कोनेरु हम्पी आणि आर वैशाली यांचे सामने बरोबरीत सुटले. नाशिकचे आयकाँन ग्रँडमास्टर विदीत गुजराथी  आणि प्रद्नानंद यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला.केवळ हरीका द्रोणावली यांना विजयाची चव चाखता आली.
         भारताने साखळी फेरीत(राँबिन राउंड फेरीत{हरले अथवा जिंकले तरी ठराविक सामने खेळायला मिळणे}) आपल्या पुलमधील फ्रान्स आणि स्लोव्हानिया या देशाबरोबर बरोबरी केली. बाकी अन्य सर्व देश हंगेरी इजिप्त, मोल्डोवा, सेझीन चीन, अझरबैझान, बेलारुस , स्विडन या देशांना हरवले. उप उपांत्य फेरीत युक्रेनला आपले बुद्धीचातुर्याची चूणूक दाखवली, आणि उपांत्य फेरीत फेरीत प्रवेश केला. कझाकिस्तानला हरवून अमेरीकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
            या पराभवामुळे भारताचे बुद्धीबळ आँल्मपियाड जिकण्याचे स्वप्न भंगले. या वेळी भारताला बुद्धीबळ आँल्मपियाडचा प्रबळ दावेदार समजला जात होता.मात्र या पराभवामुळे या अपेक्षेवर पाणी फिरले आहे . रशियाने मागच्या वर्षी पहिल्यांदाच  ऑनलाईन पद्धतीने भरवलेल्या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये भारताकडून उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे भारताबरोबर संयुक्तपणे विजेतेपद मिळवले . जो आता ऑनलाईन  पद्धतीने दुसऱ्यांदा  भरवलेल्या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये अंतिम फेरीत अमेरिकेबरोबर आपले बुध्दिकोशल्य वापरून दोन हात करण्यास सज्ज होत आहे . बुधवारी हा अंतिम सामना होईल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?